जम्मू आणि काश्मीर क्रिकेट संघाने रणजी ट्रॉफी पहिल्यांदा जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन

February 28th, 07:03 pm

जम्मू आणि काश्मीर क्रिकेट संघाने रणजी ट्रॉफी पहिल्यांदा जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

पंतप्रधानांनी भारताच्या 19 वर्षांखालील क्रिकेट संघाचे विश्वचषक विजयाबद्दल केले अभिनंदन

February 06th, 09:33 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंडर-19 क्रिकेट संघाने विश्वचषक विजेतेपद पटकावल्याबद्दल त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीचे कौतुक केले आहे.

संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी पंतप्रधानांनी माध्यमांना दिलेल्या निवेदनाचा मजकूर

December 01st, 10:15 am

हे हिवाळी अधिवेशन केवळ एक नित्यनेमाने होणारी घटना नाही. हे अधिवेशन देशाच्या प्रगतीला गती देण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना ऊर्जा देईल, असा विश्वास मला वाटतो. भारत हा लोकशाही जगणारा देश आहे आणि आपण लोकशाहीवरील विश्वास दृढ करणाऱ्या मार्गांनी लोकशाहीबद्दल वाटणारा उत्साह वारंवार दाखवला आहे. बिहारमध्ये अलिकडेच झालेल्या निवडणुकीत जे विक्रमी मतदान झाले, ती लोकशाहीची खरी ताकद आहे. माता आणि भगिनींचा वाढता सहभाग ही नवीन आशा आणि आत्मविश्वास निर्माण करणारी महत्वाची बाब आहे. एकीकडे लोकशाहीची ताकद आणि या लोकशाही व्यवस्थेतील अर्थव्यवस्थेची ताकद यावर जग बारकाईने लक्ष ठेवून आहे. भारताने सिद्ध केले आहे, की लोकशाही चांगले परिणाम करू शकते. आज भारताची आर्थिक परिस्थिती ज्या वेगाने नवीन उंची गाठत आहे. हे केवळ आपल्यामध्ये नवीन आत्मविश्वास निर्माण करत नाही तर विकसित भारताच्या ध्येयाकडे वाटचाल करताना आपल्याला नवीन बळ देखील देते आहे.

2025 च्या हिवाळी अधिवेशनाचा प्रारंभ होण्यापूर्वी पंतप्रधानांनी दिलेले निवेदन

December 01st, 10:00 am

संसदेच्या 2025 च्या हिवाळी अधिवेशनाचा प्रारंभ होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संसदेच्या आवारात प्रसारमाध्यमांसमोर निवेदन केले. हे अधिवेशन केवळ एक औपचारिकता नसून, देशाच्या सध्याच्या वेगवाग प्रगतीच्या वाटचालीकरता ऊर्जेचा एक महत्त्वाचा स्रोत आहे, असे ते म्हणाले. हे अधिवेशन देशाच्या प्रगतीला अधिक गती देण्यासाठी सध्या सुरू असलेल्या प्रयत्नांना नवी ऊर्जा देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

त्रिनिदाद आणि टोबॅगोमधील निवडणूक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून कमला प्रसाद-बिसेसर यांचे अभिनंदन

April 29th, 03:02 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कमला प्रसाद-बिसेसर यांचे निवडणूक जिंकल्याबद्दल अभिनंदन केले. त्यांनी भारत आणि त्रिनिदाद आणि टोबॅगो यांच्यातील ऐतिहासिकदृष्ट्या घनिष्ट संबंधांवर भर दिला.

For me, the nation itself is divine and mankind is a reflection of the divine: PM Modi in Lex Fridman Podcast

March 16th, 11:47 pm

PM Modi interacted with Lex Fridman in a podcast about various topics ranging from fasting to his humble beginnings to AI and more. He stressed on the unifying power of sports and said that they connect people on a deeper level and energize the world. He remarked that the management of Indian elections should be studied worldwide.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका पॉडकास्टमध्ये लेक्स फ्रिडमन यांच्याशी साधला संवाद

March 16th, 05:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका पॉडकास्टच्या माध्यमातून आज अमेरिकी संगणक शास्त्रज्ञ लेक्स फ्रिडमन यांच्याशी विविध विषयांवर संवाद साधला. या मनमोकळ्या संभाषणादरम्यान जेव्हा पंतप्रधानांना विचारण्यात आले की ते उपवास का करतात आणि कशा पद्धतीने करतात तेव्हा मोदी यांनी पंतप्रधानांप्रती आदराचे प्रतीक म्हणून स्वतः उपवास धरण्याच्या लेक्स फ्रिडमन यांच्या कृतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. “भारतात धार्मिक परंपरा दैनंदिन जीवनासोबत खोलवर रुजलेल्या आहेत ,” असे पंतप्रधान म्हणाले. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेल्या अर्थानुसार, हिंदुत्व हे केवळ धार्मिक रीतीभातीविषयीचे तत्व नसून जीवनाला मार्गदर्शन करणारे तत्वज्ञान आहे असे त्यांनी सांगितले. उपवास हे शिस्त अंगी बाणवण्यासाठीचे तसेच आंतरिक आणि बाह्य आत्म्याचा समतोल साधण्यासाठीचे साधन आहे यावर मोदी यांनी अधिक भर दिला. उपवास केल्यामुळे आपल्या जाणीवा अधिक संवेदनशील तसेच जागरूक होऊन अधिक प्रखर बनतात असे त्यांनी नमूद केले. उपवासाच्या काळात कोणाकोणाला सूक्ष्म सुगंध आणि तपशील अधिक स्पष्टपणे जाणवतात असे निरीक्षण त्यांनी नोंदवले. उपवासामुळे विचार प्रक्रियेला वेग येऊन नवीन दृष्टीकोन सापडत जातात आणि चौकटीबाहेरच्या विचारांना प्रोत्साहन मिळते असे देखील पंतप्रधानांनी अधोरेखित केले. उपवास म्हणजे केवळ अन्न वर्ज्य करणे नव्हे तर त्यामध्ये मनाची तसेच शरीराची तयारी आणि विषारी तत्वांचे निःसारण करण्याची शास्त्रीय प्रक्रिया समाविष्ट आहे असे त्यांनी स्पष्ट केले. कितीतरी दिवस आधीच ते आयुर्वेदिक आणि योग प्रक्रियांचे अनुसरण करून ते उपवासासाठी त्यांच्या शरीराला सज्ज करतात यावर अधिक भर देऊन पंतप्रधान मोदी यांनी या काळात पाणी पीत राहण्याचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले की एकदा उपवास सुरु झाला की त्यानंतर ते त्याला भक्ती आणि स्वयंशिस्तीची कृती मानतात आणि त्या काळात सखोल आत्मचिंतन आणि लक्ष एकाग्र करण्यावर भर देतात. पंतप्रधान म्हणाले की त्यांच्या उपवासाचे मूळ वैयक्तिक अनुभवामध्ये असून त्यांच्या शालेय जीवनादरम्यान महात्मा गांधी यांच्या प्रेरणेतून सुरु झालेल्या चळवळीदरम्यान उपवास धरण्याची सुरुवात त्यांनी केली. त्यांच्या पहिल्याच उपवासादरम्यान त्यांना उर्जा आणि जागरुकता यामध्ये मोठी वाढ होत असल्याची अनुभूती आली आणि त्यातून उपवासाच्या परिवर्तनशील सामर्थ्याबद्दल त्यांची खात्री झाली असा अनुभव पंतप्रधानांनी सर्वांना सांगितला. उपवासामुळे त्यांच्या क्रिया मंद होत नाहीत तर उलट बहुतेकदा त्यांची उत्पादकता वाढते असे त्यांनी आवर्जून नमूद केले. ते म्हणाले की उपवासादरम्यान त्यांच्या विचारांचा ओघ अधिक मुक्तपणे आणि सर्जकतेसह वाहतो आणि त्यांच्यासाठी तो स्वतःला व्यक्त करण्याचा एक अतुलनीय अनुभव होऊन जातो.

अर्जेंटिनाच्या अध्यक्षीय निवडणुकीत विजय मिळवल्याबद्दल जेवियर माइली यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन

November 20th, 05:00 pm

अर्जेंटिनाच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्याबद्दल जेवियर माइली यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले.

आशियाई क्रीडास्पर्धा 2022 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंसोबतच्या संवादातील पंतप्रधानांच्या संबोधनाचा मजकूर

November 01st, 07:00 pm

तुम्हा सर्वांना भेटण्याच्या संधीचा मी शोध घेत असतो आणि वाट बघत असतो, कधी एकदा तुम्हाला भेटेन, तुमचे अनुभव कधी ऐकू शकेन आणि मी पाहिले आहे की प्रत्येक वेळी तुम्ही नव्या उमेदीने, नव्या उत्साहाने समोर येता आणि ही देखील एक मोठी प्रेरणा ठरते. त्यामुळे सर्वप्रथम मी तुम्हा सर्वांमध्ये फक्त एकाच कामासाठी आलो आहे आणि ते म्हणजे तुम्हा सर्वांचे अभिनंदन. तुम्ही भारताबाहेर होता, चीनमध्ये खेळत होता, पण कदाचित तुम्हाला माहीती नसेल, मी ही तुमच्यासोबत होतो. तुमच्या प्रत्येक हालचालीचा, तुमच्या प्रयत्नांचा, तु मच्या आत्मविश्वासाचा प्रत्येक क्षण मी इथे बसून जगत होतो. तुम्ही सर्वांनी ज्या प्रकारे देशाची प्रतिष्ठा उंचावली आहे ते खरोखरच अभूतपूर्व आहे. आणि त्यासाठी आम्ही तुमचे, तुमच्या प्रशिक्षकांचे आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांचे अभिनंदन करावे तितके थोडे आहे. आणि या ऐतिहासिक यशाबद्दल देशवासियांच्या वतीने मी तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन करतो, अनेकानेक शुभेच्छा देतो.

आशियाई पॅरा गेम्स 2022 मध्ये सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंच्या तुकडीला पंतप्रधानांनी केले संबोधित

November 01st, 04:55 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथील मेजर ध्यानचंद राष्ट्रीय क्रीडा संकुलामध्ये आशियाई पॅरा गेम्स, अर्थात दिव्यांगांसाठी आयोजित आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंच्या चमूशी संवाद साधला आणि त्यांना संबोधित केले. आशियाई पॅरा गेम्स 2022 मध्ये दिमाखदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचे अभिनंदन करण्‍यासाठी आणि त्यांना भविष्‍यातील स्पर्धांसाठी प्रेरणा देण्यासाठी पंतप्रधानांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता.

आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाच्या (FIDE) जागतिक ज्युनिअर रैपिड बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत मिळवलेल्या विजयाबद्दल रौनक साधवानीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन

October 14th, 01:55 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाने (FIDE) आयोजित केलेल्या जागतिक ज्युनिअर रैपिड बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा 2023 मध्ये मिळवलेल्या उल्लेखनीय विजयाबद्दल रौनक साधवानीचे अभिनंदन केले आहे.

आशिया चषक 2022 मध्ये पाकिस्तानच्या संघावर विजय मिळवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन

August 28th, 11:56 pm

आशिया चषक 2022 स्पर्धेत पाकिस्तान संघाविरुद्धच्या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन केले आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारतीय संघाने या सामन्यात उत्कृष्ट कौशल्य आणि संयमांचे प्रदर्शन केले आहे.

The government’s motto will be to be with everyone and for everyone’s development.

May 20th, 12:38 pm

The government’s motto will be to be with everyone and for everyone’s development.

Grand welcome for Narendra Modi in Delhi!

May 17th, 04:44 pm

Grand welcome for Narendra Modi in Delhi!

World Leaders greet Narendra Modi on record win

May 17th, 03:11 pm

World Leaders greet Narendra Modi on record win

People of India have voted for development, and this election has laid the foundation of Adhunik Bharat.

May 16th, 07:55 pm

People of India have voted for development, and this election has laid the foundation of Adhunik Bharat.

India Has Won!

May 16th, 01:02 pm

India Has Won!

Historic victory for NDA in 2014 Elections. Narendra Modi Tweets, "India has won! भारत की विजय। अच्छे दिन आने वाले हैं।" He seeks blessings from his Mother.

May 16th, 12:56 pm

Historic victory for NDA in 2014 Elections. Narendra Modi Tweets, India has won! भारत की विजय। अच्छे दिन आने वाले हैं। He seeks blessings from his Mother.

Shri Narendra Modi seeks blessings from mother

May 16th, 10:32 am

Shri Narendra Modi seeks blessings from mother

V for Varanasi, Vadodara and Victory!

March 23rd, 06:07 pm

V for Varanasi, Vadodara and Victory!