The resolution of a 'Viksit Bharat' will definitely be fulfilled: PM Modi in Mann Ki Baat
December 28th, 11:30 am
In the year’s final Mann Ki Baat episode, PM Modi said that in 2025, India made its mark in national security, sports, science laboratories and global platforms. He expressed hope that the country is ready to move forward in 2026 with fresh resolutions. The PM also highlighted youth-centric initiatives such as the Viksit Bharat Young Leaders Dialogue, Quiz competition, Smart India Hackathon 2025 and Fit India Movement.हिंदुस्तान टाइम्स लीडरशिप शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
December 06th, 08:14 pm
येथे हिंदुस्तान टाइम्स शिखर परिषदेत देश-विदेशातील अनेक मान्यवर उपस्थित आहेत. आयोजकांचे आणि ज्यांनी आपले विचार मांडले त्या सर्व सहकाऱ्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो. थोड्याच वेळापूर्वी शोभना जींनी दोन मुद्दे मांडले, जे मी विशेष लक्षात घेतले आहेत. एक म्हणजे त्यांनी सांगितले की मागच्या वेळी मोदीजी आले होते, तेव्हा त्यांनी एक सूचना दिली होती. या देशात माध्यम संस्थांनी काय काम करावे, हे सांगण्याचे धैर्य कोणीही करू शकत नाही. पण मी ते केले होते, आणि मला आनंद आहे की शोभनाजी आणि त्यांच्या टीमने ते काम मोठ्या आवडीने केले. आणि देशाला – मी आत्ताच प्रदर्शन पाहून आलो – मी सर्वांना विनंती करतो की प्रदर्शन नक्की पाहा. या छायाचित्रकार सहकाऱ्यांनी त्या क्षणांना असे टिपले आहे की ते क्षण अमर झाले आहेत. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली आणि तीही मी ज्या शब्दांत समजलो, त्यांनी म्हटले की तुम्ही पुढेही… त्या असेही म्हणू शकल्या असत्या की तुम्ही पुढेही देशाची सेवा करत राहा, पण हिंदुस्तान टाइम्सने असे म्हटले की तुम्ही पुढेही अशीच सेवा करत राहा, यासाठी मी विशेष आभार व्यक्त करतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीत आयोजित हिंदुस्तान टाईम्स लीडरशिप समिट 2025 या शिखर परिषदेला केले संबोधित
December 06th, 08:13 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत आयोजित हिंदुस्तान टाईम्स लीडरशिप समिट 2025 या शिखर परिषदेला संबोधित केले. त्यांनी संमेलनात उपस्थित असलेल्या देशातील आणि परदेशातील अनेक मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीची दखलपूर्ण नोंद घेतली. त्यांनी आयोजकांना तसेच या परिषदेत आपले विचार मांडलेल्या सर्वांना अभिनंदनपर शुभेच्छाही दिल्या. शोभना यांनी उल्लेख केलेल्या दोन मुद्द्यांची आपण काळजीपूर्वक नोंद घेतली असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले. त्यांनी आपल्या मागील भेटीचा संदर्भ दिला, त्यावेळी आपण त्यांना माध्यम समुहांतर्फे क्वचितच हाती घेतल्या जाणार्या गोष्टीबद्दल सुचवले होते याची आठवण त्यांनी करून दिली, आणि या समुहाने ते केले, असेही त्यांनी नमूद केले. शोभना आणि त्यांच्या चमूने उत्साहाने आपली सूचना पूर्ण केल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. जेव्हा आपण प्रदर्शनाला भेट दिली, तेव्हा छायाचित्रकारांनी क्षण अशा पद्धतीने टिपले की ते अमर झाल्यासारखे वाटले असे ते म्हणाले. आपण ते प्रदर्शन पाहिले असून, सर्वांनी ते पाहावे, असे आवाहन त्यांनी केले. शोभना यांनी उल्लेख केलेल्या दुसर्या मुद्याच्या संदर्भानेही त्यांनी भाष्य केले. त्यांचे म्हणणे म्हणजे केवळ आपण देशाची सेवा करत राहावी अशी इच्छा नाही, तर हिंदुस्तान टाईम्सनेच आपण त्याच पद्धतीने सेवा करत राहावे, असे म्हटले आहे, असे म्हणत याबद्दल त्यांनी विशेष कृतज्ञताही व्यक्त केली.पंतप्रधानांनी वेदमूर्ती देवव्रत महेश रेखे यांनी दंडक्रम पारायण पूर्ण केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले
December 02nd, 01:03 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेदमूर्ती देवव्रत महेश रेखे यांचे दंडक्रम पारायण पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन केले आहे. शुक्ल यजुर्वेदाच्या मध्यंदिनी शाखेचे 2000 मंत्र 50 दिवसांत कोणताही खंड न पाडता म्हणणे याला दंडक्रम पारायण असे म्हंटले जाते. वेदमूर्ती देवव्रत महेश रेखे यांचे वय फक्त 19 वर्षे असून त्यांनी केलेल्या या कामाबद्दल त्यांची आठवण येणाऱ्या अनेक पिढ्या ठेवतील, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. त्यांनी पुढे म्हटले आहे, “ हे अद्वितीय कार्य काशीच्या पवित्र नगरीत पार पडले याचा काशी नगरीचा खासदार म्हणून मला खूप आनंद झाला आहे. त्याच्या कुटुंबियांना , तसेच त्याच्या पाठीशी असलेल्या देशभरातील साधू, संत , पंडित तसेच अनेक संस्थांना माझा प्रणाम !”राज्यसभेचे सभापती थिरू सी पी राधाकृष्णन् यांच्या सन्मानार्थ पंतप्रधानांनी केले भाषण
December 01st, 11:15 am
हिवाळी अधिवेशनाचा आरंभ होत आहे आणि आज सभागृहातील आम्हा सर्व माननीय सदस्यांसाठी हा अभिमानाचा क्षण आहे. तुमचे स्वागत करणे आणि तुमच्या मार्गदर्शनाखाली सभागृहाच्या माध्यमातून देशाला प्रगतीच्या मार्गावर नेण्यासाठी महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा, महत्त्वपूर्ण निर्णय आणि त्यात तुमचे अमूल्य मार्गदर्शन आम्हा सर्वांसाठी एक खूप मोठी संधी आहे. मी सभागृहाच्या वतीने आणि माझ्या वतीने, तुमचे खूप खूप अभिनंदन करतो, तुमचे स्वागत करतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि मी तुम्हाला विश्वासही देतो की या सभागृहात बसलेले सर्व माननीय सदस्य, या वरिष्ठ सभागृहाची प्रतिष्ठा जपतील आणि तुमच्या प्रतिष्ठेची देखील नेहमीच काळजी घेतील, मर्यादा राखतील. हे मी तुम्हाला आश्वासन देतो.राज्यसभेचे सभापती थिरू सी. पी. राधाकृष्णन यांच्या सत्कार समारंभादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण
December 01st, 11:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांचे आज प्रथमच राज्यसभेचे अध्यक्षपद भूषवत असल्याबद्दल स्वागत केले. राज्यसभेच्या सर्व माननीय सदस्यांसाठी हा क्षण अभिमानाचा असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. सभापतींचे मनःपूर्वक स्वागत करताना मोदी म्हणाले, सभागृहाच्या वतीने आणि माझ्या स्वतःच्या वतीने, मी तुमचे मनःपूर्वक अभिनंदन करतो, तुम्हाला शुभेच्छा देतो आणि तुमच्यासाठी सदिच्छा व्यक्त करतो. मी तुम्हाला हे देखील आश्वासन देतो की या वरिष्ठ सभागृहातील सर्व माननीय सदस्य नेहमीच या प्रतिष्ठित संस्थेचे पावित्र्य जपतील आणि तुमच्या प्रतिष्ठेचा मान राखण्याची नेहमीच काळजी घेतील. हे माझे तुम्हाला ठाम आश्वासन आहे.गोव्यामधील श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठाच्या 550 व्या वर्धापनदिन कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
November 28th, 03:35 pm
आज या पवित्र प्रसंगी मनामध्ये खोलवर शांतता भरली आहे. साधू-संतांच्या सानिध्यामध्ये बसल्यानंतर आपोआपच आध्यात्मिक अनुभव येत असतो. इथे विशाल संख्येने उपस्थित असलेल्या भाविकांमुळे लक्षात येते की, या मठाची शतकांपासूनच प्राचीन जीवंत शक्ती आजही वृद्धिंगत होत आहे. आज या समारंभाला मला उपस्थित राहता आले, याबद्दल मी स्वतःला खूप भाग्यवान मानतो. इथे येण्यापूर्वी मला राम मंदिर आणि वीर विठ्ठल मंदिराचे दर्शन करण्याचे भाग्य लाभले. त्या शांत वातावरणाने या कार्यक्रमाच्या आध्यात्मिकतेला आणखी सखोलता प्राप्त झाली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्यातील श्री संस्थान गोकर्ण पार्तगळी जीवोत्तम मठाच्या 550 व्या वर्षपूर्ती समारंभाला केले संबोधित
November 28th, 03:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गोव्यातील श्री संस्थान गोकर्ण पार्तगळी जीवोत्तम मठाच्या 550 व्या वर्षपूर्ती समारंभाला संबोधित केले. या पवित्र प्रसंगी आपले मन गहन शांतीने भरले आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले. संतांच्या उपस्थितीत, त्यांच्या सोबत बसणे हा स्वतःच एक आध्यात्मिक अनुभव आहे, यावर त्यांनी भर दिला. येथे मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या भक्तांमुळे या मठाची शतकानुशतके जुनी जिवंत शक्ती आणखी वाढली आहे, असे नमूद करून मोदी म्हणाले की, आज या समारंभात लोकांमध्ये उपस्थित राहणे हे आपले भाग्य आहे. येथे येण्यापूर्वी आपल्याला राम मंदिर आणि वीर विठ्ठल मंदिराला भेट देण्याचा सौभाग्य लाभले, असे त्यांनी सांगितले. तेथील शांतता आणि तिथल्या वातावरणामुळे या समारंभाची आध्यात्मिकता अधिक सखोल झाली आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.गुजरातमध्ये देडियापाडा येथे जनजातीय गौरव दिन कार्यक्रमातील पंतप्रधानांचे भाषण
November 15th, 03:15 pm
गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत जी, इथले लोकप्रिय मुख्यमंत्री श्रीमान भूपेंद्र भाई पटेल, गुजरात भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जगदीश विश्वकर्मा जी, गुजरात सरकारमधले मंत्री नरेश भाई पटेल, जयराम भाई गामीत जी, संसदेतले माझे जुने मित्र मनसुख भाई वसावा जी, भगवान बिरसा मुंडा यांचा परिवारातले व्यासपीठावर उपस्थित सर्व सदस्य, देशाच्या कानाकोपऱ्यातून या कार्यक्रमात सहभागी झालेले माझे आदिवासी बंधुभगिनी, अन्य सर्व आदरणीय व्यक्ती आणि आत्ता देशात सुरू असलेल्या अनेक कार्यक्रमांमधून तंत्रज्ञानाच्या मदतीने आपल्याशी जोडले गेलेले अनेक लोक, राज्याराज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्री अशा सर्वांना जनजातीय गौरव दिनाच्या निमित्ताने मी मनापासून शुभेच्छा देतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील देडियापाडा येथे धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त जनजातीय गौरव दिवस कार्यक्रमाला केले संबोधित
November 15th, 03:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील देडियापाडा येथे धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त जनजातीय गौरव दिवस कार्यक्रमाला संबोधित केले. या प्रसंगी त्यांनी 9,700 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध पायाभूत सुविधा आणि विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. माँ नर्मदेची पवित्र भूमी आज आणखी एका ऐतिहासिक प्रसंगाची साक्षीदार होत आहे असे सांगून, मोदी यांनी भारताची एकता आणि विविधता साजरी करण्यासाठी 31 ऑक्टोबर रोजी सरदार पटेल यांची 150 वी जयंती याच ठिकाणी साजरी करण्यात आली होती, भारत पर्वाची सुरुवात झाली होती याची आठवण करून दिली. भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीच्या भव्य सोहळ्यासह भारत पर्वचा समारोप होत आहे असे पंतप्रधानांनी सांगितले .या शुभ प्रसंगी त्यांनी भगवान बिरसा मुंडा यांना आदरांजली वाहिली. गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश आणि संपूर्ण आदिवासी पट्ट्यात स्वातंत्र्याची भावना जागृत करणाऱ्या गोविंद गुरुंचे आशीर्वाद देखील या कार्यक्रमाशी जोडलेले आहेत असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. व्यासपीठावरून त्यांनी गोविंद गुरुंना आदरांजली वाहिली. थोड्या वेळापूर्वी देवमोगरा मातेच्या मंदिराला भेट देण्याचा आणि पुन्हा एकदा त्यांच्या चरणी नतमस्तक होण्याचे सौभाग्य लाभले असे ते म्हणाले.भूतानचे राजे (चौथे) यांच्या सत्तराव्या जयंतीनिमित्त आयोजित समारंभात पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा मराठी मजकूर
November 11th, 12:00 pm
भारत आणि भूतान यांच्यात शतकानुशतकांपासून भावनिक आणि सांस्कृतिक बंध रुजलेले आहेत. म्हणूनच, या महत्त्वाच्या प्रसंगी सहभागी होण्यासाठी भारत आणि मी स्वतः देखील वचनबद्ध आहोत.भूतानच्या चौथ्या महाराजांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले संबोधित
November 11th, 11:39 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भूतानमधील थिंपू येथील चांगलीमेथांग सेलिब्रेशन ग्राउंड येथे भूतानच्या चौथ्या महाराजांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाला संबोधित केले. पंतप्रधानांनी भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक आणि चौथे राजे जिग्मे सिंग्ये वांगचुक यांना शुभेच्छा दिल्या. राजघराण्यातील सन्माननीय सदस्य, भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे आणि इतर उपस्थित मान्यवरांना त्यांनी आदरपूर्वक शुभेच्छा दिल्या.वाराणसीहून चार वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवताना पंतप्रधानांनी केलेले भाषण
November 08th, 08:39 am
उत्तर प्रदेशचे उर्जावान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी आणि विकसित भारताचा मजबूत पाया रचण्यासाठी आज तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात होत असलेल्या उत्कृष्ट कामाचे नेतृत्व करणारे अश्विनी वैष्णव जी, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून या कार्यक्रमात आपल्यासोबत एर्नाकुलम इथून सहभागी झालेले केरळचे राज्यपाल श्री राजेंद्र आर्लेकर जी, केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे सहकारी सुरेश गोपी जी, जॉर्ज कुरियन जी, केरळमधील या कार्यक्रमात उपस्थित असलेले इतर सर्व मंत्री आणि लोकप्रतिनिधी, फिरोजपूर इथून जोडले गेलेले केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे सहकारी आणि पंजाबचे नेते रवनीत सिंग बिट्टू जी, तेथे उपस्थित असलेले सर्व लोकप्रतिनिधी, लखनौ इथून जोडले गेलेले उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक जी, इतर मान्यवर आणि काशीतील माझे कुटुंबीय.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीहून चार नवीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना दाखवला हिरवा झेंडा
November 08th, 08:15 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील वाराणसी येथून चार नवीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला. देशाच्या आधुनिक रेल्वे पायाभूत सुविधांचा विस्तार करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. या प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले आणि बाबा विश्वनाथांचे पवित्र शहर असलेल्या वाराणसीतील सर्व कुटुंबांना आदरपूर्वक शुभेच्छा दिल्या. देव दिवाळीच्या काळात झालेल्या अद्वितीय उत्सवाचे त्यांनी कौतुक केले आणि आजचा दिवसदेखील एक शुभ प्रसंग असल्याचे सांगितले. विकासाच्या या उत्सवासाठी त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.पंतप्रधान 8 नोव्हेंबर रोजी वाराणसीला भेट देऊन 4 नवीन वंदे भारत गाड्यांना हिरवा झेंडा दाखवून रवाना करणार
November 06th, 02:48 pm
भारतातील आधुनिक रेल्वे पायाभूत सुविधांचा विस्तार करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल म्हणून, पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 नोव्हेंबर रोजी सकाळी 8:15 वाजता वाराणसीला भेट देतील आणि चार नवीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देव दिवाळीनिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या
November 05th, 10:44 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवदिवाळीनिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. बाबा विश्वनाथ यांची पवित्र नगरी आज देव दिवाळीच्या अलौकिक प्रकाशानं उजळून निघाली आहे. गंगा मातेच्या काठावर काशीच्या घाटांवर प्रज्वलित केलेल्या लक्ष-लक्ष दिव्यांमध्ये सर्वांच्या सुख समृद्धीची प्रार्थना आहे. हे दिव्यत्व आणि भव्यता प्रत्येकाच्या अंतःकरणाला मंत्रमुग्ध करणारी आहे, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.Let’s take a pledge together — Bihar will stay away from Jungle Raj! Once again – NDA Government: PM Modi in Chhapra
October 30th, 11:15 am
In his public rally at Chhapra, Bihar, PM Modi launched a sharp attack on the INDI alliance, stating that the RJD-Congress bloc, driven by vote-bank appeasement and opposed to faith and development, can never respect the beliefs of the people. Highlighting women empowerment, he said NDA initiatives like Drone Didis, Bank Sakhis, Lakhpati Didis have strengthened women across Bihar and this support will be expanded when NDA returns to power.PM Modi’s grand rallies electrify Muzaffarpur and Chhapra, Bihar
October 30th, 11:00 am
PM Modi addressed two massive public meetings in Muzaffarpur and Chhapra, Bihar. Beginning his first rally, he noted that this was his first public meeting after the Chhath Mahaparv. He said that Chhath is the pride of Bihar and of the entire nation—a festival celebrated not just across India, but around the world. PM Modi also announced a campaign to promote Chhath songs nationwide, stating, “The public will choose the best tracks, and their creators will be awarded - helping preserve and celebrate the tradition of Chhath.”पद्म विभूषण पंडित छन्नुलाल मिश्र यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले दुःख
October 02nd, 02:00 pm
पद्म विभूषण पंडित छन्नुलाल मिश्र यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.पंतप्रधानांकडून प्रख्यात शास्त्रीय गायक पंडित छन्नूलाल मिश्र यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त
October 02nd, 09:42 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रख्यात शास्त्रीय गायक पंडित छन्नूलाल मिश्र यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. त्यांनी पंडितजींना भारतीय कला आणि संस्कृतीसाठी जीवनभर समर्पित राहिलेले व्यक्तिमत्त्व म्हणून गौरविले.