विजया मेहता यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
July 01st, 11:41 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजया मेहता यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. विजया मेहता या आधुनिक मराठी रंगभूमीच्या प्रणेत्या होत्या तसेच त्यांच्या सर्जनशीलता आणि कलात्मक उत्कृष्टतेबद्दल असलेल्या निष्ठेसाठी ओळखल्या जात होत्या, असे मोदी यांनी म्हटले आहे. त्यांच्या कार्यामुळे अनेक पिढ्यांमधील अभिनेते, दिग्दर्शक आणि नाट्यप्रेमींना प्रेरणा मिळाली.