पंतप्रधान 28 फेब्रुवारी रोजी राजस्थानला भेट देणार
February 27th, 03:35 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 फेब्रुवारी 2026 रोजी राजस्थानमधील अजमेरला भेट देणार आहेत. 28 फेब्रुवारी सकाळी साधारण 11:30 वाजता पंतप्रधानाच्या हस्ते 16,680 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचा प्रारंभ , उद्घाटन आणि पायाभरणी होईल. या निमित्ताने ते एका जाहीर सभेलाही संबोधित करणार आहेत. या प्रकल्पांमध्ये नगरविकास, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, रस्ते, सिंचन, ऊर्जा आणि औद्योगिक पायाभूत सुविधा यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांचा समावेश आहे.इंडिया एआय इम्पॅक्ट शिखर परिषदेत नेत्यांच्या पूर्ण सत्रात पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा मजकूर
February 19th, 01:00 pm
एआय इम्पॅक्ट शिखर परिषदेच्या निमित्ताने पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे भारतात स्वागत करताना मला आनंद होतो आहे. ही शिखर परिषद मानव-केंद्रित, संवेदनशील जागतिक एआय परिसंस्था तयार करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल, असा विश्वास मला वाटतो.इंडिया एआय इम्पॅक्ट शिखर परिषद 2026 मध्ये नेत्यांच्या पूर्ण सत्राला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले संबोधित
February 19th, 12:39 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतील भारत मंडपम इथे इंडिया एआय इम्पॅक्ट शिखर परिषद 2026 मध्ये आज झालेल्या राष्ट्रप्रमुखांच्या पूर्ण सत्राला संबोधित केले. भारताने आयोजित केलेल्या एआय इम्पॅक्ट शिखर परिषदेत सहभागी झालेल्यांचे त्यांनी आपल्या निवेदनातून पुन्हा एकदा स्वागत केले. ही परिषद मानव केंद्रित आणि संवेदनशील, जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता परिसंस्था उभारण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मानवतेने कायमच आव्हानात्मक बदलांचे संधींमध्ये रुपांतरीत केल्याचे इतिहासात अनेकदा घडले असल्याचा दाखलाही त्यांनी दिला. आजच्या काळातही अशाच आव्हानात्मक बदलांना मानवतेसाोठीच्या मोठ्या संधीमध्ये रुपांतरीत करण्याचा क्षण लाभला असल्याचे त्यांनी नमूद केले.जागतिक आरोग्य सभेच्या 78 व्या सत्रातील पंतप्रधानांच्या भाषणाचा मजकूर
May 20th, 04:42 pm
या वर्षीच्या जागतिक आरोग्य सभेची संकल्पना 'आरोग्यासाठी एक जग' आहे. ती भारताच्या जागतिक आरोग्यविषयक दृष्टिकोनाशी सुसंगत आहे. 2023 मध्ये जेव्हा मी या मेळाव्याला संबोधित केले तेव्हा मी 'एक पृथ्वी, एक आरोग्य' बद्दल बोललो होतो. निरोगी जगाचे भविष्य समावेशन, एकात्मिक दृष्टिकोन आणि सहकार्यावर अवलंबून असते.जिनिव्हा येथे आयोजित जागतिक आरोग्य सभेच्या 78 व्या सत्राला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले संबोधित
May 20th, 04:00 pm
जिनिव्हा येथे आयोजित जागतिक आरोग्य सभेच्या 78 व्या सत्राला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी सर्व उपस्थितांना हार्दिक शुभेच्छा देऊन सभेच्या यावर्षीच्या ‘आरोग्यासाठी एक विश्व’ या संकल्पनेला अधोरेखित करत ही संकल्पना जागतिक आरोग्याबाबत भारताने पाहिलेल्या स्वप्नाशी सुसंगत आहे, यावर भर दिला.वर्ष 2023 मध्ये जागतिक आरोग्य सभेत आपण ‘एक वसुंधरा, एक आरोग्य’ संकल्पनेविषयी बोललो होतो अशी आठवण उपस्थितांना करून देत पंतप्रधान म्हणाले की, समावेशकता, एकात्मिक दूरदृष्टी आणि सहयोग यांच्यावर निरोगी विश्वाचे भवितव्य अवलंबून असतेपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या TV9 शिखर परिषद 2025 मधील भाषणाचा मराठी अनुवाद
March 28th, 08:00 pm
श्रीयुत रामेश्वर गारू जी, रामू जी, बरुण दास जी, TV9 ची संपूर्ण टीम, मी आपल्या नेटवर्कच्या सर्व प्रेक्षकांचे, इथे उपस्थित सर्व मान्यवरांचे अभिनंदन करतो, या शिखर परिषदेसाठी अभिनंदन करतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीव्ही 9 शिखर परिषदेत केले भाषण
March 28th, 06:53 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित टीव्ही 9 शिखर परिषदेत भाग घेतला. या परिषदेमध्ये संबोधित करताना त्यांनी टीव्ही9च्या संपूर्ण टीमला आणि त्याच्या प्रेक्षकांना शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, टीव्ही9 चा विस्तृत प्रादेशिक प्रेक्षकवर्ग आहे आणि आता जागतिक प्रेक्षकवर्गही तयार होत आहे. त्यांनी या कार्यक्रमात दूरदृश्य प्रणालीद्वारे जोडलेल्या परदेशस्थ भारतीयांचेही स्वागत केले आणि सर्वांना शुभेच्छा दिल्या.बावलिया धाम येथील कार्यक्रमात पंतप्रधानांच्या संवादाचा मजकूर
March 20th, 04:35 pm
गेल्या आठवड्यात भावनगरची भूमी भगवान श्रीकृष्णाचे वृंदावन बनल्यासारखी वाटली आणि सोन्याहून पिवळे व्हावे तशी आमच्या भाईजींची भागवत कथा होती. ज्या प्रकारची भक्ती वाहत होती, वातावरण असे होते की लोक कृष्णामध्ये न्हाऊन गेले होते. माझ्या प्रिय नातेवाईकांनो, बावलिया धाम हे ठिकाण केवळ धार्मिक स्थळ नाही तर ते भरवाड समाजासह अनेकांसाठी श्रद्धा, संस्कृती आणि एकतेचे प्रतीक आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बावलियाली धामच्या कार्यक्रमाला केले संबोधित
March 20th, 04:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ संदेशाद्वारे गुजरातच्या भारवाड समाजाशी संबंधित बावलियाली धामच्या कार्यक्रमात आपले विचार मांडले. उपस्थितांना संबोधित करताना मोदी यांनी महंत श्री राम बापू जी, समुदायाचे नेते आणि उपस्थित हजारो भाविकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.