गुवाहाटी येथील ऍडव्हान्टेज आसाम 2.0 गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा शिखर परिषद 2025 च्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
February 25th, 11:10 am
आसामचे राज्यपाल लक्ष्मणप्रसाद आचार्य, मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा, उद्योग जगतातील नेते, मान्यवर, महिला आणि पुरुष,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ॲडव्हांटेज आसाम 2.0 गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा शिखर परिषद 2025 चे उद्घाटन
February 25th, 10:45 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आसाममधील गुवाहाटी येथे ॲडव्हांटेज आसाम 2.0 गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा शिखर परिषद 2025चे उद्घाटन केले. कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, पूर्व भारत आणि ईशान्य भारत आज भविष्याच्या एका नव्या प्रवासाला सुरुवात करत आहेत आणि ॲडव्हांटेज आसाम हा आसामची अफाट क्षमता आणि प्रगती, जगाशी जोडण्यासाठीचा एक मोठा पुढाकार आहे. भारताच्या समृद्धीत पूर्व भारताने बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेचा इतिहास साक्षीदार आहे, असे ते म्हणाले. पंतप्रधानांनी आशा व्यक्त केली, आज आपण विकसित भारताकडे वाटचाल करत असताना पूर्व भारत आणि ईशान्य भारत त्यांची खरी क्षमता प्रदर्शित करतील. ॲडव्हांटेज आसाम त्याच भावनेचे प्रतिनिधित्व आहे, असे सांगून त्यांनी अशा भव्य कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल आसाम सरकार आणि मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले. 'ए फॉर आसाम' अशी ओळख निर्माण होईल, तो दिवस फार दूर नाही, असे मत पंतप्रधानांनी 2013 मध्ये व्यक्त केले होते. त्याला त्यांनी उजाळा दिला.नवी दिल्ली येथे अष्टलक्ष्मी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
December 06th, 02:10 pm
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा जी, मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमा जी, त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा जी, सिक्किमचे मुख्यमंत्री प्रेम सिंह तमांग जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी ज्योतिरादित्य सिंधिया जी, सुकांता मुजूमदार जी, अरुणाचल प्रदेशचे उप-मुख्यमंत्री, मिजोरम आणि नागालँडच्या सरकारचे मंत्रीगण, अन्य लोकप्रतिनिधी, ईशान्य प्रदेशातून आलेले सर्व बंधू आणि भगिनी, स्त्री आणि पुरुषगण,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अष्टलक्ष्मी महोत्सवाचे उद्घाटन
December 06th, 02:08 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे अष्टलक्ष्मी महोत्सवाचे उद्घाटन केले. या कार्यक्रमात सर्व मान्यवरांचे स्वागत करताना मोदी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस असल्याचे नमूद केले. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या राज्यघटनेला 75 वर्षे पूर्ण झाली असून ती सर्व नागरिकांसाठी प्रेरणादायी आहे असे ते म्हणाले.'हर घर तिरंगा अभियान' तिरंग्याचे वैभव टिकवून ठेवणारा एक अनोखा उत्सव झाला आहे: पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
July 28th, 11:30 am
मित्रांनो, क्रीडाविश्वातील या ऑलिम्पिकपेक्षा वेगळे असलेले गणिताच्या जगातील ऑलिम्पिक काही दिवसांपूर्वीच पार पाडले. आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड. या ऑलिम्पियाड मध्ये भारतातील विद्यार्थ्यांनी फार उत्तम कामगिरी करून दाखवली. या स्पर्धेत आपल्या भारतीय संघाने सर्वोत्तम कामगिरी करत चार सुवर्णपदके आणि एक रौप्य पदक जिंकले आहे. आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड या स्पर्धेत जगातील 100 हून अधिक देशांचे संघ सहभागी होतात आणि एकंदर पदकतालिकेचा विचार करता आपला संघ पहिल्या पाच सर्वोत्तम संघांमध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी झाला. या स्पर्धेत देशाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे आहेत- पुण्याचा आदित्य वेंकट गणेश, पुण्याचाच सिद्धार्थ चोप्रा, दिल्लीचा अर्जुन गुप्ता, ग्रेटर नोईडाचा कणव तलवार, मुंबईचा ऋषील माथुर आणि गुवाहाटीचा आनंदो भादुरी.उत्तर-पूर्व परिवर्तनात्मक औद्योगिकीकरण योजना, 2024 ला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
March 07th, 11:18 pm
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयातील उद्योग प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार विभागाने (डीपीआयआयटी) सादर केलेल्या उत्तर-पूर्व परिवर्तनात्मक औद्योगिकीकरण योजना,2024 (उन्नती-2024)च्या प्रस्तावाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. सुमारे 10,037 कोटी रुपये खर्चाच्या या योजनेची अधिसूचना जारी झाल्यापासून 10 वर्षांसाठी ही योजना राबवण्यात येणार असून वचनबद्ध दायित्वाची 8 वर्ष असणार आहेत.