पंतप्रधान 4 ऑक्टोबर रोजी 62,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध युवा-केंद्रित उपक्रमांचे उद्घाटन करणार

October 03rd, 03:54 pm

युवा विकासासाठीचा एक महत्वाचा उपक्रम म्हणून, पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीतील विज्ञान भवनात सकाळी 11 वाजता 62,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध युवा-केंद्रित उपक्रमांचे उद्घाटन करतील. यामुळे देशभरात शिक्षण, कौशल्य आणि उद्योजकतेला निर्णायक चालना मिळेल. या कार्यक्रमात कौशल दीक्षांत समारंभ देखील आयोजित केला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टीकोनाला अनुसरून, आयोजित होत असलेला हा चौथा राष्ट्रीय कौशल्य दीक्षांत समारंभ असेल. यामध्ये कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालया अंतर्गत येणाऱ्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील राष्ट्रीय पातळीवर अव्वल कामगिरी करणाऱ्या 46 विद्यार्थ्यांना सन्मानित केले जाईल.

नवी दिल्लीत होत असलेल्या ज्ञान भारतमसंबंधी आंतरराष्ट्रीय परिषदेमध्‍ये 12 सप्टेंबरला पंतप्रधान होणार सहभागी

September 11th, 04:57 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4.30 च्या सुमारास नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे ज्ञान भारतमवरील आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी होणार आहेत. हस्तलिखितांचे डिजिटायझेशन, जतन आणि सार्वजनिक प्रवेश म्हणजेच सर्वांसाठी ही हस्तलिखिते खुली करण्‍यासाठी समर्पित डिजिटल ज्ञान भारतम पोर्टलचेही उद्घाटन पंतप्रधान करतील. तसेच याप्रसंगी ते उपस्थितांना संबोधित करतील.

नवी दिल्ली येथे विज्ञान भवनामध्ये आयोजित आचार्य श्री विद्यानंद महाराज यांच्या शताब्दी कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

June 28th, 11:15 am

परम श्रध्देय आचार्य प्रज्ञ सागर महाराज जी, श्रवण बेळगोळच्या मठाचे मठाधिपती स्वामी चारूकीर्ती जी, माझे सहकारी गजेंद्रसिंह शेखावत, संसदेतील माझे सहकारी नवीन जैन, भगवान महावीर अहिंसा भारती न्यासाचे अध्यक्ष प्रियंक जैन, सचिव ममता जैन, विश्वस्त पीयूष जैन आणि उपस्थित असलेले सर्व सन्माननीय, संतवर्ग, भगिनी आणि सद्गृहस्थ हो, जय जिनेंद्र!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आचार्य श्री विद्यानंदजी महाराज यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याला संबोधित केले

June 28th, 11:01 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, 28 जून 2025 रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे आचार्य श्री विद्यानंदजी महाराज यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याला संबोधित केले.

पंतप्रधान 28 जून रोजी नवी दिल्ली येथे आचार्य विद्यानंद जी महाराजांच्या शताब्दी समारंभाचे करणार उद्घाटन

June 27th, 05:06 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 जून रोजी सकाळी 11 वाजता नवी दिल्लीतील विज्ञान भवनात आचार्य विद्यानंद जी महाराजांच्या शताब्दी समारंभाचे उद्घाटन करतील. याप्रसंगी ते उपस्थितांना संबोधितही करतील.

श्री नारायण गुरु आणि गांधीजी यांच्यातील संवादाच्या शताब्दीनिमित्त आयोजित समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण

June 24th, 11:30 am

आज हा परिसर देशाच्या इतिहासातील एका अभूतपूर्व घटनेचे स्मरण करण्याचा साक्षीदार होतो आहे. ती एक अशी ऐतिहासिक घटना होती, ज्या घटनेने आपल्या स्वातंत्र्य चळवळीला केवळ एक नवीन दिशा दिली नाही तर स्वातंत्र्याच्या उद्दिष्टाला, स्वतंत्र भारताच्या स्वप्नाला ठोस अर्थ दिला. शंभर वर्षांपूर्वीची श्री नारायण गुरु आणि महात्मा गांधी यांची ती भेट आजही तितकीच प्रेरणादायी आणि प्रासंगिक आहे. शंभर वर्षांपूर्वी झालेली ती भेट आजही सामाजिक सौहार्द आणि विकसित भारताच्या सामूहिक उद्दिष्टांसाठी उर्जेचा एक मोठा स्रोत आहे. या ऐतिहासिक प्रसंगी, मी श्री नारायण गुरुंच्या चरणी प्रणाम करतो. गांधीजींनाही मी आदरांजली वाहतो.

श्री नारायण गुरू आणि महात्मा गांधी यांच्यातील ऐतिहासिक संवादाच्या शताब्दी समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले संबोधित

June 24th, 11:00 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील विज्ञान भवनात भारताचे दोन महान आध्यात्मिक आणि नैतिक नेते श्री नारायण गुरू आणि महात्मा गांधी यांच्यातील ऐतिहासिक संवादाच्या शताब्दी समारंभाला संबोधित केले. या प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी आदरपूर्वक अभिवादन केले आणि सांगितले की आज हे ठिकाण देशाच्या इतिहासातील एका अभूतपूर्व क्षणाचे साक्षीदार आहे. आपल्या स्वातंत्र्यचळवळीला नवी दिशा देणारी ही एक ऐतिहासिक घटना होती, स्वतंत्र भारताच्या स्वप्नाला आणि स्वातंत्र्याच्या उद्दिष्टांना तिने ठोस अर्थ दिला,असे त्यांनी सांगितले. श्री नारायण गुरू आणि महात्मा गांधी यांच्यात 100 वर्षांपूर्वी झालेली ही भेट आजही प्रेरणादायी आणि प्रासंगिक आहे, आणि सामाजिक सलोखा आणि विकसित भारताच्या सामूहिक उद्दिष्टांसाठी उर्जेचा एक शक्तिशाली स्रोत आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. या ऐतिहासिक प्रसंगी, त्यांनी श्री नारायण गुरूंच्या चरणी वंदन केले आणि महात्मा गांधींना आदरांजली वाहिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 24 जून, 2025 रोजी श्री नारायण गुरु आणि महात्मा गांधी यांच्यातील संभाषणाच्या शताब्दी सोहळ्याचे उद्घाटन करणार

June 23rd, 05:24 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी 24 जून 2025 रोजी सकाळी सुमारे 11 वाजता विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे भारताचे दोन महान आध्यात्मिक आणि नैतिक नेते श्री नारायण गुरु आणि महात्मा गांधी यांच्यातील ऐतिहासिक संभाषणाच्या शतकमहोत्सवी समारंभाचे उद्घाटन करतील. यावेळी ते उपस्थितांना संबोधित करतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 व्या नागरी सेवा दिनी केलेले भाषण

April 21st, 11:30 am

मंत्रिमंडळातले माझे सहकारी डॉ जितेंद्र सिंह जी, शक्तीकांत दास जी,डॉ. सोमनाथ जी, इतर वरिष्ठ अधिकारी वर्ग, देशभरातून जोडले गेलेले नागरी सेवेतील सर्व मित्र, महिला आणि सद्गृहस्‍थ,

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 व्या नागरी सेवा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला केले संबोधित

April 21st, 11:00 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 17 व्या नागरी सेवा दिनानिमित्त नवी दिल्लीत विज्ञान भवन येथे नागरी सेवकांना संबोधित केले. त्यांनी लोक प्रशासनातील उत्कृष्टतेसाठीचे पंतप्रधान पुरस्कारदेखील प्रदान केले. उपस्थितांना संबोधित करताना, पंतप्रधानांनी नागरी सेवा दिनानिमित्त सर्वांचे अभिनंदन केले आणि संविधानाचे 75 वे वर्ष आणि सरदार वल्लभभाई पटेल यांची 150 वी जयंती असल्याने या वर्षीच्या उत्सवाचे महत्त्व अधोरेखित केले. सरदार पटेल यांनी 21 एप्रिल1947 रोजी नागरी सेवकांना 'भारताची पोलादी चौकट' असे संबोधले होते. त्या संस्मरणीय संबोधनाची आठवण करून देताना, पंतप्रधान मोदी यांनी शिस्त, प्रामाणिकपणा आणि लोकशाही मूल्यांचे पालन करणारी आणि अत्यंत समर्पणाने देशाची सेवा करणारी सनदी सेवा, या सरदार पटेल यांच्या दृष्टिकोनावर भर दिला. विकसित भारत निर्माण करण्याच्या भारताच्या संकल्पाच्या संदर्भात त्यांनी सरदार पटेल यांच्या आदर्शांची प्रासंगिकता अधोरेखित केली आणि सरदार पटेल यांच्या दूरदृष्टीला आणि वारशाला मनापासून अभिवादन केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 एप्रिल रोजी नागरी सेवा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला संबोधित करणार

April 19th, 01:16 pm

17 व्या नागरी सेवा दिनानिमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे नागरी सेवेतील कर्मचाऱ्यांना संबोधित करतील. सार्वजनिक प्रशासन सेवा उत्कृष्टता पंतप्रधान पुरस्कार देखील पंतप्रधानांच्या हस्ते दिले जातील.

नवकार महामंत्र दिवसाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

April 09th, 08:15 am

मन शांत आहे, मन स्थिर आहे, केवळ शांतता आहे, एक अद्भुत अनुभूती आहे, शब्दांच्या पलीकडे, विचारांच्या पलीकडे, नवकार महामंत्र अजूनही मनात गुंजत आहे. नमो अरिहंताणं॥ नमो सिद्धाणं॥ नमो आयरियाणं॥ नमो उवज्झायाणं॥ नमो लोए सव्वसाहूणं॥ मन स्थिर आहे , केवळ शांतता , एक स्वर, एक प्रवाह, एक ऊर्जा, कुठलाही चढउतार नाही, केवळ स्थिरता, केवळ समभाव . एक विशिष्ट चेतना, एकसमान लय, अंतर्मनात एकसमान प्रकाश. नवकार महामंत्राची ही आध्यात्मिक शक्ती मला अजूनही अंतर्मनात जाणवते. काही वर्षांपूर्वी मी बंगळुरूमध्ये अशाच एका सामूहिक मंत्रोच्चाराला उपस्थित होतो, आज तसाच अनुभव आला आणि तितकाच गहिरा. यावेळी, देशात आणि परदेशात एकाच वेळी एकाच चेतनेशी जोडलेले लाखो-कोट्यवधी पुण्य आत्मे, एकत्र बोललेले शब्द, एकत्र जागृत झालेली ऊर्जा , हे खरोखरच अभूतपूर्व आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवकार महामंत्र दिवसाचे उद्घाटन

April 09th, 07:47 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत विज्ञान भवन येथे नवकार महामंत्र दिवसाचे उद्घाटन केले आणि त्यात सहभागी झाले. उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी नवकार मंत्राचा गूढ आध्यात्मिक अनुभव अधोरेखित केला तसेच मनामध्ये शांती आणि स्थैर्य आणण्याच्या त्याच्या क्षमतेवर भर दिला. शब्द आणि विचारांच्या पलीकडे जाणारी, मन आणि चेतनेत खोलवर प्रतिध्वनित होणारी शांतीची असाधारण भावना त्यांनी विशद केली. नवकार मंत्राचे महत्त्व अधोरेखित करताना मोदी यांनी त्यातील काही पवित्र श्लोक ऐकवले आणि हा मंत्र उर्जेचा एकीकृत प्रवाह असल्याचे सांगितले , जो स्थैर्य , समता आणि चेतना आणि आंतरिक प्रकाशाच्या सामंजस्यपूर्ण लयीचे प्रतीक आहे. आपले वैयक्तिक अनुभव कथन करताना , त्यांनी आपल्या अंतर्मनात नवकार मंत्राची आध्यात्मिक शक्ती कशी जाणवत आहे याबद्दल सांगितले. काही वर्षांपूर्वी बंगळुरूमध्ये अशाच एका सामूहिक जप कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याची आठवण त्यांनी सांगितली जिने त्यांच्यावर कायमस्वरूपी ठसा उमटवला. पंतप्रधानांनी देशभरातील आणि परदेशातील लाखो सद्गुणी आत्म्यांचे एकात्मिक चेतनेत एकत्र येणे हा अतुलनीय अनुभव असल्याचे अधोरेखित केले. त्यांनी सामूहिक ऊर्जा आणि समन्वित शब्दांबाबत बोलताना ते खरोखरच असाधारण आणि अभूतपूर्व असल्याचे नमूद केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीत 9 एप्रिल रोजी नवकार महामंत्र दिवस कार्यक्रमात होणार सहभागी

April 07th, 05:23 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी 9 एप्रिल रोजी नवी दिल्लीत नवकार महामंत्र दिवस कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. यावेळी ते उपस्थितांना संबोधित देखील करतील.

नवी दिल्लीत संपन्न होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाप्रसंगी पंतप्रधानांचे संबोधन

February 21st, 05:00 pm

संमेलनामध्ये उपस्थित ज्येष्ठ नेते श्री. शरद पवार, महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. तारा भवाळकर, माजी अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे, सर्व सदस्य आणि मराठी भाषेचे सर्व विद्वत्तजन आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन

February 21st, 04:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन केले. याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या मराठी भाषेच्या या भव्य सोहोळ्यात सर्व मराठी भाषिकांचे स्वागत केले. ते म्हणाले की अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणतीही भाषा अथवा प्रदेशापुरते सीमित नाही. ते पुढे म्हणाले की या संमेलनात महाराष्ट्र आणि देशाच्या स्वातंत्र्य चळवळीचे सार तसेच सांस्कृतिक वारसा अंतर्भूत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्प पश्चात भारतीय उद्योग महासंघाने नवी दिल्लीत आयोजित केलेल्या परिषदेला केलेले संबोधन

July 30th, 03:44 pm

सीआयआय चे अध्यक्ष संजीव पुरी जी, येथे उपस्थित असलेले सर्व उद्योग क्षेत्रातील दिग्गज सहकारी, वरिष्ठ मुत्सद्दी, दूरदृश्य प्रणालीद्वारे देशाच्या कानाकोपऱ्यातून सहभागी झालेले उद्योग आणि व्यापार क्षेत्रातील सर्व प्रतिनिधी, इतर सर्व मान्यवर, बंधू आणि भगिनींनो!

भारतीय उद्योग महासंघाने (सीसीआय) ने आयोजित केलेल्या ‘विकसित भारताकडे वाटचाल’ या परिषदेच्या उद्‌घाटन सत्राला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले संबोधित

July 30th, 01:44 pm

नवी दिल्लीत विज्ञान भवन येथे सीसीआय अर्थात भारतीय उद्योग महासंघाने ‘विकसित भारताच्या दिशेने वाटचाल’ या संकल्पनेवर आयोजित केलेल्या परिषदेच्या उद्‌घाटन सत्रात पंतपधान नरेंद्र मोदी यांनी आज संबोधित केले.अलीकडेच 2024-25 चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर आयोजित या परिषदेचा उद्देश विकासाबद्दलच्या सरकारच्या व्यापक दृष्टिकोनाची रूपरेषा आणि उद्योगाची भूमिका मांडणे हा होता.

पंतप्रधान दिनांक 30 जुलै रोजी भारतीय उद्योग महासघा (CII) द्वारे होणाऱ्या अर्थसंकल्पानंतरच्या परिषदेच्या उद्घाटन सत्राला करणार संबोधित

July 29th, 12:08 pm

'विकसित भारताकडे प्रवास: केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 नंतरची परिषद' या दिनांक 30 जुलै, 2024 रोजी दुपारी 12 वाजता विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे होणाऱ्या कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्राला पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार आहेत.

3 फेब्रुवारी रोजी सी. एल. ई. ए.- राष्ट्रकुल देशांच्या विधीज्ञ आणि महाधिवक्ता परिषद 2024 चे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणार.

February 02nd, 11:10 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 10 वाजता नवी दिल्लीतल्या विज्ञान भवनात आयोजित राष्ट्रकुल कायदे शिक्षण संघटना (सी. एल. ई. ए.)- राष्ट्रकुल देशांच्या विधीज्ञ आणि महाधिवक्ता परिषद (सी. ए. एस. जी. सी.) 2024 चे उद्घाटन करणार आहेत. पंतप्रधान यावेळी उपस्थितांना संबोधितही करतील.