अंदमान आणि निकोबार व्दीपसमूहावर पराक्रम दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृष्य प्रणालीव्दारे केलेले भाषण
January 23rd, 05:15 pm
नमस्कार ! अंदमान-निकोबारचे नायब राज्यपाल अॅमिरल डी. के. जोशी, नेताजी सुभाषचंद्र बोस आयएनए न्यासाचे अध्यक्ष ब्रिगेडियर आर.एस. छिकारा, भारतीय स्वातंत्र्य आंदोलनामधील सहभागी आणि आयएनएचे शाश्वत पुरूष लेफ्टनंट आर माधवन् !!अंदमान आणि निकोबार बेटांवरील पराक्रम दिन कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केले संबोधित
January 23rd, 05:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अंदमान आणि निकोबार बेटांवरील पराक्रम दिन कार्यक्रमाला संबोधित केले. 23 जानेवारी हा नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीचा दिन म्हणजे गौरवशाली तारीख असल्याचे त्यांनी नमूद केले. नेताजींचे शौर्य आणि धाडस आपल्याला प्रेरणा देते आणि आपले मन त्यांच्याबद्दलच्या आदराने भारून जाते असे ते म्हणाले. गेल्या काही वर्षांत पराक्रम दिन हा देशभावनेचा अविभाज्य सोहळा बनला आहे, असे त्यांनी अधोरेखित केले.विकसित कृषी संकल्प अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून केलेले भाषण
May 29th, 06:45 pm
आज, भगवान जगन्नाथांच्या आशीर्वादाने देशातील शेतकऱ्यांसाठी एक खूप मोठी मोहीम सुरू होत आहे. ‘विकसित कृषी संकल्प अभियान’ हा एक अनोखा उपक्रम आहे. पावसाळ्याची चाहूल लागली आहे, खरीप हंगामाची तयारी सुरू झाली आहे आणि अशा परिस्थितीत, देशातील शास्त्रज्ञ, तज्ञ, अधिकारी आणि प्रगतीशील शेतकऱ्यांची दोन हजारपेक्षा जास्त पथके पुढचे 12 ते 15 दिवस गावोगावी जात आहेत. ही पथके देशातील 700 पेक्षा जास्त जिल्ह्यांमधल्या कोट्यवधी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतील. देशातील सर्व शेतकऱ्यांना, या पथकांमध्ये सहभागी असलेल्या सर्व सहकाऱ्यांना, या महान मोहिमेसाठी, एका मोठ्या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमासाठी आणि शेतीच्या उज्ज्वल भविष्यासाठी मी शुभेच्छा देतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित कृषी संकल्प अभियानाला केले संबोधित
May 29th, 06:44 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे विकसित कृषी संकल्प अभियानाला संबोधित केले. याप्रसंगी ते म्हणाले की, विकसित कृषी संकल्प अभियानाची सुरुवात शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे तसेच कृषी विकासाला पाठबळ देण्याचा एक अनोखा प्रयत्न आहे. पंतप्रधानांनी अधोरेखित केले की, मान्सूनच्या प्रारंभासोबत आणि खरीप हंगामाची तयारी सुरू होण्यासोबत, पुढील 12 ते 15 दिवसांमध्ये वैज्ञानिक, तज्ञ, अधिकारी आणि प्रगतीशील शेतकरी यांची 2000 पथके 700 हून अधिक जिल्ह्यांमध्ये प्रवास करतील आणि गावोगावी लाखो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतील. भारताच्या कृषी क्षेत्राला बळकटी देण्याप्रति त्यांच्या समर्पणाची दखल घेत , त्यांनी सर्व शेतकरी आणि या पथकांमधील सहभागींना शुभेच्छा दिल्या.