लखनौ शहराला युनेस्कोच्या खाद्यपरंपरेतील नवोन्मेषी शहर म्हणून मान्यता मिळाल्याबद्दल पंतप्रधानांकडून आनंद व्यक्त
November 01st, 02:13 pm
लखनौला युनेस्कोच्या खाद्यपरंपरेतील नवोन्मेषी शहर म्हणून मान्यता मिळाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. लखनौ म्हणजे उत्साही संस्कृतीचे प्रतीक असून एक समृद्ध खाद्य परंपरा त्याच्या केंद्रस्थानी आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. युनेस्कोच्या या मान्यतेमुळे शहराचा हा वैशिष्ट्यपूर्ण पैलू अधोरेखित झाल्याचे मोदी यांनी नमूद केले. जगभरातील लोकांनी लखनौला भेट द्यावी आणि तिथले हे वैशिष्ट्य अनुभवावे, असे आवाहन पंतप्रधानांनी केले आहे.युनेस्कोच्या (UNESCO) क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्कमध्ये कोळीकोडचा ‘साहित्य नगरी’, आणि ग्वाल्हेरचा ‘संगीत नगरी’ म्हणून समावेश झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन
November 01st, 04:56 pm
युनेस्कोच्या (UNESCO) क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्कमध्ये कोळीकोडचा ‘साहित्य नगरी’, आणि ग्वाल्हेरचा ‘संगीत नगरी’ म्हणून समावेश झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल पंतप्रधान मोदी यांनी कोळीकोड आणि ग्वाल्हेरच्या जनतेचे अभिनंदन केले आहे.श्रीनगर हे युनेस्को क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्क (UCCN) मध्ये सामील झाल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला
November 08th, 10:55 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीनगर हे युनेस्को क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्क (UCCN) मध्ये त्याच्या हस्तकला आणि लोककलांच्या वैशिष्ट्यासह सामील झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.