Cabinet approves Rs. One Lakh Crore Urban Challenge Fund to Drive Market-Led Urban Transformation

February 14th, 01:09 pm

The Union Cabinet, chaired by PM Modi, has approved the launch of the Urban Challenge Fund (UCF) with a total Central Assistance of Rs. one lakh crore. This will lead to a total investment of Rs. four lakh crore in the urban sector over the next five years. The fund gives effect to the Government’s vision announced in Budget 2025–26 to implement proposals relating to Cities as Growth Hubs.

पंतप्रधानांनी भूषवले 49व्या प्रगती बैठकीचे अध्यक्षपद

September 24th, 09:56 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज साऊथ ब्लॉक येथे 'प्रगती' (PRAGATI) - प्रो-ॲक्टिव्ह गव्हर्नन्स अँड टाइमली इम्प्लिमेंटेशन या माहिती आणि तंत्रज्ञान आधारित, मल्टी-मोडल व्यासपीठाच्या 49 व्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले. हे व्यासपीठ प्रमुख प्रकल्पांना गती देण्यासाठी, अडचणी दूर करण्यासाठी आणि वेळेनुसार वितरण सुनिश्चित करण्यासाठी केंद्र आणि राज्यांना एकत्र आणते.

We launched the SVAMITVA Yojana to map houses and lands using drones, ensuring property ownership in villages: PM

January 18th, 06:04 pm

PM Modi distributed over 65 lakh property cards under the SVAMITVA Scheme to property owners across more than 50,000 villages in over 230 districts across 10 states and 2 Union Territories. Reflecting on the scheme's inception five years ago, he emphasised its mission to ensure rural residents receive their rightful property documents. He expressed that the government remains committed to realising Gram Swaraj at the grassroots level.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वामित्व लाभार्थ्यांसोबत साधला संवाद

January 18th, 05:33 pm

मध्य प्रदेशातील सिहोर येथील स्वामित्व लाभार्थी मनोहर मेवाडा यांच्यासोबत संवाद साधताना पंतप्रधानांनी त्यांना स्वामित्व योजनेविषयीचा त्यांचा अनुभव विचारला. मालमत्तेच्या कागदपत्रांमुळे त्यांनी कशा प्रकारे कर्ज मिळवले आणि त्यामुळे त्यांच्या जीवनात कशा प्रकारे बदल झाला आहे, असे पंतप्रधानांनी मनोहर यांना विचारले. त्यावर आपल्या डेरी फार्मसाठी 10 लाख रुपयांचे कर्ज घेतल्याची आणि त्यामुळे आपला व्यवसाय सुरू करता आल्याची माहिती मनोहर यांनी दिली. आपली मुले आणि पत्नी देखील या डेरी फार्ममध्ये काम करत आहेत आणि यामुळे अतिरिक्त उत्पन्न मिळत आहे असे मनोहर यांनी सांगितले.मालमत्तेची कागदपत्रे असल्यामुळे बँकेकडून कर्ज मिळवणे सोपे झाले असे मनोहर यांनी अधोरेखित केले. केंद्र सरकारी योजनांमुळे लोकांच्या जीवनातील अडचणी कमी झाल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. स्वामित्व योजनेमुळे लाखो कुटुंबांच्या उत्पन्नात वाढ झाली असल्याचे पाहून आपल्याला आनंद झाला असल्याचे पंतप्रधान म्हणाले. प्रत्येक नागरिकाने त्याची मान अभिमानाने उंचवावी आणि त्याच्या जीवनात सुलभता अनुभवावी हे सुनिश्चित करण्याला सरकारचे प्राधान्य असल्यावर त्यांनी भर दिला. याच दृष्टीकोनाचा स्वामित्व योजना ही विस्तार असल्याचे त्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमध्ये स्वामित्व योजने अंतर्गत 65 लाखांपेक्षा जास्त प्रॉपर्टी कार्ड्सचे केले वितरण

January 18th, 12:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 10 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमध्ये 230 जिल्ह्यांमधील 50,000 पेक्षा जास्त गावांमध्ये मालमत्ता धारकांना दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून स्मामित्व योजने अंतर्गत 65 लाखांपेक्षा जास्त प्रॉपर्टी कार्ड्सचे वितरण केले. भारतामधील गावे आणि ग्रामीण भागांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे, असे त्यांनी या कार्यक्रमाला संबोधित करताना सांगितले आणि सर्व लाभार्थी आणि नागरिकांना या निमित्ताने शुभेच्छा दिल्या. ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांना त्यांची प्रॉपर्टी कार्ड्स मिळतील हे सुनिश्चित करण्यासाठी पाच वर्षांपूर्वी स्वामित्व योजना सुरू करण्यात आली, असे पंतप्रधान म्हणाले. विविध राज्यांमध्ये मालमत्ता मालकी प्रमाणपत्रांना घरोनी, अधिकार अभिलेख, प्रॉपर्टी कार्ड, मालमत्ता पत्रक आणि आवासीय भूमी पत्ता यांसारख्या विविध नावांनी ओळखले जाते असे त्यांनी नमूद केले.

स्वामित्व योजनेंतर्गत मालमत्ताधारकांना 65 लाखांहून अधिक प्रॉपर्टी कार्ड पंतप्रधान 18 जानेवारी रोजी करणार वितरित

January 16th, 08:44 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी 18 जानेवारी रोजी दुपारी 12:30 वाजता दूरदृश्य प्रणालीद्वारे 10 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमधील 230 हून अधिक जिल्ह्यांमधील 50000 हून अधिक गावांमधील मालमत्ता मालकांना स्वामित्व योजनेंतर्गत 65 लाखांहून अधिक प्रॉपर्टी कार्डचे वितरण करणार आहेत.

स्वामित्व योजनेंतर्गत 50 लाखांहून अधिक मालमत्ताधारकांना पंतप्रधान मालमत्ता पत्रे करणार वितरित

December 26th, 04:50 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 डिसेंबर रोजी दुपारी 12:30 वाजता दृकश्राव्य माध्यमाद्वारे 10 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमधील 200 जिल्ह्यांमधील 46,000 हून अधिक गावांमधील मालमत्ताधारकांना स्वामित्व (SVAMITVA) योजनेअंतर्गत 50 लाखांहून अधिक मालमत्ता पत्रांचे वितरण करणार आहेत.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना आणि इतर कल्याणकारी योजना अंतर्गत पोषणमूल्ययुक्त तांदळाचा मोफत पुरवठा जुलै, 2024 ते डिसेंबर 2028 या कालावधीत सुरू ठेवण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

October 09th, 03:07 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना आणि इतर कल्याणकारी योजनासह सरकारच्या सर्व योजनांअंतर्गत पोषणमूल्ययुक्त तांदळाचा सार्वत्रिक पुरवठा सध्याच्या स्वरूपात जुलै 2024 ते डिसेंबर 2028 पर्यंत सुरू ठेवण्यास मंजुरी दिली आहे.

पंतप्रधान भूषवणार 7 ऑगस्ट रोजी आयोजित नीती आयोगाच्या नियामक परिषदेच्या बैठकीचे अध्यक्षपद

August 05th, 01:52 pm

भारताच्या स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण होत असताना, राज्यांनी गतिमान , लवचिक आणि आत्मनिर्भर असण्याची आणि सहकारी संघराज्याच्या भावनेने 'आत्मनिर्भर भारत'कडे वाटचाल करण्याची प्रबळ गरज आहे. एक स्थिर, शाश्वत आणि सर्वसमावेशक भारत निर्माण करण्याच्या दिशेने,नीती आयोगाच्या नियामक परिषदेची 7वी बैठक 7 ऑगस्ट 2022 रोजी आयोजित करण्यात आली असून ही बैठक केंद्र आणि राज्ये/केंद्रशासित प्रदेश दरम्यानचे सहयोग आणि सहकार्याच्या नवीन युगाच्या दिशेने समन्वयाचा मार्ग मोकळा करेल.

सर्व सरकारी योजनांमध्ये पोषणयुक्त तांदूळ वितरणास केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता

April 08th, 03:58 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक केंद्रीय मंत्रिमंडळ समितीने आज राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (NFSA), एकात्मिक बाल विकास सेवा (ICDS), प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण-पीएम पोषण [पूर्वीची मध्यान्ह भोजन योजना (MDM)] आणि भारत सरकारच्या इतर कल्याणकारी योजना (OWS) अंतर्गत सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये (UTs) 2024 पर्यंत टप्प्याटप्प्याने संपूर्ण लक्ष्यीत सार्वजनिक वितरण प्रणाली (TPDS) मध्ये पोषणयुक्त तांदुळाचा पुरवठा करण्यास मान्यता दिली आहे.