पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय युवा दिनानिमित्त, 12 जानेवारी रोजी ‘विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग 2025’ मध्ये सहभागी होणार

January 10th, 09:21 pm

स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त आयोजित केल्या जाणाऱ्या राष्ट्रीय युवा दिना निमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता भारत मंडपम, नवी दिल्ली येथे ‘विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग 2025’ मध्ये सहभागी होतील. यावेळी ते देशभरातील 3,000 युवा नेत्यांशी संवाद साधतील आणि उपस्थितांना संबोधित करतील. पारंपरिक पद्धतीने राष्ट्रीय युवा महोत्सव आयोजित करण्याची 25 वर्षांची परंपरा खंडित करणे, हे विकसित भारत यंग लीडर्स डायलॉगचे उद्दिष्ट आहे. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या 1 लाख युवकांना राजकारणात आणून विकसित भारताची त्यांची कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी राष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या, पंतप्रधानांनी स्वातंत्र्यदिनी केलेल्या घोषणेला अनुसरून हा उपक्रम आहे. या अनुषंगाने, यंदाच्या राष्ट्रीय युवा दिनानिमित्त, पंतप्रधान देशाच्या भावी नेत्यांना प्रेरणा आणि प्रोत्साहन देऊन त्यांना सक्षम करण्यासाठी आखलेल्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी होतील. यावेळी हे नवोन्मेशी युवा नेते पंतप्रधानांच्या समोर भारताच्या विकासाकरता महत्वाच्या असलेल्या दहा क्षेत्रांवर आधारित पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन करतील. या सादरीकरणांमध्ये युवा नेत्यांनी भारतापुढील काही सर्वात गंभीर आव्हानांची हाताळणी करण्यासाठी सुचवलेल्या नवोन्मेशी कल्पना आणि उपायांचे प्रतिबिंब उमटेल.

‘विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग’, म्हणजे आपली युवा शक्ती, त्यांची स्वप्ने, कौशल्ये आणि आकांक्षांचा उत्सव आहे: पंतप्रधान नरेंद्र मोदी

January 10th, 07:24 pm

‘विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग’, म्हणजे आपली युवा शक्ती, त्यांची स्वप्ने, कौशल्ये आणि आकांक्षांचा उत्सव असून, आपल्या अधिकाधिक युवा मित्रांनी देशाच्या पुनर्बांधणीचे नेतृत्व करावे, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. 'विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग' हा या संदर्भात महत्त्वाचा उपक्रम असून, यामधील तरुणांचा उत्साह वाखाणण्याजोगा आहे, असेही पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.

अहमदाबाद येथील रामकृष्ण मठात आयोजित कार्यक्रमाला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करताना पंतप्रधानांच्या भाषणाचा मजकूर

December 09th, 01:30 pm

परमपूज्य श्रीमत् स्वामी गौतमानंद जी महाराज, रामकृष्ण मठ आणि मिशनचे देश-विदेशातून आलेले आदरणीय संत, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल, या कार्यक्रमाशी संबंधित इतर सर्व मान्यवर,आणि सभ्य स्त्री-पुरूषहो, नमस्कार!

पंतप्रधानांनी गुजरातमध्ये रामकृष्ण मठाद्वारे आयोजित कार्यक्रमाला केले संबोधित

December 09th, 01:00 pm

गुजरातमध्ये रामकृष्ण मठात आयोजित कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित केले. यावेळी बोलताना त्यांनी पूजनीय श्रीमद स्वामी गौतमानंद जी महाराज यांच्यासह, रामकृष्ण मठ आणि मिशन संस्थेच्या देशविदेशातील आदरणीय संतांप्रती तसेच गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि अन्य मान्यवरांप्रती अभीष्टचिंतन व्यक्त केले. तसेच माता शारदादेवी, गुरुदेव रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद यांना पंतप्रधान मोदी यांनी आदरांजली वाहिली. आजचा कार्यक्रम श्रीमद स्वामी प्रेमानंद महाराज यांच्या जयंतीदिनी आयोजित केला असल्याचा उल्लेखही करत त्यांनी त्यांनाही आदरांजली अर्पण केली.

भारतीय समुदायाने वेगवेगळ्या देशांमध्ये आपला ठसा उमटवला आहे: पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये

November 24th, 11:30 am

मन की बात च्या 116 व्या भागात, पंतप्रधान मोदींनी NCC छात्रांचा विकास आणि आपत्ती निवारणाच्या कार्यातील त्यांची भूमिका यावर प्रकाश टाकत NCC दिनाचे महत्व विशद केले. विकसित भारताचे ध्येय साध्य करण्यासाठी तरुणांचे सक्षमीकरण होण्याची गरज त्यांनी स्पष्ट करण्यासोबतच विकसित भारत यंग लीडर्स डायलॉगची चर्चा केली. ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करण्यास मदत करणाऱ्या तरुणांच्या प्रेरणादायी कथा आणि एक पेड माँ के नाम मोहिमेचे यशही त्यांनी शेअर केले.