उत्तर प्रदेशातील राष्ट्रीय महामार्ग-19 आणि वाराणसी रिंग रोड दरम्यान NH (O) अंतर्गत 14447.64 कोटी रुपयांच्या एकूण भांडवली खर्चासह 'हायब्रिड ॲन्युइटी मॉडेल' नुसार 6 पदरी 'ग्रीनफील्ड' उन्नत मार्गिका, रॅम्प्स/लूप्स आणि पादचारी पुलाच्या विकासाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
July 15th, 04:53 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने आज उत्तर प्रदेशातील वाराणसी शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी, राष्ट्रीय महामार्ग-19 आणि वाराणसी रिंग रोड दरम्यान एका 'लिंक/कनेक्टर कॉरिडॉर'च्या विकासाला मंजुरी दिली आहे. याद्वारे गंगा नदीच्या किनाऱ्यालगत कनेक्टिव्हिटी साधली जाईल. 46.039 किमी लांबीच्या या प्रकल्पामध्ये सहा-पदरी उन्नत मुख्य मार्ग, एक शानदार 'केबल-स्टेड' पूल, 'एक्स्ट्राडोज्ड' पादचारी पूल-सह-प्रमुख पूल (Foot Over Bridge-cum-Major Bridge), लूप्स, रॅम्प्स, लिंक रोड आणि सर्व्हिस रोड यांचा समावेश आहे. हा प्रकल्प 'हायब्रिड ॲन्युइटी मॉडेल' अंतर्गत आणि NH(O) योजनेद्वारे एकूण 14,447.64 कोटी रुपयांच्या भांडवली खर्चासह पूर्ण केला जाईल. या खर्चात 6,037.85 कोटी रुपयांचा स्थापत्य बांधकाम खर्च (ज्यात युटिलिटी शिफ्टिंगचा समावेश आहे, परंतु जीएसटीचा समावेश नाही) आणि 541.11 कोटी रुपयांचा भूसंपादन खर्च समाविष्ट आहे.उत्तर प्रदेशात वरुणा नदीच्या काठावर 6/4 पदरी उन्नत मार्गिका आणि त्याचे रॅम्प/ वर्तुळाकार वळण रस्त्यांच्या विकासाला, 'हायब्रिड ॲन्युइटी मॉडेल' (Hybrid Annuity Model) अंतर्गत आणि एकूण भांडवली खर्चासह 10,998.32 कोटी रुपये खर्चाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
July 15th, 04:47 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने आज, उत्तर प्रदेशातील वाराणसी शहरात होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग क्र. 31 आणि वरुणा नदीच्या काठाने जाणारा वाराणसी रिंग रोड याना जोडणाऱी 43.218 किलोमीटर लांबीची मार्गिका विकसित करण्यासाठी मंजुरी दिली आहे. या प्रकल्पामध्ये प्रामुख्याने 6/4 पदरी उन्नत मार्गिकांचा समावेश असून, यात, मुख्य रस्ता, उड्डाणपूल, वळण मार्ग, रॅम्प आणि सेवा रस्त्यांचा समावेश आहे. हा प्रकल्प ‘भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणा’मार्फत, हायब्रिड ॲन्युइटी मॉडेल' (HAM) अंतर्गत राबवण्यात येईल. या प्रकल्पाचा एकूण भांडवली खर्च 10,998.32 कोटी रुपये इतका असून, यामध्ये 4,565.33 कोटी रुपयांचा स्थापत्य बांधकाम खर्च आणि 934.91 कोटी रुपयांच्या भूसंपादन खर्चाचा समावेश आहे.वाराणसी - पंडित दीनदयाळ उपाध्याय (DDU) जंक्शन रेल्वे मार्गावर अतिरिक्त रेल्वे मार्गिका उभारण्यासह, गंगा नदीवरील नवीन रेल्वे तसेच रस्ते मार्ग पूल (rail-cum-road bridge) उभारण्याच्या प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
October 16th, 03:18 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत रेल्वे मंत्रालयाद्वारे प्रस्तावित 2,642 कोटी रुपये (अंदाजे) इतक्या एकूण अंदाजित खर्चाच्या एका प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली. आज मंजुरी दिलेला प्रस्तावित प्रकल्प बहुपदरी - मार्गिकांविषयीचा (multi - tracking) असून, या प्रकल्पामुळे रेल्वेचे परिचालन सुलभ होणार असून, त्यामुळे गर्दीचे प्रमाणही कमी होऊ शकणार आहे. या प्रकल्पाअंतर्गत भारतीय रेल्वेमार्गावरील सर्वाधिक वर्दळ असलेल्या विभागांमधील आवश्यक पायाभूत सोयी सुविधांचा विकास केला जाणार आहे. हा प्रकल्प उत्तर प्रदेशातील वाराणसी आणि चंदौली जिल्ह्यांतर्गत राबवला जाणार आहे.