अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांनी साधला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीद्वारे संवाद
August 08th, 10:58 pm
अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे. डी. व्हान्स यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या 250 व्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधानांच्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना शुभेच्छा
July 04th, 09:40 pm
अमेरिकेच्या स्वातंत्र्याला 250 वर्षे पूर्ण झाल्याच्या ऐतिहासिक घटनेनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड जे. ट्रम्प आणि अमेरिकेच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. मोदी यांनी आपल्या संदेशात भारत-अमेरिका यांच्यातील कायम टिकून असलेल्या भागीदारीची ताकद अधोरेखित केली आहे. या दोन लोकशाही देशांमधील संबंध धोरणात्मक भागीदारीच्याही पलीकडचे असून, ते दोन्ही देशांची समान लोकशाही मूल्ये, कायद्याचे राज्य आणि आपापल्या जनतेच्या अफाट क्षमतेवरील विश्वास या पायावर आधारलेले असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एव्हियन येथे आयोजित G7 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची भेट घेतली
June 18th, 05:04 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 जून 2026 रोजी फ्रान्समधील एव्हियन येथे आयोजित G7 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड जे. ट्रम्प यांची भेट घेतली.अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली
May 23rd, 04:20 pm
अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.गुजरातमधील साणंद येथील केन्स सेमिकाॅन प्रकल्पाच्या उदघाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा मजकूर
March 31st, 01:05 pm
गेल्या महिन्याच्या अखेरीस मी साणंदला आलो होतो आणि या महिना अखेरीस देखील साणंदमध्ये उपस्थित आहे. दिनांक 28 फेब्रुवारी रोजी माइक्रोन प्रकल्पातून उत्पादनाची सुरुवात झाली आणि आज 31 मार्च रोजी केन्स टेक्नॉलॉजीयुक्त सेमीकंडक्टर प्रकल्पातून उत्पादन सुरू झाले आहे.हा केवळ योगायोग नाही तर भारताची सेमीकंडक्टर परिसंस्था कशा गतीने, किती जलद, किती वेगाने काम करत आहे याचे हे उदाहरण आहे. रमेश रघु आपले अभिनंदन! गुजरात सरकार तसेच या प्रकल्पांवर काम करणाऱ्या सर्वांचेच आणि माझ्या मित्रांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुजरातमध्ये साणंद येथे 'केन्स सेमीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुजरातमध्ये साणंद येथे 'केन्स सेमीकॉन' प्रकल्पाचे उद्घाटनकॉन' प्रकल्पाचे उद्घाटन
March 31st, 01:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमध्ये साणंद येथे 'केन्स टेक्नॉलॉजी'च्या सेमीकंडक्टर प्रकल्पाचे उद्घाटन केले; यासह या प्रकल्पातील उत्पादनास औपचारिक सुरुवात झाली आहे. 28 फेब्रुवारी रोजी 'मायक्रॉन' प्रकल्पातील उत्पादनाच्या प्रारंभासाठी आपण साणंद येथे उपस्थित होतो आणि बरोबर एका महिन्यानंतर 'केन्स'च्या या महत्त्वपूर्ण टप्प्यानिमित्त आपण पुन्हा येथे आलो आहोत, या बाबीचा उल्लेख करत पंतप्रधानांनी भारताच्या सेमीकंडक्टर क्षेत्रातील प्रगतीला प्राप्त झालेल्या गतीवर विशेष भर दिला. हा केवळ एक योगायोग नाही, तर भारताची सेमीकंडक्टर परिसंस्था ज्या वेगाने विकसित होत आहे, त्याचा हा एक ठोस पुरावा आहे, असे मोदी यांनी नमूद केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी संवाद
February 02nd, 11:15 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात आज संवाद झाला. भारतीय उत्पादनांवरील टॅरिफ अर्थात प्रशुल्क कमी करून 18% करण्याच्या घोषणेबद्दल राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे पंतप्रधान मोदी यांनी 1.4 अब्ज भारतीयांच्या वतीने आभार मानले.पंतप्रधानांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांशी साधला संवाद
December 11th, 08:50 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी दूरध्वनीव्दारे संवाद साधला.दिवाळीच्या शुभेच्छांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार व्यक्त, सामाईक लोकशाही आदर्श आणि जागतिक शांततेप्रती असलेल्या वचनबद्धतेची पुष्टी
October 22nd, 08:25 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे त्यांनी दिलेल्या दिवाळीच्या शुभेच्छांसाठी तसेच दीपोत्सवानिमित्त दूरध्वनीवरून साधलेल्या संपर्कासाठी आभार व्यक्त केले.पंतप्रधानांनी भारत- अमेरिका संबंध बळकट असल्याचा केला पुनरुच्चार
September 10th, 07:52 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारत-अमेरिका संबंधांच्या बळकटीचा पुनरुच्चार करत दोन्ही देशांदरम्यान सुरू असलेल्या व्यापारविषयक वाटाघाटींवर विश्वास व्यक्त केला. उभय देशांचे अधिक चांगले, समृद्ध भविष्य सुनिश्चित करण्यासाठी दोन्ही देश एकत्र काम करतील, असे मोदी यांनी म्हटले आहे.पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमधील दूरध्वनी संभाषणाबाबत परराष्ट्र सचिवांचे निवेदन
June 18th, 12:32 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची जी 7 शिखर परिषदेच्या निमित्ताने भेट होणार होती.मात्र राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना लवकर अमेरिकेला परतावे लागले,त्यामुळे ही बैठक होऊ शकली नाही.The World This Week on India
April 22nd, 12:27 pm
From diplomatic phone calls to groundbreaking scientific discoveries, India’s presence on the global stage this week was marked by collaboration, innovation, and cultural pride.अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर विभागाच्या संचालक तुलसी गॅबार्ड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतली भेट.
March 17th, 08:52 pm
अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर विभागाच्या संचालक तुलसी गॅबार्ड यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.For me, the nation itself is divine and mankind is a reflection of the divine: PM Modi in Lex Fridman Podcast
March 16th, 11:47 pm
PM Modi interacted with Lex Fridman in a podcast about various topics ranging from fasting to his humble beginnings to AI and more. He stressed on the unifying power of sports and said that they connect people on a deeper level and energize the world. He remarked that the management of Indian elections should be studied worldwide.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका पॉडकास्टमध्ये लेक्स फ्रिडमन यांच्याशी साधला संवाद
March 16th, 05:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका पॉडकास्टच्या माध्यमातून आज अमेरिकी संगणक शास्त्रज्ञ लेक्स फ्रिडमन यांच्याशी विविध विषयांवर संवाद साधला. या मनमोकळ्या संभाषणादरम्यान जेव्हा पंतप्रधानांना विचारण्यात आले की ते उपवास का करतात आणि कशा पद्धतीने करतात तेव्हा मोदी यांनी पंतप्रधानांप्रती आदराचे प्रतीक म्हणून स्वतः उपवास धरण्याच्या लेक्स फ्रिडमन यांच्या कृतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. “भारतात धार्मिक परंपरा दैनंदिन जीवनासोबत खोलवर रुजलेल्या आहेत ,” असे पंतप्रधान म्हणाले. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेल्या अर्थानुसार, हिंदुत्व हे केवळ धार्मिक रीतीभातीविषयीचे तत्व नसून जीवनाला मार्गदर्शन करणारे तत्वज्ञान आहे असे त्यांनी सांगितले. उपवास हे शिस्त अंगी बाणवण्यासाठीचे तसेच आंतरिक आणि बाह्य आत्म्याचा समतोल साधण्यासाठीचे साधन आहे यावर मोदी यांनी अधिक भर दिला. उपवास केल्यामुळे आपल्या जाणीवा अधिक संवेदनशील तसेच जागरूक होऊन अधिक प्रखर बनतात असे त्यांनी नमूद केले. उपवासाच्या काळात कोणाकोणाला सूक्ष्म सुगंध आणि तपशील अधिक स्पष्टपणे जाणवतात असे निरीक्षण त्यांनी नोंदवले. उपवासामुळे विचार प्रक्रियेला वेग येऊन नवीन दृष्टीकोन सापडत जातात आणि चौकटीबाहेरच्या विचारांना प्रोत्साहन मिळते असे देखील पंतप्रधानांनी अधोरेखित केले. उपवास म्हणजे केवळ अन्न वर्ज्य करणे नव्हे तर त्यामध्ये मनाची तसेच शरीराची तयारी आणि विषारी तत्वांचे निःसारण करण्याची शास्त्रीय प्रक्रिया समाविष्ट आहे असे त्यांनी स्पष्ट केले. कितीतरी दिवस आधीच ते आयुर्वेदिक आणि योग प्रक्रियांचे अनुसरण करून ते उपवासासाठी त्यांच्या शरीराला सज्ज करतात यावर अधिक भर देऊन पंतप्रधान मोदी यांनी या काळात पाणी पीत राहण्याचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले की एकदा उपवास सुरु झाला की त्यानंतर ते त्याला भक्ती आणि स्वयंशिस्तीची कृती मानतात आणि त्या काळात सखोल आत्मचिंतन आणि लक्ष एकाग्र करण्यावर भर देतात. पंतप्रधान म्हणाले की त्यांच्या उपवासाचे मूळ वैयक्तिक अनुभवामध्ये असून त्यांच्या शालेय जीवनादरम्यान महात्मा गांधी यांच्या प्रेरणेतून सुरु झालेल्या चळवळीदरम्यान उपवास धरण्याची सुरुवात त्यांनी केली. त्यांच्या पहिल्याच उपवासादरम्यान त्यांना उर्जा आणि जागरुकता यामध्ये मोठी वाढ होत असल्याची अनुभूती आली आणि त्यातून उपवासाच्या परिवर्तनशील सामर्थ्याबद्दल त्यांची खात्री झाली असा अनुभव पंतप्रधानांनी सर्वांना सांगितला. उपवासामुळे त्यांच्या क्रिया मंद होत नाहीत तर उलट बहुतेकदा त्यांची उत्पादकता वाढते असे त्यांनी आवर्जून नमूद केले. ते म्हणाले की उपवासादरम्यान त्यांच्या विचारांचा ओघ अधिक मुक्तपणे आणि सर्जकतेसह वाहतो आणि त्यांच्यासाठी तो स्वतःला व्यक्त करण्याचा एक अतुलनीय अनुभव होऊन जातो.अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारल्याबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन
January 20th, 10:57 pm
अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारल्याबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे. भारत आणि अमेरिकेतील संबंध बळकट करण्यासाठी आणि जगाचे चांगले भविष्य घडवण्यात सहयोगासाठी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यासोबत मिळून काम करण्याची उत्सुकता पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केली. पंतप्रधानांनी डोनाल्ड ट्रम्प यांना आगामी यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.अमेरिकेने भारताला 297 प्राचीन कलाकृती परत केल्या
September 22nd, 12:11 pm
भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत भारतीय पुरातत्व सर्वेक्षण आणि अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक व्यवहार ब्युरो यांनी उभय देशांमधील घनिष्ठ द्विपक्षीय संबंध कायम राखण्यासाठी आणि उत्तम सांस्कृतिक समज वाढवण्याच्या उद्देशाने जुलै 2024 मध्ये सांस्कृतिक संपत्ती करारावर स्वाक्षरी केली होती. सांस्कृतिक वारशाचे संरक्षण करण्यासाठी सहकार्य वाढवण्यासाठी अध्यक्ष बायडेन आणि पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केलेली वचनबद्धता पूर्ण करणे हा यामागचा उद्देश असून जून 2023 मधील त्यांच्या बैठकीनंतर जारी केलेल्या संयुक्त निवेदनात ते प्रतिबिंबित होते.Fact Sheet: 2024 Quad Leaders’ Summit
September 22nd, 12:06 pm
President Biden hosted the fourth Quad Leaders’ Summit with leaders from Australia, Japan, and India in Wilmington, Delaware. The Quad continues to be a global force for good, delivering projects across the Indo-Pacific to address pandemics, natural disasters, maritime security, infrastructure, technology, and climate change. The leaders announced new initiatives to deepen cooperation and ensure long-term impact, with commitments to secure robust funding and promote interparliamentary exchanges. Quad Commerce and Industry ministers are set to meet for the first time in the coming months.Fact Sheet: Quad Countries Launch Cancer Moonshot Initiative to Reduce the Burden of Cancer in the Indo-Pacific
September 22nd, 12:03 pm
The Quad countries—US, Australia, India, and Japan—launched the Quad Cancer Moonshot to combat cervical cancer in the Indo-Pacific. This initiative aims to strengthen cancer care by enhancing health infrastructure, promoting HPV vaccination, increasing screenings, and expanding treatment. During the Quad Leaders' Cancer Moonshot event, India commited to providing HPV sampling kits, detection tools and cervical cancer vaccines worth $7.5 million to the Indo-Pacific region.Joint Fact Sheet: The United States and India Continue to Expand Comprehensive and Global Strategic Partnership
September 22nd, 12:00 pm
President Biden and PM Modi reaffirmed the U.S.-India Comprehensive Global and Strategic Partnership, highlighting unprecedented levels of trust and collaboration. They emphasized shared values like democracy, freedom, and human rights, while commending progress in defense cooperation. President Biden praised India's global leadership, including its G-20 role and humanitarian efforts in Ukraine. Both leaders supported India's permanent membership in a reformed U.N. Security Council and underscored the importance of the U.S.-India partnership in building a secure, prosperous, and inclusive future.