उत्तराखंडमधील अल्मोडा जिल्ह्यात झालेल्या बस अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी केला शोक व्यक्त
December 30th, 12:37 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तराखंडमधील अल्मोडा जिल्ह्यात झालेल्या बस अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला.उत्तराखंडच्या स्थापनच्या रौप्य महोत्सवानिमित्त निमत्त डेहराडून इथल्या समारंभात पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा
November 09th, 01:00 pm
9 नोव्हेंबरचा हा दिवस एका दीर्घ तपस्येचे फळ आहे. आजचा दिवस आपण सर्वांसाठी अभिमानाची अनुभूती देणारा आहे. उत्तराखंडच्या देवतुल्य जनतेने अनेक वर्षांपासून जे स्वप्न पाहिले होते, ते अटलजींच्या सरकारच्या काळात, 25 वर्षांपूर्वी पूर्ण झाले होते, आणि आता गेल्या 25 वर्षांच्या प्रवासानंतर, आज उत्तराखंड ज्या उंचीवर पोहचले आहे, ते पाहून त्या प्रत्येक व्यक्तीला आनंद होणे स्वाभाविक आहे, ज्यांनी या सुंदर राज्याच्या निर्मितीसाठी संघर्ष केला होता. ज्यांचे पर्वतांवर प्रेम आहे, ज्यांना उत्तराखंडची संस्कृती, इथले नैसर्गिक सौंदर्य, देवभूमीच्या लोकांशी जिव्हाळा आहे, त्यांचे मन आज प्रफुल्लित आहे, ते आनंदित आहेत.डेहराडून येथे उत्तराखंड राज्याच्या स्थापनेच्या रौप्यमहोत्सवी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले संबोधित
November 09th, 12:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डेहराडूनमध्ये उत्तराखंडच्या स्थापनेच्या रौप्यमहोत्सवी सोहळ्याला संबोधित केले. या कार्यक्रमादरम्यान , पंतप्रधानांनी 8140 कोटी रुपये मूल्यांच्या विविध विकास प्रकल्पाची पायाभरणी आणि उद्घाटन केले. या समारोहाला संबोधित करताना, मोदी यांनी देवभूमी उत्तराखंडच्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या आणि सर्वांप्रती आदर, सन्मान आणि सेवाभाव व्यक्त केला.उत्तराखंडच्या २५ व्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधानांनी जनतेला दिल्या शुभेच्छा
November 09th, 09:05 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंड राज्याच्या स्थापनेच्या २५ व्या वर्धापन दिनानिमित्त उत्तराखंडच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. निसर्गाच्या कुशीत वसलेली ही दिव्य भूमी आज पर्यटनासह प्रत्येक क्षेत्रात वेगाने प्रगती करत आहे, असे मोदी यांनी संदेशात म्हटले आहे.पंतप्रधान 9 नोव्हेंबर रोजी डेहराडूनच्या दौऱ्यावर
November 08th, 09:26 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी 9 नोव्हेंबर रोजी डेहरादूनला भेट देणार असून दुपारी 12:30 च्या सुमारास ते उत्तराखंडच्या स्थापनेच्या रौप्यमहोत्सवानिमित्त आयोजित समारंभात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते विशेष टपाल तिकिटाचेही प्रकाशन होणार असून ते उपस्थितांना संबोधितही करणार आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली देहरादूनला भेट, उत्तराखंडमधील पुरामुळे झालेल्या नुकसानीच्या आढावा घेण्यासाठी घेतली बैठक
September 11th, 06:02 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दि. 11 सप्टेंबर 2025 रोजी देहरादूनला भेट देऊन, ढगफुटी, पाऊस आणि भूस्खलनाने बाधित उत्तराखंडमधील भागांतील पूरस्थितीचा आणि नुकसानीचा आढावा घेतला.पंतप्रधान 11 सप्टेंबर रोजी उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या दौऱ्यावर
September 10th, 01:01 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 सप्टेंबर रोजी उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडला भेट देणार आहेत.उत्तरकाशीतील धारली येथे नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या हानीबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला
August 05th, 04:54 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तरकाशीतील धारली येथील नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्यांप्रति सहवेदना व्यक्त केली आहे. या आपत्तीमुळे प्रभावित झालेल्यांच्या कल्याणासाठी त्यांनी प्रार्थना केली आहे.उत्तराखंडमधील हरिद्वार येथे चेंगराचेंगरीत झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
July 27th, 12:39 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तराखंडमधील हरिद्वार येथील मनसा देवी मंदिराच्या मार्गावर चेंगराचेंगरीत झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे.स्वावलंबन हा 2047 पर्यंत विकसित भारताकडे नेणारा मार्ग: पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
July 27th, 11:30 am
‘मन की बात’मध्ये पुन्हा एकदा चर्चा होईल ती देशाला मिळालेल्या यशाची, देशवासियांनी केलेल्या कामगिरीची! गेल्या काही आठवड्यामध्ये क्रीडा क्षेत्र असो, विज्ञान असो अथवा संस्कृतीचे क्षेत्र असो, प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा, अशी कामगिरी अनेकांनी केली आहे. अलिकडेच शुभांशू शुक्ला हे अवकाशातून परतले, याविषयी संपूर्ण देशामध्ये खूप चर्चा झाली. शुभांशू सुरक्षित भूमीवर परतताच लोकांच्या हृदयामध्ये जणू एक आनंदाची लाट उसळली. संपूर्ण देशाला शुभांशू यांच्या कामगिरीविषयी अभिमान वाटला. अशावेळी मला एका घटनेचं स्मरण होत आहे. ज्यावेळी ऑगस्त 2023 मध्ये चंद्रयान-3 यशस्वीपणे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले, त्यावेळीही देशामध्ये अशाच प्रकारचे अनोखे वातावरण तयार झाले होते. विज्ञानापासून ते अंतराळापर्यंतच्या विषयांमध्ये अगदी लहान-लहान मुलांमध्येही एक नवीन जिज्ञासा, उत्सुकता जागृत झाली होती. आता लहान-लहान मुलेही म्हणताहेत की, आम्हीही अंतराळामध्ये जाणार! आम्हीही चंद्रावर जाणार, अंतराळ संशोधक बनणार!पिथौरागढ, उत्तराखंड येथील रस्ते अपघातातील जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शोक व्यक्त
July 15th, 10:02 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तराखंडमधील पिथौरागढ येथे झालेल्या रस्ते अपघातातील जीवितहानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. त्यांनी अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली.उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी पंतप्रधानांची घेतली भेट
July 14th, 07:08 pm
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ (122 वा भाग) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद
May 25th, 11:30 am
आज संपूर्ण देश दहशतवादाविरुद्ध एक झाला आहे, संतापानं क्रुद्ध आहे, संकल्पसिद्ध आहे. आज प्रत्येक भारतीयाचा एकच निर्धार आहे, की 'आपल्याला दहशतवाद संपवायचाच आहे.'केरळमध्ये तिरुवनंतपुरम येथे विझिंजम आंतरराष्ट्रीय सागरी बंदराच्या लोकार्पण प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
May 02nd, 02:06 pm
आज भगवान आदि शंकराचार्य जी यांची जयंती आहे. तीन वर्षांपूर्वी सप्टेंबर महिन्यात आदि शंकराचार्य यांच्या जन्मभूमीला भेट देण्याचे सद्भाग्य मला लाभले होते. काशी या माझ्या लोकसभा मतदारसंघात विश्वनाथ धाम परिसरात आदि शंकराचार्य जी यांचा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे याचा मला आनंद आहे. उत्तराखंडमधील केदारनाथ धाम येथे आदि शंकराचार्य यांच्या दिव्य पुतळ्याचे अनावरण करण्याचे भाग्य देखील मला लाभले आहे. आणि आजच देवभूमी उत्तराखंडमधील केदारनाथ मंदिराचे द्वार दर्शनासाठी उघडले आहे, केरळमधून बाहेर पडून देशाच्या विविध कानाकोपऱ्यात मठांची स्थापना करून आदि शंकराचार्य जी यांनी राष्ट्रीय चैतन्याची जाणीव जागृत केली. या पवित्र प्रसंगी मी त्यांना श्रद्धापूर्वक वंदन करतो.केरळमध्ये 8,800 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या विझिंजम आंतरराष्ट्रीय सागरी बंदराचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण
May 02nd, 01:16 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केरळमध्ये तिरुवनंतपुरम येथे 8,800 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या विझिंजम खोल पाण्यातील आंतरराष्ट्रीय बहुउद्देशीय सागरी बंदराचे लोकार्पण केले. भगवान आदि शंकराचार्य यांच्या जयंतीदिनाच्या मंगल प्रसंगी कार्यक्रमासाठी जमलेल्या उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी तीन वर्षांपूर्वी सप्टेंबर महिन्यात आदि शंकराचार्य यांच्या वंदनीय जन्मस्थानाला भेट देण्याचा सन्मान प्राप्त झाल्याची आठवण सांगितली. काशी या पंतप्रधानांच्या लोकसभा मतदारसंघात आदि शंकराचार्य यांचा भव्य पुतळा उभारण्यात आल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. हा पुतळा म्हणजे आदि शंकराचार्य यांची प्रचंड अध्यात्मिक विद्वत्ता आणि शिकवण यांच्याप्रती आदरांजली प्रतीक आहे हे त्यांनी आवर्जून सांगितले. पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, आपल्याला उत्तराखंडातील पवित्र केदारनाथ धाम येथे आदि शंकराचार्य यांच्या दिव्य पुतळ्याचे अनावरण करण्याचा सन्मान देखील प्राप्त झाला आहे. केदारनाथ मंदिराची कवाडे आज भाविकांसाठी खुली झाल्यामुळे, आजच्या दिवसाला विशेष महत्व प्राप्त झाले असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. मुळचे केरळचे असलेल्या आदि शंकराचार्य यांनी देशाच्या विविध कानाकोपऱ्यात मठांची स्थापना करून राष्ट्रीय चैतन्याची जाणीव जागृत केली, ही बाब त्यांनी अधोरेखित केली. आदि शंकराचार्य यांच्या प्रयत्नांनी एकसंघ आणि अध्यात्मिकदृष्ट्या जागृत भारताच्या उभारणीचा पाया रचला यावर पंतप्रधानांनी अधिक भर दिला.उत्तराखंडच्या राज्यपालांनी पंतप्रधानांची घेतली भेट
March 19th, 02:27 pm
उत्तराखंडचे राज्यपाल, लेफ्टनंट जनरल गुरमित सिंग (निवृत्त) यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.उत्तराखंड राज्यात हर्शील येथे आयोजित हिवाळी पर्यटन कार्यक्रमात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणाचा मजकूर
March 06th, 02:07 pm
येथील उर्जावंत मुख्यमंत्री, माझे धाकटे बंधू पुष्कर सिंह धामी जी, केंद्रीय मंत्री श्री अजय टामटा जी, राज्याचे मंत्री सतपाल महाराज जी, संसदेतील माझे सहकारी आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष महेंद्र भट्ट जी, संसदेतील माझ्या सहकारी माला राज्यलक्ष्मी जी, आमदार सुरेश चौहान जी, सर्व मान्यवर, बंधू आणि भगिनींनो….पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडमधील हर्षील इथे आयोजित हिवाळी पर्यटन कार्यक्रमाला केले संबोधित
March 06th, 11:17 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तराखंडमधील हर्षील इथे आयोजित ट्रेक आणि बाइक रॅलीला हिरवा झेंडा दाखवला. त्यानंतर ते तिथल्या हिवाळी पर्यटन महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमातही सहभागी झाले. यावेळी त्यांनी मुखवा येथील माता गंगेच्या हिवाळी बैठकीचे दर्शन घेऊन पूजा-अर्चना ही केली. यावेळी पंतप्रधानांनी उपस्थितांना संबोधितही केले. आपल्या संबोधनातून त्यांनी माणा गावातील दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आणि या दुर्घटनेत ज्यांना प्राण गमवावे लागले त्यांच्या कुटुंबियांप्रती सहवेदनाही व्यक्त केल्या. या संकटकाळात संपूर्ण राष्ट्र त्यांच्या कुटुंबियांसोबत एकत्र उभे आहे, या सोबतीमुळे पिडीत कुटुंबांना प्रचंड बळ मिळाले आहे, असे त्यांनी सांगितले.राष्ट्रीय रोपवे विकास कार्यक्रम – पर्वतमाला प्रकल्पांतर्गत उत्तराखंड मधील गोविंदघाट ते हेमकुंड साहिब जी (12.4 किमी) दरम्यान रोपवे प्रकल्प विकसित करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
March 05th, 03:08 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार विषयक समितीने गोविंदघाट ते हेमकुंड साहिब जी दरम्यान 12.4 किमी लांबीचा रोपवे प्रकल्प विकसित करायला मंजुरी दिली आहे. हा प्रकल्प डिझाइन, बिल्ड, फायनान्स, ऑपरेट अँड ट्रान्सफर (डीबीएफओटी), अर्थात बांधा-वापर-हस्तांतरित करा, या तत्वावर विकसित केला जाणार असून, त्यासाठी एकूण 2,730.13 कोटी रुपये भांडवली खर्च होईल.राष्ट्रीय रोपवे विकास कार्यक्रम - पर्वतमाला परियोजनेअंतर्गत उत्तराखंड राज्यातील सोनप्रयाग ते केदारनाथ (12.9 किमी) पर्यंतच्या रोपवे प्रकल्पाच्या विकासाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
March 05th, 03:05 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक केंद्रीय मंत्रिमंडळ समितीने (सीसीईए) सोनप्रयाग ते केदारनाथ (12.9 किमी) पर्यंत 12.9 किमी रोपवे प्रकल्पाच्या बांधकामाला मान्यता दिली आहे. हा प्रकल्प डिझाइन, बिल्ड, फायनान्स, ऑपरेट आणि ट्रान्सफर (डीबीएफओटी) अर्थात संरचना, बांधकाम, वित्तपुरवठा, कार्यान्वयन आणि हस्तांतरण पद्धतीने विकसित केला जाईल आणि यासाठी एकूण 4,081.28 कोटी रुपये भांडवली खर्च येईल.