जी-7 शिखर परिषदे निमित्त पंतप्रधानांनी घेतली संयुक्त अरब अमिरातीच्या अध्यक्षांची भेट
June 17th, 12:38 am
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज फ्रान्समधील एव्हियन इथे आयोजित, जी-7 शिखर परिषदेदरम्यान संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांची भेट घेतली. 2026 या वर्षभरातील, उभय नेत्यांची ही तिसरी भेट होती. ही भेट भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यातील दृढ आणि गतिमान 'सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी'चं प्रतीक आहे.परिणामांची यादी: पंतप्रधानांचा संयुक्त अरब अमिराती दौरा
May 15th, 03:46 pm
पंतप्रधान मोदींच्या युएई च्या अधिकृत दौऱ्यादरम्यान अनेक सामंजस्य करार आणि करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यामध्ये पेट्रोलियम, तेल, संरक्षण, जहाजांची दुरुस्ती, सागरी सहकार्य आणि महासंगणक (सुपरकंप्युटिंग) यांसारख्या क्षेत्रांचा समावेश आहे. एका मोठ्या घोषणेनुसार, अबू धाबी इन्व्हेस्टमेंट अथॉरिटी (एडीआयए) आणि भारताचा एनआयआयएफ हे भारताच्या पायाभूत सुविधा क्षेत्रात 1 अब्ज अमेरिकन डॉलर पर्यंतच्या गुंतवणुकीच्या संधी शोधत आहेत.संयुक्त अरब अमिरातचे राष्ट्राध्यक्ष महामहिम शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांच्या भारत भेटीची फलनि:ष्पत्ती
January 19th, 08:23 pm
गुजरात सरकार आणि संयुक्त अरब अमिरातीच्या गुंतवणूक मंत्रालयादरम्यान धोलेरा विशेष गुंतवणूक क्षेत्राच्या विकासासाठी गुंतवणूक सहकार्याबाबत इरादापत्रसंयुक्त निवेदन: संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष महामहिम शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांची भारत भेट
January 19th, 08:10 pm
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आमंत्रणावरून संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष महामहिम शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांनी 19 जानेवारी 2026 रोजी भारताला अधिकृत भेट दिली. महामहिम शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांची गेल्या दहा वर्षांतील ही पाचवी भेट असून संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर ही त्यांची तिसरी भेट आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून संयुक्त अरब अमिरातीचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्र्याचे स्वागत
December 12th, 08:44 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त अरब अमिरातीचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री शेख अब्दुल्ला बिन झायेद अल् नह्यान यांच्या आगमनाप्रसंगी उपस्थित राहून त्यांचे स्वागत केले.कॉप-28 परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांची भेट
December 01st, 07:55 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 डिसेंबर 2023 रोजी यूएई मध्ये कॉप-28 परिषदेच्या पार्श्वभूमीवर संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांची भेट घेतली.