Cabinet approves 4-laning of Badnawar–Timarwani NH-752D stretch of the Delhi Mumbai expressway in Madhya Pradesh
March 10th, 04:23 pm
The Cabinet Committee on Economic Affairs, chaired by PM Modi, has approved the development of a 4-lane corridor from Badnawar to Timarwani worth ₹3,839.42 crore. It will provide connectivity from Ujjain to the Timarwani interchange at the Delhi-Mumbai Expressway (DME). This will lower logistics costs, facilitate efficient movement of raw materials and finished goods and strengthen access to industrial hubs and MMLPs.गोव्यामधील श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठाच्या 550 व्या वर्धापनदिन कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
November 28th, 03:35 pm
आज या पवित्र प्रसंगी मनामध्ये खोलवर शांतता भरली आहे. साधू-संतांच्या सानिध्यामध्ये बसल्यानंतर आपोआपच आध्यात्मिक अनुभव येत असतो. इथे विशाल संख्येने उपस्थित असलेल्या भाविकांमुळे लक्षात येते की, या मठाची शतकांपासूनच प्राचीन जीवंत शक्ती आजही वृद्धिंगत होत आहे. आज या समारंभाला मला उपस्थित राहता आले, याबद्दल मी स्वतःला खूप भाग्यवान मानतो. इथे येण्यापूर्वी मला राम मंदिर आणि वीर विठ्ठल मंदिराचे दर्शन करण्याचे भाग्य लाभले. त्या शांत वातावरणाने या कार्यक्रमाच्या आध्यात्मिकतेला आणखी सखोलता प्राप्त झाली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्यातील श्री संस्थान गोकर्ण पार्तगळी जीवोत्तम मठाच्या 550 व्या वर्षपूर्ती समारंभाला केले संबोधित
November 28th, 03:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गोव्यातील श्री संस्थान गोकर्ण पार्तगळी जीवोत्तम मठाच्या 550 व्या वर्षपूर्ती समारंभाला संबोधित केले. या पवित्र प्रसंगी आपले मन गहन शांतीने भरले आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले. संतांच्या उपस्थितीत, त्यांच्या सोबत बसणे हा स्वतःच एक आध्यात्मिक अनुभव आहे, यावर त्यांनी भर दिला. येथे मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या भक्तांमुळे या मठाची शतकानुशतके जुनी जिवंत शक्ती आणखी वाढली आहे, असे नमूद करून मोदी म्हणाले की, आज या समारंभात लोकांमध्ये उपस्थित राहणे हे आपले भाग्य आहे. येथे येण्यापूर्वी आपल्याला राम मंदिर आणि वीर विठ्ठल मंदिराला भेट देण्याचा सौभाग्य लाभले, असे त्यांनी सांगितले. तेथील शांतता आणि तिथल्या वातावरणामुळे या समारंभाची आध्यात्मिकता अधिक सखोल झाली आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी 31 मे रोजी मध्य प्रदेश दौऱ्यावर
May 30th, 11:15 am
लोकमाता देवी अहिल्याबाई होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी 31 मे रोजी मध्य प्रदेशला भेट देणार आहेत. सकाळी 11.15 च्या सुमारास ते भोपाळमध्ये लोकमाता देवी अहिल्याबाई महिला सशक्तिकरण महासंमेलनात सहभागी होणार आहेत. या शिवाय त्यांच्या हस्ते भोपाळमध्ये विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करण्यात येणार असून ते सार्वजनिक कार्यक्रमालाही संबोधित करणार आहेत.पंतप्रधानांचे मध्यप्रदेशात भोपाळ येथे आयोजित जागतिक गुंतवणूकदार परिषद 2025 मधील उद्घाटनपर भाषण
February 24th, 10:35 am
सर्वप्रथम मला इथे येण्यास विलंब झाला, त्याबद्दल मी तुम्हा सर्वांची क्षमा मागतो. विलंब अशासाठी झाला की काल मी जेव्हा इथे पोहोचलो, तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की आज 10 वी आणि 12 वी च्या विद्यार्थ्यांची परीक्षा आहे, आणि त्यांच्या परीक्षेची वेळ आणि माझी राजभवनातून बाहेर पडण्याची वेळ साधारण एकच होती. आणि त्यामुळे शक्यता अशी होती की सुरक्षेच्या कारणाने जर रस्ते बंद झाले तर, मुलांना परीक्षेच्या वेळेत पोहोचणं कठीण झालं असतं. हा अडथळा येऊ न देता मुलं एकदाची परीक्षा केंद्रावर पोहोचल्यानंतरच राजभवनातून निघावं असा विचार मी केला, त्यामुळे मी निघतानाच 15-20 मिनिटं उशीर केला आणि त्यामुळे तुम्हा सर्वांची जी गैरसोय झाली, त्याबद्दल मी पुन्हा एकदा माफी मागतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील भोपाळ येथे जागतिक गुंतवणूकदार शिखर परिषद 2025 चे केले उद्घाटन
February 24th, 10:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मध्य प्रदेशात भोपाळ येथे जागतिक गुंतवणूकदार शिखर परिषद(GIS) 2025 चे उद्धाटन केले. यावेळी बोलताना पंतप्रधानांनी या कार्यक्रमात येण्यासाठी त्यांना विलंब झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. दहावी आणि बारावी इयत्तांच्या बोर्डाच्या परीक्षा सुरू असल्यामुळे कार्यक्रमाच्या मार्गावर त्यांच्या सुरक्षेच्या उपाययोजनांमुळे विद्यार्थ्यांना असुविधा होऊ नये म्हणून विलंबाने आल्याचे त्यांनी सांगितले. राजा भोज यांच्या भूमीमध्ये गुंतवणूकदार आणि व्यवसाय क्षेत्रातील अग्रणी यांचे स्वागत करताना आपल्याला अतिशय अभिमान वाटत आहे, असे मोदी म्हणाले. विकसित भारताच्या दिशेने होणाऱ्या वाटचालीत विकसित मध्य प्रदेश किंवा विकास झालेला मध्य प्रदेश महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी मध्य प्रदेश सरकारचे या शिखर परिषदेच्या अतिशय उत्तम आयोजनाबद्दल अभिनंदन केले.उत्तर प्रदेशात प्रयागराज येथे विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण
December 13th, 02:10 pm
उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल जी, मुख्यमंत्री श्री योगी आदित्यनाथ जी, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य जी, ब्रजेश पाठक जी, उत्तर प्रदेशचे मंत्री, सहकारी खासदार आणि आमदार, प्रयागराजचे महापौर आणि जिल्हा पंचायत अध्यक्ष, इतर मान्यवर आणि माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुमारे 5500 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकार्पण
December 13th, 02:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुमारे 5500 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकार्पण केले. उपस्थितांना संबोधित करताना, पंतप्रधान संगमाची पवित्र भूमी असलेल्या प्रयागराजसमोर भक्तीभावाने नतमस्तक झाले आणि महाकुंभसाठी उपस्थित असलेल्या संत आणि साधूंना अभिवादन केले. मोदी यांनी कर्मचारी, श्रमिक आणि सफाई कर्मचाऱ्यांप्रति कृतज्ञता व्यक्त केली जे महाकुंभ यशस्वी होण्यासाठी मेहनत आणि समर्पित वृत्तीने कार्यरत आहेत. महाकुंभची भव्य व्याप्ती आणि आकार लक्षात घेत पंतप्रधान म्हणाले की, हा जगातील सर्वात मोठ्या मेळाव्यांपैकी एक आहे जिथे 45 दिवस चालणाऱ्या महायज्ञासाठी दररोज लाखो भाविकांचे स्वागत केले जाते आणि त्यासाठी संपूर्ण नवीन शहर उभारले जाते. प्रयागराजच्या भूमीवर नवा इतिहास लिहिला जात आहे, असे उद्गार पंतप्रधानांनी काढले. पुढील वर्षी होणाऱ्या महाकुंभाचे आयोजन देशाच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक अस्मितेला नव्या उंचीवर नेईल असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले आणि एकतेच्या या ‘महायज्ञ’ची जगभरात चर्चा होईल असे सांगितले. महाकुंभच्या यशस्वी आयोजनासाठी त्यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या.गुवाहाटी येथे विविध प्रकल्पांचे भूमीपूजन, उद्घाटन आणि लोकार्पण कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
February 04th, 12:00 pm
आसामचे राज्यपाल गुलाबचंद कटारिया जी, मुख्यमंत्री डॉ. हिमंता बिस्वा सरमा जी, मंत्रिमंडळातील माझे सहकारी सर्बानंद सोनोवाल जी, रामेश्वर तेली जी, आसाम सरकारचे मंत्री, खासदार आणि आमदार, विविध परिषदांचे प्रमुख आणि माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो!पंतप्रधानांनी आसाम मधील गुवाहाटी येथे 11,000 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे केले उद्घाटन आणि पायाभरणी
February 04th, 11:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आसाममधील गुवाहाटी येथे 11,000 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. गुवाहाटीमधील मुख्य लक्षीत क्षेत्रांमध्ये क्रीडा आणि वैद्यकीय पायाभूत सुविधा तसेच संपर्क सुविधेला चालना देणारे प्रकल्प समाविष्ट आहेत.दिल्लीतील लाल किल्ल्यावर आयोजित, इंडिया आर्ट, आर्किटेक्चर आणि डिझाईन बिएनाले 2023, या भारतीय कला, वास्तूकला आणि रचना या महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा मजकूर
December 08th, 06:00 pm
प्रत्येक राष्ट्राची स्वतःची अशी प्रतिके-खुणा असतात. या खुणा जगाला त्या देशाच्या भूतकाळाची आणि त्याच्या मूल्यांची ओळख करून देतात. आणि, ही प्रतिके घडवण्याचे काम राष्ट्राच्या कला, संस्कृती आणि वास्तू करत असतात. राजधानी दिल्ली अशा अनेक प्रतिकांचे केंद्र आहे, ज्यात आपल्याला भारतीय वास्तुच्या भव्यतेचे दर्शन घडते. त्यामुळे दिल्लीत आयोजित ‘इंडिया आर्ट आर्किटेक्चर अँड डिझाईन बिएनाले’ हा भारतीय कला, वास्तूरचना शास्त्र आणि रचना महोत्सव, अनेक अर्थांनी विशेष आहे. मी इथे उभारलेली, सजवलेली दालने बघत होतो, आणि मी उशीरा आलो त्याबद्दल तुमची माफी देखील मागतो कारण मला यायला उशीर याच कारणामुळे झाला..इथे अशा अनेक गोष्टी पाहण्यासारख्या आणि व्यवस्थित वेळ देऊन समजून घेण्यासारख्या असल्यामुळे त्यात वेळ जाऊन मला उशीर झाला. तरीही मला 2 ते 3 जागा सोडाव्या लागल्या. या दालनांमध्ये रंग आणि सर्जनशीलता आहे. त्यात संस्कृती आहे, तसेच सामाजिक प्रतिबिंब आहे. मी या यशस्वी आरंभाबद्दल, सांस्कृतिक मंत्रालय, त्याचे सर्व अधिकारी, सर्व सहभागी देश आणि तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो. आपल्याकडे असे म्हटले जाते की पुस्तक म्हणजे जग पाहण्याची एक लहानशी खिडकी म्हणून सुरुवात आहे. मी असे मानतो की कला हा मानवी मनातून प्रवास करण्याचा राजमार्ग आहे.दिल्ली मधील लाल किल्ला येथे पंतप्रधानांच्या हस्ते पहिल्या इंडियन आर्ट, आर्किटेक्चर आणि डिझाईन बिएनाले 2023 चे उद्घाटन
December 08th, 05:15 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लाल किल्ल्यावर आयोजित पहिल्या इंडियन आर्ट, आर्किटेक्चर आणि डिझाईन बिएनाले 2023 (आयएएडीबी) अर्थात भारतीय कला, स्थापत्य आणि रचना द्वैवार्षिक कार्यक्रम 2023 चे उद्घाटन केले. कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावर ‘आत्मनिर्भर भारत डिझाइन सेंटर’ आणि समुन्नती या विद्यार्थी द्वैवार्षिक कार्यक्रमाचे उद्घाटन केले. त्यांनी स्मृती तिकिटही प्रकाशित केले. याप्रसंगी आयोजित प्रदर्शनालाही मोदी यांनी भेट दिली. भारतीय कला, स्थापत्य आणि रचना द्वैवार्षिक कार्यक्रम दिल्लीतील सांस्कृतिक ठिकाणांची ओळख करून देईल.पंतप्रधान मोदींची हैदराबादमध्ये कोटी दीपोत्सवास उपस्थिती
November 27th, 08:18 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबाद, तेलंगणा येथे कोटी दीपोत्सवात सहभागी होऊन उपस्थितांना संबोधित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, कोविड साथीच्या कठीण काळातही, आपण त्यामुळे उद्भवलेल्या सर्व समस्या आणि आव्हानांवर मात करण्यासाठी दिवे लावले होते. जेव्हा लोकांचा 'व्होकल फॉर लोकल'वर विश्वास असतो तेव्हा त्यांचा कोट्यवधी भारतीयांच्या क्षमतेवरील विश्वास पणत्या उजळवण्यातून व्यक्त होतो . उत्तराखंडमधील बोगद्यात अडकलेल्या विविध श्रमिकांची सुखरुप सुटका व्हावी अशी प्रार्थनाही त्यांनी केली.संत मीराबाई यांच्या 525 व्या जयंतीनिमित्त मथुरा इथे आयोजित कार्यक्रमातील पंतप्रधानांचे संबोधन
November 23rd, 07:00 pm
राजस्थानच्या निवडणूक प्रचारामुळे मला यायला उशीर झाल्याबद्दल सर्वप्रथम मी आपणा सर्वांची क्षमा मागतो.प्रचार मैदानातून आता या भक्तिमय वातावरणात आलो आहे.आज ब्रज दर्शनाची संधी,ब्रजवासीयांच्या दर्शनाची संधी मला लाभली हे माझे भाग्य आहे. कारण इथे अशी व्यक्ती येते ज्यांना श्रीकृष्ण आणि श्रीजी बोलावतात.ही भूमी असाधारण आहे.ब्रज आपल्या ‘श्यामा- श्याम जू’ यांचे धाम आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशातील मथुरा येथे संत मीराबाई जन्मोत्सवात झाले सहभागी
November 23rd, 06:27 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेश मधील मथुरा येथे संत मीराबाई यांच्या 525 व्या जयंती निमित्त आयोजित संत मीराबाई जन्मोत्सव कार्यक्रमात भाग घेतला. पंतप्रधानांनी यावेळी संत मीराबाई यांच्या स्मरणार्थ विशेष टपाल तिकीट आणि नाणे प्रकाशित केले. या ठिकाणी आयोजित प्रदर्शनालाही पंतप्रधानांनी भेट दिली आणि सांस्कृतिक कार्यक्रमाला उपस्थित राहिले. संत मीराबाई यांच्या स्मृती प्रीत्यर्थ वर्षभर चालणार्या कार्यक्रमांची आज सुरुवात झाली.PM Modi campaigns in Madhya Pradesh’s Betul, Shajapur and Jhabua
November 14th, 11:30 am
Amidst the ongoing election campaigning in Madhya Pradesh, Prime Minister Modi’s rally spree continued as he addressed multiple public meetings in Betul, Shajapur and Jhabua today. PM Modi said, “In the past few days, I have traveled to every corner of the state. The affection and trust towards the BJP are unprecedented. Your enthusiasm and this spirit have decided in Madhya Pradesh – ‘Phir Ek Baar, Bhajpa Sarkar’. The people of Madhya Pradesh will come out of their homes on 17th November to create history.”अंमली पदार्थांच्या सेवनाविरुद्धच्या मोहिमेतील तरुणांचा वाढता सहभाग अतिशय उत्साहवर्धक: पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
July 30th, 11:30 am
माझ्या प्रिय देशवासियांनो, ‘मन की बात’मध्ये तुम्हां सर्वांचे खूप खूप स्वागत.जुलै महिना म्हणचे मान्सूनचा महिना, पावसाचा महिना. नैसर्गिक आपत्तींमुळे गेले काही दिवस चिंता आणि त्रासाने भरलेले होते.यमुनेसहअनेक नद्यांना आलेल्या पुरामुळे बऱ्याच भागांमधल्या लोकांना त्रास झाला. डोंगराळ भागात भूस्खलन होण्याच्या घटना देखील घडल्या. याच दरम्यान, काही काळापूर्वी देशाच्या पश्चिम भागात, पूर्व गुजरातच्या काही क्षेत्रामध्ये बिपरजॉय चक्रीवादळ देखील आले. पण मित्रांनो, या संकटांच्या काळात पुन्हा एकदा आपण सर्व देशवासीयांनी दाखवून दिले की, सामुहिक प्रयत्नांमध्ये किती शक्ती असते. स्थानिक लोकांनी, आपल्या एनडीआरएफच्या जवानांनी, स्थानिक प्रशासनात कार्यरत लोकांनी रात्रंदिवस झगडून अशा संकटांचा सामना केला आहे. कोणत्याही संकटातून बाहेत पडण्यासाठी आपले सामर्थ्य आणि साधनसंपत्ती यांची भूमिका फार मोठी असते – मात्र त्याबरोबरच आपली संवेदनशीलता आणि एकमेकांचा हात धरुन ठेवण्याची भावना देखील तितकीच महत्त्वाची असते. ‘सर्वजन हिताय’ ची हीच भावना भारताची ओळख देखील आहे आणि भारताची शक्ती देखील आहे.Today, after 9 years, I am happy to say that our partnership with Nepal has truly been a "HIT": PM Modi
June 01st, 12:00 pm
PM Modi, in his address during the press meet PM Prachanda, acknowledged the significant bilateral ties between India and Nepal. He said that the ‘HIT’ formula would serve as a transformative agenda in the relations between the two countries. Various agreements in the areas of rail connectivity, energy, cross border digital payments among others were signed between the two countries.नवी दिल्लीत अधीनम यांच्याशी झालेल्या संवादादरम्यान पंतप्रधानांनी केलेले भाषण
May 27th, 11:31 pm
सगळ्यात आधी मी विविध अधीनमशी (तामिळनाडूमधील मंदिरांतील अनुवांशिक विश्वस्त/ शिवभक्त) जोडल्या गेलेल्या तुम्हा सर्व पूज्यनीय संतांपुढे नतमस्तक होतो. तुमचे पाय माझ्या घराला लागले ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. भगवान शिवाच्याच कृपेमुळे एकाच वेळी तुम्हा सगळ्या शिवभक्तांच्या दर्शनाची संधी मला मिळाली. नव्या संसद भवनाचे लोकार्पण करताना तुम्ही सगळे समक्ष आशीर्वाद देणार आहात याचाही मला आनंद आहे.नवीन संसद भवनात सेंगोल (राजदंड) ची स्थापना करण्याआधी पंतप्रधानांनी घेतला अधिनमचा आशीर्वाद
May 27th, 09:14 pm
नवीन संसद भवनात उद्या सेंगोल (राजदंड)ची स्थापना करण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज अधिनमकडून (तामिळनाडूमधील मंदिरांतील अनुवांशिक विश्वस्त/ शिवभक्त) आशीर्वाद घेतले.