उत्तराखंडच्या स्थापनच्या रौप्य महोत्सवानिमित्त निमत्त डेहराडून इथल्या समारंभात पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा
November 09th, 01:00 pm
9 नोव्हेंबरचा हा दिवस एका दीर्घ तपस्येचे फळ आहे. आजचा दिवस आपण सर्वांसाठी अभिमानाची अनुभूती देणारा आहे. उत्तराखंडच्या देवतुल्य जनतेने अनेक वर्षांपासून जे स्वप्न पाहिले होते, ते अटलजींच्या सरकारच्या काळात, 25 वर्षांपूर्वी पूर्ण झाले होते, आणि आता गेल्या 25 वर्षांच्या प्रवासानंतर, आज उत्तराखंड ज्या उंचीवर पोहचले आहे, ते पाहून त्या प्रत्येक व्यक्तीला आनंद होणे स्वाभाविक आहे, ज्यांनी या सुंदर राज्याच्या निर्मितीसाठी संघर्ष केला होता. ज्यांचे पर्वतांवर प्रेम आहे, ज्यांना उत्तराखंडची संस्कृती, इथले नैसर्गिक सौंदर्य, देवभूमीच्या लोकांशी जिव्हाळा आहे, त्यांचे मन आज प्रफुल्लित आहे, ते आनंदित आहेत.डेहराडून येथे उत्तराखंड राज्याच्या स्थापनेच्या रौप्यमहोत्सवी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले संबोधित
November 09th, 12:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डेहराडूनमध्ये उत्तराखंडच्या स्थापनेच्या रौप्यमहोत्सवी सोहळ्याला संबोधित केले. या कार्यक्रमादरम्यान , पंतप्रधानांनी 8140 कोटी रुपये मूल्यांच्या विविध विकास प्रकल्पाची पायाभरणी आणि उद्घाटन केले. या समारोहाला संबोधित करताना, मोदी यांनी देवभूमी उत्तराखंडच्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या आणि सर्वांप्रती आदर, सन्मान आणि सेवाभाव व्यक्त केला.अरुणाचल प्रदेशात इटानगर इथे विकास प्रकल्पांच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
September 22nd, 11:36 am
हेलिपॅडवरुन इथं मैदानापर्यंत येणे, वाटेत इतक्या सगळ्या लोकांना भेटणे, लहान-लहान मुला-मुलींच्या हातात असलेला तिरंगा; अरुणाचलमधल्या या स्वागताने माझे ह्रदय आनंदाने, अभिमानाने भरुन आले आहे! आणि हे स्वागत इतके भव्य होते की मला इथे पोहोचायला उशीर झाला. उशीरा आल्याबद्दल मी तुम्हा सर्वांची क्षमा मागतो. अरुणाचलची ही भूमी सुर्योदयाची धरती आहेच; देशभक्तीच्या लाटेचीही धरती आहे. तिरंग्यावरचा पहिला रंग जसा केशरी आहे; तसाच अरुणाचलचा पहिला रंगदेखील केशरी आहे. इथला प्रत्येक माणूस शौर्याचे प्रतीक आहे, साधेपणाचे प्रतीक आहे. मी अरुणाचलमध्ये बरेच वेळा आलो आहे. राजकारणात सत्तेच्या प्रवाहात नव्हतो, तेव्हाही इथे आलो आहे; म्हणूनच इथल्या खूप साऱ्या आठवणी आहेत. त्या आठवून मलाही आनंद होतो. तुमच्या सगळ्यांसोबत घालवलेला प्रत्येक क्षण माझ्यासाठी एक आठवण असते. तुमचं इतकं प्रेम मला लाभलं; जीवनात यासारखं कोणतंही मोठं सुख नाही असे मी मानतो. तवांग मठ ते नमसाईतल्या सुवर्ण पगोडापर्यंतची ही अरुणाचलची भूमी शांती आणि संस्कृती यांचा संगम आहे. भारत मातेचा अभिमान आहे, या पुण्यभूमीला माझा सश्रद्ध नमस्कार.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरुणाचल प्रदेशातील इटानगर येथे 5,100 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकासकामांचे केले उद्घाटन आणि पायाभरणी
September 22nd, 11:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अरुणाचल प्रदेशातील इटानगर येथे 5,100 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकासकामांची पायाभरणी आणि उद्घाटन केले. याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी डोनयी पोलो यांना आदरांजली वाहिली आणि त्यांचे सर्वांना आशीर्वाद मिळावेत, अशी प्रार्थना केली.जपानच्या प्रशासनिक राज्यपालांशी संवादादरम्यान पंतप्रधानांनी केलेले मनोगत
August 30th, 08:00 am
या सभागृहात मला सैतामाची वेगवान धडपड जाणवते, मियागीचे जिद्दीपण जाणवते, फुकुओकाची चैतन्य आणि नाराच्या वारशाची सुगंधी झुळूक अनुभवायला मिळते. आपल्यामध्ये कुमामोतोची आत्मीयता आहे, नागानोची ताजेपणा आहे, शिझुओकाची रमणीयता आहे, आणि नागासाकीचे स्पंदन आहेत. आपण सर्व फुजी पर्वताच्या सामर्थ्याचे आणि साकुराच्या आत्म्याचे प्रतीक आहात. एकत्रितपणे आपण जपानला शाश्नत बनवत आहात.बिहारमधील मोतीहारी येथे विविध विकास कामांचा प्रारंभ करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
July 18th, 11:50 am
पवित्र श्रावण महिन्यामध्ये आपण बाबा सोमोश्वरनाथाच्या चरणी वंदन करीत आहोत आणि संपूर्ण बिहारवासियांचे जीवन सुखमय-शुभ व्हावे, यासाठी त्याने आपल्या सर्वांना आशीर्वाद द्यावेत, अशी प्रार्थना करीत आहोत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील मोतिहारी येथे 7,000 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विकासकामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन केले
July 18th, 11:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिहारमधील मोतिहारी येथे 7,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि राष्ट्रार्पण केले. पवित्र श्रावण महिन्यात बाबा सोमेश्वरनाथांच्या चरणी नमस्कार करत पंतप्रधानांनी आशीर्वाद मागितले आणि बिहारमधील सर्व नागरिकांच्या जीवनात आनंद आणि समृद्धी नांदो, अशी सदिच्छा व्यक्त केली. सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, ही चंपारणची भूमी आहे, या भूमीने इतिहासाला आकार दिला आहे. स्वातंत्र्य चळवळीदरम्यान, या भूमीने महात्मा गांधींना एक नवीन दिशा दिली. याच भूमीतील प्रेरणा आता बिहारचे नवे भविष्य घडवेल, असे ते म्हणाले. या विकास उपक्रमांसाठी त्यांनी उपस्थित असलेल्या सर्वांचे आणि बिहारच्या जनतेला अभिनंदन केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्रिनिदाद आणि टोबॅगो येथील भारतीय समुदायाला उद्देशून केलेले भाषण
July 04th, 05:56 am
आज संध्याकाळी तुम्हा सर्वांसोबत असणे माझ्यासाठी खूप अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. पंतप्रधान कमला जी यांच्या अद्भुत आदरातिथ्याबद्दल आणि दयाळू शब्दांबद्दल मी त्यांचे आभार मानतोपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्रिनिदाद आणि टोबॅगोमधील सामुदायिक कार्यक्रमाला संबोधित केले
July 04th, 04:40 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्रिनिदाद आणि टोबॅगोमधील विशाल भारतीय समुदायाच्या सभेला संबोधित केले. या कार्यक्रमाला रिपब्लिक ऑफ त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या पंतप्रधान, महामहीम कमला पेरसाद-बिसेसार, त्यांच्या मंत्रिमंडळाचे सदस्य, संसद सदस्य आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात पंतप्रधानांचे भारतीय समुदायाने अतिशय जिव्हाळ्याने स्वागत केले आणि त्यांना रंगीबेरंगी पारंपारिक इंडो-त्रिनिदादियन स्वागत सोहळ्याचा अनुभव देण्यात आला.जम्मू - काश्मीर मधील कटरा येथे विविध विकास प्रकल्पांच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
June 06th, 12:50 pm
जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा जी, मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी अश्विनी वैष्णव जी, जितेंद्र सिंह, व्ही सोमण्णा जी, उपमुख्यमंत्री सुरेंद्र कुमार जी, जम्मू काश्मीर विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुनील जी, संसदेतील माझे सहकारी जुगल किशोर जी, अन्य लोकप्रतिनिधिगण आणि माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो , वीर जोरावर सिंह जी यांची ही भूमी आहे , या भूमीला मी वंदन करतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जम्मू-काश्मीरमध्ये 46,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि लोकार्पण
June 06th, 12:45 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जम्मू-काश्मीरमधील कटरा येथे 46,000 कोटी रुपयांहून अधिक किंमतीच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि लोकार्पण केले. शूर वीर जोरावर सिंग यांच्या भूमीला अभिवादन करताना ते म्हणाले की आजचा कार्यक्रम हा भारताची एकता आणि दृढनिश्चयाचा भव्य उत्सव आहे. माता वैष्णो देवीच्या आशीर्वादाने, काश्मीर खोरे आता भारताच्या विशाल रेल्वे नेटवर्कशी जोडले गेले आहे, असे मोदी म्हणाले. “आपण नेहमीच काश्मीर ते कन्याकुमारी, असे भारत मातेचे वर्णन केले आहे, आपल्या रेल्वे नेटवर्कमध्येही हे वास्तव बनले आहे”, असे पंतप्रधान म्हणाले. उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लाईन प्रकल्प हे केवळ एक नाव नसून, जम्मू आणि काश्मीरच्या नवीन सामर्थ्याचे प्रतीक आहे आणि भारताच्या वाढत्या क्षमतेचा पुरावा आहे, यावर त्यांनी भर दिला. या भागात रेल्वे पायाभूत सुविधा आणि कनेक्टिव्हिटी वाढविण्याच्या वचनबद्धतेच्या अनुषंगाने, त्यांनी चिनाब आणि अंजी रेल्वे पुलांचे उद्घाटन केले आणि वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला, ज्यामुळे जम्मू-काश्मीरमधील कनेक्टिव्हिटी वाढेल.सन 2024-25 ते 2028-29 या आर्थिक वर्षांसाठी “व्हायब्रंट व्हिलेजेस प्रोग्राम-II (व्हीव्हीपी-II)” योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
April 04th, 03:11 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज व्हायब्रंट व्हिलेजेस प्रोग्राम-II (व्हीव्हीपी-II) योजनेला केंद्रीय क्षेत्र योजना (100% केंद्र निधी) म्हणून मान्यता देण्यात आली, ज्यामुळे 'सुरक्षित, नि:शंक आणि व्हायब्रंट भू सीमा' या विकसित भारत@2047 च्या दृष्टिकोनासाठीची वचनबद्धता आणखी वाढली. हा कार्यक्रम व्हीव्हीपी-I अंतर्गत आधीच समाविष्ट असलेल्या उत्तर सीमेव्यतिरिक्त, आंतरराष्ट्रीय भू सीमेला (आय एल बी) लागून असलेल्या गटांमधील गावांचा व्यापक विकास करण्यास मदत करेल.ईटी नाऊ जागतिक व्यापार परिषदेत पंतप्रधानांनी केलेले भाषण
February 15th, 08:30 pm
गेल्या वेळी मी ईटी समिट (जागतिक परिषद) मध्ये आलो होतो, तेव्हा निवडणुका होणार होत्या; आणि त्या वेळी मी तुम्हाला अगदी नम्रतेने सांगितले होते की, आमच्या तिसऱ्या कार्यकाळात भारत नव्या वेगाने काम करेल. आज हा वेग दिसत आहे, आणि देश त्याला समर्थनही देत आहे, याचा मला आनंद वाटतो. नवीन सरकार स्थापन झाल्यावर देशातील अनेक राज्यांमध्ये बीजेपी-एनडीएला जनतेचा सतत आशीर्वाद लाभत आहे. जून मध्ये ओदिशाच्या जनतेने विकसित भारताच्या संकल्पाला गती दिली, नंतर हरियाणाच्या जनतेने समर्थन दिले आणि आता दिल्ली मधील लोकांनी आम्हाला मोठे समर्थन दिले आहे. विकसित भारताच्या उद्दिष्ट पूर्तीसाठी देशातील जनता आज कशी खांद्याला खांदा लावून काम करत आहे, याची ही पावती आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईटी नाऊ ग्लोबल बिझनेस समिट 2025 ला केले संबोधित
February 15th, 08:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ईटी नाऊ ग्लोबल बिझनेस समिट 2025 अर्थात उद्योग व्यवसायविषयक जागतिक शिखर परिषद 2025 ला संबोधित केले. या शिखर परिषदेच्या याआधीच्या पर्वालाही आपण संबोधित केले होते, आणि त्यावेळी आपण आपल्या तिसऱ्या कार्यकाळात भारत नव्या वेगाने काम करेल असे नम्रपणे नमूद केले होते याचे स्मरण पंतप्रधानांनी यावेळी करून दिले. त्यानुसार आता भारताने पकडलेली नवी गती सर्वांना दिसून येत असल्याचेही त्यांनी सांगितले. या सर्व प्रक्रियेला देशभरातून पाठबळ मिळत असल्याबद्दलही पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केले. ओदिशा, महाराष्ट्र, हरयाणा आणि नवी दिल्लीतल्या जनतेने विकसित भारताबद्दलच्या वचनबद्धतेला प्रचंड प्रमाणात पाठबळ दर्शवल्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे आभारही मानले. जनतेचे हे पाठबळ म्हणजे देशातली जनता विकसित भारताच्या संकल्प पूर्ततेसाठी खांद्याला खांदा लावून काम करत असल्याचेच द्योतक आहे असे पंतप्रधान म्हणाले.राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक ठरावावरच्या चर्चेला पंतप्रधानांनी राज्यसभेत दिलेले उत्तर
February 06th, 04:21 pm
आदरणीय राष्ट्रपती जी यांनी भारताच्या कामगिरीविषयी,जगाच्या भारताकडून असलेल्या अपेक्षांविषयी आणि भारताच्या जनसामान्यांचा आत्मविश्वास, विकसित भारत हा संकल्प या सर्व विषयांवर विस्तृत चर्चा केली आहे आणि देशाला आगेकूच करण्यासाठी दिशाही दाखवली आहे. आदरणीय राष्ट्रपती जी यांचे भाषण प्रेरकही होते, प्रभावीही होते आणि भविष्यासाठी काम करण्याकरिता आम्हा सर्वांसाठी मार्गदर्शन करणारेही होते. आदरणीय राष्ट्रपती जी यांच्या संबोधनासाठी धन्यवाद देण्याकरिता मी उपस्थित आहे.Prime Minister Shri Narendra Modi’s reply to the Motion of Thanks on the President’s Address in Rajya Sabha
February 06th, 04:00 pm
PM Modi, replying to the Motion of Thanks on the President’s Address in Rajya Sabha, highlighted India’s development journey under his government since 2014. He emphasized Sabka Saath, Sabka Vikas as the guiding principle, focusing on inclusive growth, SC/ST/OBC empowerment, Nari Shakti, and economic self-reliance through initiatives like MUDRA and PM Vishwakarma Yojana.We launched the SVAMITVA Yojana to map houses and lands using drones, ensuring property ownership in villages: PM
January 18th, 06:04 pm
PM Modi distributed over 65 lakh property cards under the SVAMITVA Scheme to property owners across more than 50,000 villages in over 230 districts across 10 states and 2 Union Territories. Reflecting on the scheme's inception five years ago, he emphasised its mission to ensure rural residents receive their rightful property documents. He expressed that the government remains committed to realising Gram Swaraj at the grassroots level.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वामित्व लाभार्थ्यांसोबत साधला संवाद
January 18th, 05:33 pm
मध्य प्रदेशातील सिहोर येथील स्वामित्व लाभार्थी मनोहर मेवाडा यांच्यासोबत संवाद साधताना पंतप्रधानांनी त्यांना स्वामित्व योजनेविषयीचा त्यांचा अनुभव विचारला. मालमत्तेच्या कागदपत्रांमुळे त्यांनी कशा प्रकारे कर्ज मिळवले आणि त्यामुळे त्यांच्या जीवनात कशा प्रकारे बदल झाला आहे, असे पंतप्रधानांनी मनोहर यांना विचारले. त्यावर आपल्या डेरी फार्मसाठी 10 लाख रुपयांचे कर्ज घेतल्याची आणि त्यामुळे आपला व्यवसाय सुरू करता आल्याची माहिती मनोहर यांनी दिली. आपली मुले आणि पत्नी देखील या डेरी फार्ममध्ये काम करत आहेत आणि यामुळे अतिरिक्त उत्पन्न मिळत आहे असे मनोहर यांनी सांगितले.मालमत्तेची कागदपत्रे असल्यामुळे बँकेकडून कर्ज मिळवणे सोपे झाले असे मनोहर यांनी अधोरेखित केले. केंद्र सरकारी योजनांमुळे लोकांच्या जीवनातील अडचणी कमी झाल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. स्वामित्व योजनेमुळे लाखो कुटुंबांच्या उत्पन्नात वाढ झाली असल्याचे पाहून आपल्याला आनंद झाला असल्याचे पंतप्रधान म्हणाले. प्रत्येक नागरिकाने त्याची मान अभिमानाने उंचवावी आणि त्याच्या जीवनात सुलभता अनुभवावी हे सुनिश्चित करण्याला सरकारचे प्राधान्य असल्यावर त्यांनी भर दिला. याच दृष्टीकोनाचा स्वामित्व योजना ही विस्तार असल्याचे त्यांनी सांगितले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमध्ये स्वामित्व योजने अंतर्गत 65 लाखांपेक्षा जास्त प्रॉपर्टी कार्ड्सचे केले वितरण
January 18th, 12:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 10 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमध्ये 230 जिल्ह्यांमधील 50,000 पेक्षा जास्त गावांमध्ये मालमत्ता धारकांना दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून स्मामित्व योजने अंतर्गत 65 लाखांपेक्षा जास्त प्रॉपर्टी कार्ड्सचे वितरण केले. भारतामधील गावे आणि ग्रामीण भागांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे, असे त्यांनी या कार्यक्रमाला संबोधित करताना सांगितले आणि सर्व लाभार्थी आणि नागरिकांना या निमित्ताने शुभेच्छा दिल्या. ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांना त्यांची प्रॉपर्टी कार्ड्स मिळतील हे सुनिश्चित करण्यासाठी पाच वर्षांपूर्वी स्वामित्व योजना सुरू करण्यात आली, असे पंतप्रधान म्हणाले. विविध राज्यांमध्ये मालमत्ता मालकी प्रमाणपत्रांना घरोनी, अधिकार अभिलेख, प्रॉपर्टी कार्ड, मालमत्ता पत्रक आणि आवासीय भूमी पत्ता यांसारख्या विविध नावांनी ओळखले जाते असे त्यांनी नमूद केले.आयएनएस सुरत,आयएनएस निलगिरी आणि आयएनएस वाघशीर यांचा नौदलात समावेश करण्याप्रसंगी पंतप्रधानांचे संबोधन
January 15th, 11:08 am
महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन जी, महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, मंत्रिमंडळातले माझे वरिष्ठ सहकारी राजनाथ सिंह जी, संजय सेठ जी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, त्यांच्यासमवेत आज दोन्ही उपमुख्यमंत्रीही आहेत,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी, अजीत पवार जी, सीडीएस,सीएनएस, नौदलाचे सर्व सहकारी, माझगाव गोदी मध्ये काम करणारे सर्व सहकारी, इतर अतिथी वर्ग,महिला आणि पुरुष वर्ग,