पश्चिम बंगालमधील अलीपुरद्वार येथे सिटी गॅस वितरण प्रकल्पाच्या पायाभरणी कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
May 29th, 01:30 pm
केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी सुकांत मजूमदार, पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी, अलीपुरद्वारचे लोकप्रिय खासदार भाई मनोज तिग्गा, इतर खासदार, आमदार आणि पश्चिम बंगालच्या माझ्या आणि भगिनींनो!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पश्चिम बंगालमधील अलीपूरद्वार येथे 1010 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या शहर गॅस वितरण प्रकल्पाची पायाभरणी
May 29th, 01:20 pm
भारतात शहर गॅस वितरण (सीजीडी) जाळे विस्तारण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पश्चिम बंगालमधील अलीपुरद्वार येथे सीजीडी प्रकल्पाची पायाभरणी केली. उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी पश्चिम बंगालच्या लोकांचे अलीपुरद्वारच्या ऐतिहासिक भूमीवरून अभिनंदन केले. या प्रदेशाचे समृद्ध सांस्कृतिक महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. हे केवळ त्याच्या सीमांनीच नव्हे तर खोलवर रुजलेल्या परंपरा आणि संबंधांनी देखील ते परिभाषित केले आहे, यावर त्यांनी भर दिला. पंतप्रधानांनी नमूद केले की,अलीपुरद्वारच्या सीमेपलिकडे एका बाजूला भूतान आहे, तर दुसऱ्या बाजूला आसाम आहे, जलपायगुडीच्या नैसर्गिक सौंदर्याने आणि कूचबिहारच्या अभिमानाने या प्रदेशाचा अविभाज्य भाग जोडलेला आहे. बंगालच्या वारसा आणि एकतेमध्ये त्याची भूमिका अधोरेखित करून त्यांनी या समृद्ध भूमीला भेट देताना विशेष आनंद झाल्याची भावना व्यक्त केली. विकसित राष्ट्र बनण्याच्या दिशेने भारत वाटचाल करत असताना, बंगालचा सहभाग अपेक्षित आणि आवश्यक आहे, यावर भर देत मोदी यांनी या प्रदेशात पायाभूत सुविधा, नवोन्मेष आणि गुंतवणूकीला गती देण्यासाठी केंद्र सरकार करत असलेले निरंतर प्रयत्न अधोरेखित केले.बंगालचा विकास भारताच्या भविष्याचा आधारस्तंभ आहे,असे मोदी म्हणाले. आज या प्रवासात आणखी एक महत्त्वाचा टप्पा जोडला आहे असे त्यांनी नमूद केले. त्यांनी अलीपुरद्वार आणि कूचबिहारमध्ये शहर गॅस वितरण प्रकल्प सुरू करण्याची घोषणा केली, ज्यामुळे 2.5 लाखांहून अधिक कुटुंबांना वाहिनीद्वारे स्वच्छ, सुरक्षित आणि किफायतशीर गॅस उपलब्ध होईल. मोदींनी नमूद केले की या उपक्रमामुळे एलपीजी सिलिंडर खरेदी करण्याची चिंता दूर होईल आणि कुटुंबांना सुरक्षित गॅस पुरवठा सुनिश्चित होईल.