सार्थक-पीडीएस व्यापक योजनेंतर्गत दोन योजनांचे एकत्रीकरण करून त्यांची अंमलबजावणी सुरु ठेवायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

May 27th, 02:53 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक केंद्रीय मंत्रिमंडळ समितीने (सीसीईए) 16 व्या वित्त आयोगाच्या कार्यकाळात केंद्राचा वाटा म्हणून 25,530 कोटी रुपयांच्या अर्थसहाय्यासह “अन्नधान्य वाहतूक तसेच हाताळणीतून मिळणाऱ्या उत्पन्नाचे व्यवस्थापन आणि सार्वजनिक वितरण प्रणालीचे (पीडीएस) स्वयंचलिकरण करण्यासाठीच्या योजनेची (सार्थक-पीडीएस) व्यापक योजना म्हणून अंमलबजावणी सुरु ठेवायला मंजुरी दिली आहे.

“महिलांच्या सुरक्षितते”शी संबंधित सर्वसमावेशक योजना लागू करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

February 21st, 11:41 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने 2021-22 ते 2025-26 या कालावधीत एकूण 1179.72 कोटी रुपये खर्चाच्या “महिलांची सुरक्षा”विषयक सर्वसमावेशक योजनेची अंमलबजावणी सुरु ठेवण्याच्या केंद्रीय गृह मंत्रालयाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली.