उत्कर्ष ओदिशा - मेक इन इंडिया कॉनक्लेव्हमधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण

January 28th, 11:30 am

जानेवारी महिन्यात, म्हणजे 2025 च्या सुरुवातीलाच माझा ओदिशाचा हा दुसरा दौरा आहे. काही दिवसांपूर्वी मी इथे झालेल्या अनिवासी भारतीय दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झालो होतो. आज आता उत्कर्ष ओदिशा कॉन्क्लेव्हमध्ये मी तुमच्या सोबत आलो आहे. मला सांगण्यात आले आहे की ओदिशामध्ये आयोजित केलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी व्यवसायविषयक शिखर परिषद आहे. पूर्वीच्या तुलनेत पाच ते सहा पटीने अधिक गुंतवणूकदार यात सहभागी होत आहेत. ओदिशाच्या जनतेचे, ओदिशा सरकारचे या अप्रतिम कार्यक्रमासाठी मी खूप खूप अभिनंदन करतो. तुम्हा सर्वांचे या कार्यक्रमात अभिनंदन करतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भुवनेश्वरमध्ये केले “उत्कर्ष ओदिशा- मेक इन ओदिशा” संमेलन 2025 चे उद्‌घाटन

January 28th, 11:00 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ओदिशामध्ये भुवनेश्वर येथे “उत्कर्ष ओदिशा- मेक इन ओदिशा” संमेलन 2025 चे उद्घाटन केले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी जानेवारी 2025 या महिन्यातील त्यांची ही दुसरी भेट असल्याचे सांगताना त्यांनी प्रवासी भारतीय दिवस 2025 या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी ओदिशाला दिलेल्या भेटीची आठवण करून दिली. ओदिशामध्ये आतापर्यंतची ही सर्वात मोठी व्यावसायिक शिखर परिषद असल्याचे नमूद करत मोदी यांनी मेक इन ओदिशा संमेलन 2025 मध्ये पाच ते सहा पट जास्त गुंतवणूकदार सहभागी झाले असल्याची माहिती दिली. त्यांनी ओदिशाची जनता आणि ओदिशा सरकारचे देखील या भव्य कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल अभिनंदन केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 जानेवारी रोजी ओडिशा आणि उत्तराखंडला देणार भेट

January 27th, 06:44 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या – 28 जानेवारी रोजी ओडिशा आणि उत्तराखंडला भेट देणार आहेत. सकाळी 11 वाजता ते भुवनेश्वरमधील जनता मैदान येथे आयोजित करण्‍यात आलेल्‍या ‘उत्कर्ष ओडिशा - मेक इन ओडिशा कॉन्क्लेव्ह 2025’ चे उद्घाटन करणार आहेत. त्यानंतर ते उत्तराखंडमधील डेहराडूनला जातील आणि संध्याकाळी 6 .00 वाजता ते 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन करतील.