पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय आर्य महासंमेलन 2025 ला संबोधित केले

October 31st, 06:08 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली मध्ये रोहिणी येथे आंतरराष्ट्रीय आर्य महासंमेलन 2025 ला संबोधित केले. या प्रसंगी बोलताना मोदी म्हणाले की, आत्ताच ऐकलेल्या मंत्रांची ऊर्जा आपल्या सर्वांना अजूनही जाणवत आहे. आपण जेव्हा अशा संमेलनात येतो तेव्हा आपल्याला दैवी आणि विलक्षण अनुभव येतो, असे त्यांनी अधोरेखित केले. त्यांनी या भावनेचे श्रेय स्वामी दयानंद यांच्या आशीर्वादाला दिले. पंतप्रधानांनी स्वामी दयानंद यांच्या आदर्शांबद्दल आदर व्यक्त केला. उपस्थित सर्व विचारवंतांबरोबरच्या अनेक दशकांच्या जिव्हाळ्याच्या संबंधांमुळे आपल्याला वारंवार त्यांच्यामध्ये येण्याची संधी मिळत असल्याचे ते म्हणाले. त्यांनी सांगितले की जेव्हा ते त्यांना भेटतात आणि त्यांच्याशी संवाद साधतात तेव्हा त्यांच्या मनात एक वेगळीच ऊर्जा आणि एक अनोखी प्रेरणा निर्माण होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ (127 वा भाग) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद

October 26th, 11:30 am

अशा कठीण काळात सुमारे वीस वर्षांचा एक युवक या अन्यायाविरुद्ध उभा राहिला. आज मी या तरुणाबद्दल एका खास कारणासाठी चर्चा करत आहे. त्याचे नाव उघड करण्यापूर्वी मी तुम्हाला त्याच्या शौर्याबद्दल सांगेन. मित्रांनो, त्या काळात जेव्हा निजामाविरुद्ध एकही शब्द बोलणे गुन्हा मानले जात असे, तेव्हा या तरुणाने सिद्दीकी नावाच्या निजामाच्या अधिकाऱ्याला उघडपणे आव्हान दिले. निजामाने सिद्दीकी नावाच्या अधिकाऱ्याला शेतकऱ्यांचं पीक जप्त करण्यासाठी पाठवलं होते. परंतु अत्याचाराविरुद्धच्या या संघर्षात त्या तरुणानं सिद्दीकीची हत्या केली. तो अटकेपासून स्वतः ला वाचवण्यातही यशस्वी झाला. निजामाच्या जुलमी पोलिसांपासून सुटका करून घेऊन तो तरुण शेकडो किलोमीटर अंतरावर असलेल्या आसाममध्ये पोहोचला.

नवी दिल्लीत ज्ञान भारतम् वरील आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये पंतप्रधानांनी केलेले संबोधन

September 12th, 04:54 pm

आज विज्ञान भवन भारताच्या सुवर्ण भूतकाळाच्या पुनरुज्जीवनाचा साक्षीदार बनत आहे. काही दिवसांपूर्वीच, मी ज्ञान भारतम् अभियानाची घोषणा केली होती. आणि आज, इतक्या कमी वेळात, आपण ज्ञान भारतम् आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करत आहोत. त्याचे संकेतस्थळही नुकतेच सुरू करण्यात आले आहे. हा काही सरकारी किंवा शैक्षणिक कार्यक्रम नाही; ज्ञान भारतम् अभियान ही भारताची संस्कृती, साहित्य आणि चेतनेची घोषणा बनत आहे. हजारो पिढ्यांचे चिंतन, भारताचे महान ऋषीमुनी, आचार्य आणि विद्वानांचे ज्ञान आणि संशोधन, आपली ज्ञान परंपरा, आपला वैज्ञानिक वारसा, हे सर्व आपण ज्ञान भारतम् अभियानाद्वारे डिजिटल स्वरूपात आणणार आहोत. मी या अभियानासाठी सर्व देशवासियांचे अभिनंदन करतो. मी ज्ञान भारतमच्या संपूर्ण चमूला आणि संस्कृती मंत्रालयालाही शुभेच्छा देतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीत ज्ञान भारतमवरील आंतरराष्ट्रीय परिषदेला केले संबोधित

September 12th, 04:45 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे ग्यान भारतम या आंतरराष्ट्रीय परिषदेला संबोधित केले.या प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी सांगितले की, आज विज्ञान भवन भारताच्या सोनेरी भूतकाळाचे पुनरुत्थान पाहत आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी ग्यान भारतम मिशनची घोषणा केली होती आणि इतक्या कमी कालावधीत ही ग्यान भारतम आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे, असे त्यांनी अधोरेखित केले. या मिशनशी संबंधित पोर्टलचेही उद्घाटन केल्याची मोदी यांनी माहिती दिली. हा कोणताही सरकारी किंवा शैक्षणिक कार्यक्रम नसून, ग्यान भारतम मिशन हे भारताची संस्कृती, साहित्य आणि चेतना यांचा उद्घोष बनेल, असे पंतप्रधानांनी नमूद केले. त्यांनी हजारो पिढ्यांच्या चिंतनशील परंपरेवर विचार व्यक्त केले. त्यांनी भारताच्या महान ऋषी, आचार्य आणि विद्वानांच्या ज्ञान आणि संशोधनाचा गौरव केला, तसेच भारताची ज्ञान परंपरा आणि वैज्ञानिक वारसा यावर भर दिला. मोदी म्हणाले की, ग्यान भारतम मिशनच्या माध्यमातून हा वारसा डिजिटाइज केला जात आहे. त्यांनी या मिशनसाठी सर्व नागरिकांचे अभिनंदन केले आणि संपूर्ण ग्यान भारतम टीम तसेच संस्कृती मंत्रालयाला शुभेच्छा दिल्या.

श्री नारायण गुरु आणि गांधीजी यांच्यातील संवादाच्या शताब्दीनिमित्त आयोजित समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण

June 24th, 11:30 am

आज हा परिसर देशाच्या इतिहासातील एका अभूतपूर्व घटनेचे स्मरण करण्याचा साक्षीदार होतो आहे. ती एक अशी ऐतिहासिक घटना होती, ज्या घटनेने आपल्या स्वातंत्र्य चळवळीला केवळ एक नवीन दिशा दिली नाही तर स्वातंत्र्याच्या उद्दिष्टाला, स्वतंत्र भारताच्या स्वप्नाला ठोस अर्थ दिला. शंभर वर्षांपूर्वीची श्री नारायण गुरु आणि महात्मा गांधी यांची ती भेट आजही तितकीच प्रेरणादायी आणि प्रासंगिक आहे. शंभर वर्षांपूर्वी झालेली ती भेट आजही सामाजिक सौहार्द आणि विकसित भारताच्या सामूहिक उद्दिष्टांसाठी उर्जेचा एक मोठा स्रोत आहे. या ऐतिहासिक प्रसंगी, मी श्री नारायण गुरुंच्या चरणी प्रणाम करतो. गांधीजींनाही मी आदरांजली वाहतो.

श्री नारायण गुरू आणि महात्मा गांधी यांच्यातील ऐतिहासिक संवादाच्या शताब्दी समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले संबोधित

June 24th, 11:00 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील विज्ञान भवनात भारताचे दोन महान आध्यात्मिक आणि नैतिक नेते श्री नारायण गुरू आणि महात्मा गांधी यांच्यातील ऐतिहासिक संवादाच्या शताब्दी समारंभाला संबोधित केले. या प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी आदरपूर्वक अभिवादन केले आणि सांगितले की आज हे ठिकाण देशाच्या इतिहासातील एका अभूतपूर्व क्षणाचे साक्षीदार आहे. आपल्या स्वातंत्र्यचळवळीला नवी दिशा देणारी ही एक ऐतिहासिक घटना होती, स्वतंत्र भारताच्या स्वप्नाला आणि स्वातंत्र्याच्या उद्दिष्टांना तिने ठोस अर्थ दिला,असे त्यांनी सांगितले. श्री नारायण गुरू आणि महात्मा गांधी यांच्यात 100 वर्षांपूर्वी झालेली ही भेट आजही प्रेरणादायी आणि प्रासंगिक आहे, आणि सामाजिक सलोखा आणि विकसित भारताच्या सामूहिक उद्दिष्टांसाठी उर्जेचा एक शक्तिशाली स्रोत आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. या ऐतिहासिक प्रसंगी, त्यांनी श्री नारायण गुरूंच्या चरणी वंदन केले आणि महात्मा गांधींना आदरांजली वाहिली.

अहमदाबाद येथील रामकृष्ण मठात आयोजित कार्यक्रमाला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करताना पंतप्रधानांच्या भाषणाचा मजकूर

December 09th, 01:30 pm

परमपूज्य श्रीमत् स्वामी गौतमानंद जी महाराज, रामकृष्ण मठ आणि मिशनचे देश-विदेशातून आलेले आदरणीय संत, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल, या कार्यक्रमाशी संबंधित इतर सर्व मान्यवर,आणि सभ्य स्त्री-पुरूषहो, नमस्कार!

पंतप्रधानांनी गुजरातमध्ये रामकृष्ण मठाद्वारे आयोजित कार्यक्रमाला केले संबोधित

December 09th, 01:00 pm

गुजरातमध्ये रामकृष्ण मठात आयोजित कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित केले. यावेळी बोलताना त्यांनी पूजनीय श्रीमद स्वामी गौतमानंद जी महाराज यांच्यासह, रामकृष्ण मठ आणि मिशन संस्थेच्या देशविदेशातील आदरणीय संतांप्रती तसेच गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि अन्य मान्यवरांप्रती अभीष्टचिंतन व्यक्त केले. तसेच माता शारदादेवी, गुरुदेव रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद यांना पंतप्रधान मोदी यांनी आदरांजली वाहिली. आजचा कार्यक्रम श्रीमद स्वामी प्रेमानंद महाराज यांच्या जयंतीदिनी आयोजित केला असल्याचा उल्लेखही करत त्यांनी त्यांनाही आदरांजली अर्पण केली.

पहिल्या आंतरराष्ट्रीय सौर महोत्सवासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला संदेश

September 05th, 11:00 am

आदरणीय मान्यवर, विशेष अतिथीगण आणि माझ्या प्रिय मित्रांनो, तुम्हा सर्वांना माझ्या हार्दिक शुभेच्छा. पहिल्या आंतरराष्ट्रीय सौर महोत्सवात तुम्हा सर्वांचे स्वागत करताना मला आनंद होत आहे. या अनोख्या उपक्रमासाठी मी आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचे अभिनंदन करतो.