पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक क्रीडा कार्यक्रमानिमित्त मेलबर्न येथील क्रिकेट मैदानाला दिली भेट
July 10th, 08:21 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मेलबर्न क्रिकेट मैदानावर आयोजित भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील क्रीडा संबंधांना समर्पित कार्यक्रमाला भेट दिली. यावेळी त्यांच्यासमवेत ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज आणि व्हिक्टोरियाच्या प्रीमियर, जॅसिंटा ॲलन देखील उपस्थित होत्या. याशिवाय या कार्यक्रमाला स्टीव्ह वॉ आणि लिसा स्थळेकर यांच्यासह ऑस्टेलियातले इतर दिग्गज खेळाडू देखील उपस्थित होते. या भेटीमुळे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीमधील आधारस्तंभ असलेले क्रीडाक्षेत्र, सांस्कृतिक आदानप्रदान आणि लोकांमधील संबंध यांचे महत्त्व अधोरेखित झाले.सेशेल्सच्या स्वातंत्र्यदिनाच्या 50 व्या वर्धापनदिन सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले सहभागी.
June 29th, 08:00 am
सेशेल्सचे राष्ट्रपती महामहीम डॉ. पॅट्रिक हर्मिनी यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सेशेल्सच्या स्वातंत्र्यदिनाच्या 50 व्या वर्धापनदिन सोहळ्यात सन्माननीय अतिथी म्हणून सहभागी झाले. सेशेल्समधील स्वातंत्र्यदिन सोहळ्याला उपस्थित राहणारे ते पहिलेच भारतीय पंतप्रधान ठरले आहेत.भारत-सेशल्स उच्च स्तरीय व्हर्च्युअल कार्यक्रम (8 एप्रिल 2021)
April 07th, 06:02 pm
सेशेल्स येथे विविध भारतीय प्रकल्पांच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 एप्रिल 2021 रोजी सेशल्सच्या राष्ट्रपतींसमवेत उच्च स्तरीय आभासी कार्यक्रमात सहभागी होतील.