PM Modi outlines the M.A.N.A.V. vision for AI at India AI Impact Summit 2026
February 19th, 10:00 am
PM Modi inaugurated the AI Impact Summit 2026 and remarked that the world’s largest AI Impact Summit is being held in India, a nation representing one-sixth of humanity. He highlighted that the core purpose of the summit is to deliberate on how AI can be made human-centric. He also presented India’s M.A.N.A.V. Vision for AI and extended an invitation to the world with the call: ‘Design and Develop in India. Deliver to the World. Deliver to Humanity’.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026 चे उद्घाटन
February 19th, 09:40 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026’ चे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधितही केले. जगभरातील एक षष्ठांश मानवजातीचे प्रतिनिधित्व करत असलेल्या भारातात, जगातील ही सर्वात मोठी आणि ऐतिहासिक एआय इम्पॅक्ट समिट परिषद होत असल्याची बाब त्यांनी नमूद केली. भारतामध्ये जगातील सर्वात मोठी युवा लोकसंख्या आहे, तंत्रज्ञान विषयक कौशल्यांच्या बाबतीत सर्वात मोठे मनुष्यबळ भारतात आहे, यासोबतच भरभराटीला आलेली तंत्रज्ञानाधारीत परिसंस्थाही भारतात असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. भारत केवळ नवीन तंत्रज्ञानाची निर्मिती करत नाही, तर अभूतपूर्व वेगाने तंत्रज्ञानाचा अवलंबही करत असल्याचे त्यांनी नमूद केले. 140 कोटी भारतीय नव्या तंत्रज्ञानांचा अंगिकार करण्यासाठी उत्सुक असल्याचेही त्यांनी सांगितले. या सगळ्यांच्या वतीने त्यांनी, या परिषदेसाठी आलेल्या विविध देशांचे प्रमुख, जागतिक एआय विषयक परिसंस्थेतील आघाडीची व्यक्तिमत्वे आणि या परिषदेत सहभागी झालेल्या संशोधकांचे स्वागतही केले. या सगळ्यांनी नोंदवलेल्या सहभागाबद्दल त्यांनी कृतज्ञताही व्यक्त केली. या परिषदेचे यजमानपद भूषवणे ही केवळ भारतासाठीच नव्हे, तर ग्लोबल साऊथ अंतर्गत असलेल्या प्रत्येक देशासाठी अभिमानाची बाब असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.स्टार्टअप इंडियाच्या दशकपूर्ती कार्यक्रमातील पंतप्रधानांचे भाषण
January 16th, 01:30 pm
आताच मला स्टार्टअप क्षेत्रातील काही प्रतिनिधींशी संवाद साधण्याची, त्यांच्या यशकथा आणि प्रयोग जवळून पाहण्याची, तसेच त्यांचे अनुभव ऐकण्याची संधी मिळाली. कृषी, फिनटेक, गतिशीलता, आरोग्य आणि शाश्वतता या क्षेत्रांत कार्यरत स्टार्टअप्सच्या कल्पना केवळ मला नव्हे, तर सर्वांनाच प्रभावित करणाऱ्या आहेत. तरीही, तुमच्यातील आत्मविश्वास आणि तुमच्या उंचावलेल्या महत्त्वाकांक्षा यांनी मी भारावलो आहे.युनायटेड किंगडमच्या पंतप्रधानांसोबत संयुक्त पत्रकार परिषदेदरम्यान पंतप्रधानांचे निवेदन
July 24th, 04:20 pm
सर्वप्रथम, मी पंतप्रधान स्टार्मर यांचे त्यांच्या स्नेहपूर्ण स्वागताबद्दल मनापासून आभार मानू इच्छितो. आजचा दिवस दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये ऐतिहासिक आहे. अनेक वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर आज दोन्ही देशांमध्ये व्यापक आर्थिक आणि व्यापार करार झाला आहे याचा मला आनंद आहे.PM chairs an extensive meeting of the Advisory Board of WAVES
February 07th, 11:41 pm
The Prime Minister Shri Narendra Modi chaired an extensive meeting of the Advisory Board of WAVES through Video Conference today. WAVES is a global summit that brings together the world of entertainment, creativity and culture.इंडोनेशिया, जकार्ता येथील श्री सनातन धर्म आलायम यांच्या महा कुंभाभिशेगम दरम्यान पंतप्रधानांचे संबोधन
February 02nd, 02:45 pm
काहीच दिवसांपुर्वी 140 कोटी भारतीयांचे प्रेम सोबत घेऊन राष्ट्रपती प्रबोवो भारतातून परतले आहेत. त्यांच्या माध्यमातून तुम्हा सर्वांना प्रत्येक भारतीयाने दिलेल्या शुभेच्छा जाणवत असतील याची मला खात्री आहे.इंडोनेशियात जकार्ता येथे श्री सनातन धर्म अलायमच्या महा कुंभाभिषेगमला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले संबोधित
February 02nd, 02:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इंडोनेशियातील जकार्ता येथे श्री सनातन धर्म अलायमच्या महा कुंभभिषेगमला व्हिडिओ संदेशाद्वारे संबोधित केले. त्यांनी महामहिम, अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो, मुरुगन टेंपल ट्रस्टचे अध्यक्ष पा हाशिम, व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. कोबलन, तमिळनाडू आणि इंडोनेशियाचे मान्यवर, पुजारी आणि आचार्य, भारतीय वंशाचे सदस्य, या शुभ प्रसंगाचा भाग असलेले इंडोनेशिया आणि इतर देशातील नागरिक तसेच ज्या प्रतिभावान कलाकारांमुळे हे दैवी आणि भव्य मंदिर प्रत्यक्षात आले त्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.‘युनिटी इन क्रिएटीव्हिटी’ स्पर्धेतील विजेत्यांचे तसेच सहभागी झालेल्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन
February 08th, 09:59 am
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त, 2021 साली आयोजित ‘युनिटी इन क्रिएटीव्हिटी’म्हणजेच सृजनतेतील एकता या स्पर्धेतील विजेत्यांचे तसेच सहभागी झालेल्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.