उत्तर प्रदेशात वरुणा नदीच्या काठावर 6/4 पदरी उन्नत मार्गिका आणि त्याचे रॅम्प/ वर्तुळाकार वळण रस्त्यांच्या विकासाला, 'हायब्रिड ॲन्युइटी मॉडेल' (Hybrid Annuity Model) अंतर्गत आणि एकूण भांडवली खर्चासह 10,998.32 कोटी रुपये खर्चाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
July 15th, 04:47 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने आज, उत्तर प्रदेशातील वाराणसी शहरात होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग क्र. 31 आणि वरुणा नदीच्या काठाने जाणारा वाराणसी रिंग रोड याना जोडणाऱी 43.218 किलोमीटर लांबीची मार्गिका विकसित करण्यासाठी मंजुरी दिली आहे. या प्रकल्पामध्ये प्रामुख्याने 6/4 पदरी उन्नत मार्गिकांचा समावेश असून, यात, मुख्य रस्ता, उड्डाणपूल, वळण मार्ग, रॅम्प आणि सेवा रस्त्यांचा समावेश आहे. हा प्रकल्प ‘भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणा’मार्फत, हायब्रिड ॲन्युइटी मॉडेल' (HAM) अंतर्गत राबवण्यात येईल. या प्रकल्पाचा एकूण भांडवली खर्च 10,998.32 कोटी रुपये इतका असून, यामध्ये 4,565.33 कोटी रुपयांचा स्थापत्य बांधकाम खर्च आणि 934.91 कोटी रुपयांच्या भूसंपादन खर्चाचा समावेश आहे.पंतप्रधान 11 एप्रिल रोजी उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशला भेट देणार आहेत
April 09th, 09:43 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 एप्रिल रोजी उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशचा दौरा करतील. ते वाराणसीला जातील आणि सकाळी 11 वाजता 3,880 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करतील. ते एका जाहीर सभेला देखील संबोधित करतील.