Our shared democratic values and common aspirations will take India-Indonesia relations to new heights: PM Modi at Indonesia Parliament
July 07th, 03:15 pm
Addressing the Parliament of Indonesia in Jakarta, PM Modi spoke about the deep civilisational and democratic ties between India and Indonesia. He also highlighted their maritime partnership, proposed the Ganga-Mahakam Vision and called for closer cooperation across development, security and the Global South, while reaffirming a free, open, inclusive and rules-based Indo-Pacific.पंतप्रधानांनी इंडोनेशियाच्या संसदेला केले संबोधित
July 07th, 03:00 pm
पंतप्रधानांनी आपल्या संबोधनाची सुरुवात इंडोनेशियाचे अध्यक्ष महामहीम प्रबोवो सुबियांतो यांच्या सन्माननीय उपस्थितीबद्दल त्यांचे, आणि संसदेच्या अध्यक्षा महामहीम पुआन महारानी यांनी दिलेल्या अगत्यपूर्ण आमंत्रणाबद्दल व भारत-इंडोनेशिया भागीदारीतील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल आभार मानून केली. भारताच्या 1.4 अब्ज जनतेच्या वतीने खासदारांना शुभेच्छा देताना ते म्हणाले की, 'लोकशाहीची जननी' या नात्याने भारत इंडोनेशियासोबतचे लोकशाही संबंध अधिक दृढ करण्यासाठी उत्सुक आहे. दोन्ही देशांमधील सखोल सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि सागरी संबंध अधोरेखित करत, दोन सहस्रकांहून अधिक काळ हिंदी महासागराने विचार, व्यापार, संस्कृती आणि श्रद्धेच्या देवाणघेवाणीद्वारे भारत आणि इंडोनेशियाला जोडले असल्याची आठवण पंतप्रधानांनी करून दिली. 'वसुधैव कुटुंबकम्' आणि 'भिन्नेक तुंगल इका' (विविधतेत एकता) या दोन्ही देशांच्या समान आदर्शांचा उल्लेख करत त्यांनी स्पष्ट केले की, ही मूल्ये आजही दोन्ही देशांमधील भागीदारीला दिशा देत आहेत. ते पुढे म्हणाले की, समान ऐतिहासिक प्रवास, समान आव्हाने आणि दोन्ही देशांतील जनतेच्या समान आकांक्षा यामुळे भारत आणि इंडोनेशिया नैसर्गिक आणि विश्वासू भागीदार म्हणून एकत्र आले आहेतIndia-Slovakia Joint Statement
June 15th, 05:32 pm
At the invitation of Slovak Republic PM Robert Fico, PM Modi visited Slovakia on 15 June 2026. Both leaders agreed to elevate the India-Slovakia relationship to a Comprehensive Partnership and to regularly review its implementation. They also agreed that the visit represents a significant step forward in transforming India-Slovakia relations and committed to taking bilateral ties into a new phase of engagement.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नॉर्वेच्या पंतप्रधानांसोबत केली द्विपक्षीय चर्चा
May 18th, 08:21 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नॉर्वेचे पंतप्रधान महामहीम जोनास गहर स्टोर यांच्यासोबत ओस्लो इथे द्विपक्षीय चर्चा केली. भारत आणि नॉर्वे यांच्यातील दृढ संबंधांचे प्रतीक म्हणून, पंतप्रधान स्टोर यांनी आज सकाळी पंतप्रधान मोदी यांचे ओस्लो विमानतळावर आगमन झाल्यावर अत्यंत उत्साहाने स्वागत केले.एआय इम्पॅक्ट समिटच्या निमित्ताने पंतप्रधानांची संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांशी भेट
February 20th, 09:52 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 फेब्रुवारी 2026 रोजी एआय इम्पॅक्ट समिटच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रांचे महासचिव (यूएनएसजी) अँटोनियो गुटेरेस यांची भेट घेतली.आयबीएसए नेत्यांच्या बैठकीत पंतप्रधानांचे निवेदन
November 23rd, 12:45 pm
जोहानस-बर्ग” सारख्या जिवंत आणि सुंदर शहरात आयबीएसए नेत्यांच्या बैठकीत सहभागी होणे माझ्यासाठी अत्यंत आनंदाचा विषय आहे. या बैठकीसाठी मी आयबीएसए चे अध्यक्ष राष्ट्रपति लुला यांचे मनापासून आभार मानतो. आणि राष्ट्रपति रामाफोसा यांना आदरातिथ्याबद्दल धन्यवाद देतो.जोहान्सबर्ग येथे आयबीएसए नेत्यांच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सहभाग
November 23rd, 12:30 pm
ही बैठक अत्यंत योग्य वेळी होत असल्याचे सांगून पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले की ही बैठक आफ्रिकेच्या भूमीवर झालेल्या पहिल्या जी-20 शिखर परिषदेच्या निमित्ताने झाली असून ग्लोबल साउथ देशांच्या सलग चार जी-20 अध्यक्षपदाच्या कार्यकाळाचा समारोप करते. या चारपैकी शेवटची तीन अध्यक्षपदे भारत - ब्राझील - दक्षिण आफ्रिका संवाद मंच (आयबीएसए) सदस्य राष्ट्रांकडे होती. या दरम्यान मानव-केंद्रित विकास, बहुपक्षीय सुधारणा आणि शाश्वत विकासावर लक्ष केंद्रित करणारे अनेक महत्त्वाचे उपक्रम राबवण्यात आले आहेत, असे त्यांनी नमूद केले.डेन्मार्कच्या पंतप्रधान मेटे फ्रेडरिक्सन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून साधला संवाद
September 16th, 07:29 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज डेन्मार्कच्या पंतप्रधान मेटे फ्रेडरिक्सन यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.पंतप्रधानांनी घेतली ब्राझीलच्या राष्ट्रपतींची भेट
July 09th, 06:02 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्राझीलियाच्या राजकीय दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज ब्राझीलियातील अल्व्होराडा पॅलेस येथे ब्राझीलचे राष्ट्रपती महामहिम लुईझ इनासियो लुला दा सिल्वा यांची भेट घेतली. आगमनानंतर, अध्यक्ष लूला यांनी पंतप्रधानांचे हार्दिक स्वागत केले आणि त्यांनंतर औपचारिक आणि स्वागत सोहळा पार पडला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सायप्रस प्रजासत्ताकाचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलिडेस यांची भेट घेतली
June 16th, 03:15 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सायप्रस प्रजासत्ताकाचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलिडेस यांच्याशी चर्चा केली. अध्यक्षांच्या निवासस्थानी आगमन झाल्यावर, सायप्रसचे अध्यक्ष क्रिस्टोडौलिडेस यांनी पंतप्रधानांचे समारंभपूर्वक औपचारिक स्वागत केले. काल सायप्रस इथे दाखल झाल्यानंतर क्रिस्टोडौलिडेस यांनी विमानतळावर पंतप्रधानांचे स्नेहपूर्ण स्वागत केले यातून दोन्ही राष्ट्रांमधील परस्पर विश्वास आणि चिरस्थायी मैत्री दिसून येते.पंतप्रधान अँटिग्वा आणि बर्बुडाच्या पंतप्रधानांना भेटले
November 21st, 09:37 am
गयाना मधील जॉर्जटाऊन येथे आयोजित दुसऱ्या भारत-कॅरीकॉम शिखर परिषदेच्या अनुषंगाने तेथे गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवार, 20 नोव्हेंबर रोजी अँटिग्वा आणि बर्बुडाचे पंतप्रधान गॅस्टन ब्राऊन यांची भेट घेतली.जी-7 शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधानांनी दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांची घेतली भेट
June 27th, 09:21 pm
जी -7 शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 27 जून 2022 रोजी जर्मनीतील श्लोस एलमाऊ येथे दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांची सिरिल रामाफोसा यांची भेट घेतली.'आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठी सागरी सुरक्षा वाढवणे' यावरील संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद उच्च स्तरीय खुल्या चर्चेत पंतप्रधानांनी मांडलेले विचार
August 09th, 05:41 pm
सागरी सुरक्षेवरील या महत्वपूर्ण चर्चेत सहभागी झाल्याबद्दल तुम्हा सर्वांना धन्यवाद. मी सरचिटणीसांचा सकारात्मक संदेश आणि U.N.O.D.C. च्या कार्यकारी संचालकांच्या भाषणाबद्दल आभार व्यक्त करतो. डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोच्या राष्ट्रपतींनी आफ्रिकन महासंघाचे अध्यक्ष म्हणून आपला संदेश दिला. मी त्यांचा विशेष आभारी आहे. मी रशियाचे राष्ट्रपती, केनियाचे राष्ट्रपती, आणि व्हिएतनामच्या पंतप्रधानांच्या उपस्थितीबद्दल देखील मनापासून आभार व्यक्त करतो.पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली “सागरी सुरक्षा वाढवणे- आंतरराष्ट्रीय सहकार्याचा एक भाग” या विषयावरील संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची उच्च-स्तरीय मुक्त चर्चा
August 08th, 05:18 pm
“सागरी सुरक्षा वाढविणे- आंतरराष्ट्रीय सहकार्याचा एक भाग” या विषयावरील संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या (यूएनएससी) उच्चस्तरीय मुक्त चर्चेचे अध्यक्षपद पंतप्रधान नरेंद्र मोदी भूषविणार आहेत. ही चर्चा 9 ऑगस्ट रोजी भारतीय प्रमाणित वेळेनुसार सायंकाळी साडेपाच वाजता आयोजित करण्यात आली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि व्हिएतनामचे पंतप्रधान फाम मिन्ह चिन्ह यांच्यात दूरध्वनीवरुन चर्चा
July 10th, 01:08 pm
व्हिएतनामचे नवे पंतप्रधान म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल मोदी यांनी फाम मिन्ह चिन्ह यांचे अभिनंदन केले. भारत-व्हिएतनाम यांच्यातील सर्वसमावेशक मुत्सद्दी भागीदारी पुढेही अशीच कायम राहून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली ती अधिक मजबूत होईल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.