पंतप्रधान मोदींचा वनतारा येथील एक दिवस: आशा बाळगून वन्यजीवांवर उपचार
March 05th, 03:15 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 4 मार्च 2025 रोजी गुजरातमधील जामनगर येथे वन्यजीव बचाव, पुनर्वसन आणि संवर्धन केंद्राचे उद्घाटन केले. रिलायन्स जामनगर रिफायनरीच्या परिसरात 3,500 एकरांवर उभारण्यात आलेले वनतारा हे जगातील सर्वात मोठे वन्यजीव केंद्र असून ते 2,000 हून अधिक प्रजातींच्या 1.5 लाखांहून अधिक संकटातून सोडवण्यात आलेल्या, धोक्यात असलेल्या आणि जीव गमावण्याची भीती असलेल्या प्राण्यांना मुक्तपणे वावरण्याचे आश्रयस्थान आहे. वनतारा हे केवळ आश्रयस्थान नाही तर प्राण्यांच्या नैतिक हिताचे आणि पर्यावरणीय शाश्वततेच्या भारताच्या वाढत्या वचनबद्धतेचे उदाहरण आहे.वनतारा या अनोख्या वन्यजीव संवर्धन,सुटका व पुनर्वसन उपक्रमाचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन
March 04th, 04:05 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील जामनगर इथे वनतारा या अनोख्या वन्यजीव संवर्धन, सुटका व पुनर्वसन उपक्रमाचे उद्घाटन केले.अनंत अंबानी आणि त्यांच्या सहकाऱ्यांची या करुणापूर्ण प्रयत्नांबद्दल प्रशंसा करुन ते म्हणाले की,वनतारा प्राण्यांसाठी सुरक्षित आसऱ्याचे ठिकाण आहे. पर्यावरणाची शाश्वतता व वन्यजीवांच्या कल्याणालाही इथे प्रोत्साहन दिले जात आहे.