महाराष्ट्रातील मुंबई येथे अनेक विकास प्रकल्पांच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
October 08th, 03:44 pm
महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत जी, इथले लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी रामदास आठवले जी, के.आर. नायडू जी, मुरलीधर मोहोळ जी, महाराष्ट्र सरकारचे उपमुख्यमंत्री, एकनाथ शिंदे जी, अजित पवार जी, अन्य मंत्रीगण, जपानचे भारतातील राजदूत केइची ओनो आणि इतर मान्यवर, बंधू आणि भगिनींनो!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन, मुंबईतल्या विविध विकास प्रकल्पांचे देखील केले उद्घाटन आणि लोकार्पण
October 08th, 03:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन केले तसेच मुंबईतील विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकार्पण केले. सर्व मान्यवरांचे स्वागत करत, मोदी यांनी उपस्थितांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.अलिकडेच पार पडलेल्या विजयादशमी आणि कोजागरी पौर्णिमेच्या उत्सवाचा उल्लेख करत त्यांनी आगामी दिवाळी सणासाठी शुभेच्छा दिल्या.अरुणाचल प्रदेशात इटानगर इथे विकास प्रकल्पांच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
September 22nd, 11:36 am
हेलिपॅडवरुन इथं मैदानापर्यंत येणे, वाटेत इतक्या सगळ्या लोकांना भेटणे, लहान-लहान मुला-मुलींच्या हातात असलेला तिरंगा; अरुणाचलमधल्या या स्वागताने माझे ह्रदय आनंदाने, अभिमानाने भरुन आले आहे! आणि हे स्वागत इतके भव्य होते की मला इथे पोहोचायला उशीर झाला. उशीरा आल्याबद्दल मी तुम्हा सर्वांची क्षमा मागतो. अरुणाचलची ही भूमी सुर्योदयाची धरती आहेच; देशभक्तीच्या लाटेचीही धरती आहे. तिरंग्यावरचा पहिला रंग जसा केशरी आहे; तसाच अरुणाचलचा पहिला रंगदेखील केशरी आहे. इथला प्रत्येक माणूस शौर्याचे प्रतीक आहे, साधेपणाचे प्रतीक आहे. मी अरुणाचलमध्ये बरेच वेळा आलो आहे. राजकारणात सत्तेच्या प्रवाहात नव्हतो, तेव्हाही इथे आलो आहे; म्हणूनच इथल्या खूप साऱ्या आठवणी आहेत. त्या आठवून मलाही आनंद होतो. तुमच्या सगळ्यांसोबत घालवलेला प्रत्येक क्षण माझ्यासाठी एक आठवण असते. तुमचं इतकं प्रेम मला लाभलं; जीवनात यासारखं कोणतंही मोठं सुख नाही असे मी मानतो. तवांग मठ ते नमसाईतल्या सुवर्ण पगोडापर्यंतची ही अरुणाचलची भूमी शांती आणि संस्कृती यांचा संगम आहे. भारत मातेचा अभिमान आहे, या पुण्यभूमीला माझा सश्रद्ध नमस्कार.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरुणाचल प्रदेशातील इटानगर येथे 5,100 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकासकामांचे केले उद्घाटन आणि पायाभरणी
September 22nd, 11:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अरुणाचल प्रदेशातील इटानगर येथे 5,100 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकासकामांची पायाभरणी आणि उद्घाटन केले. याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी डोनयी पोलो यांना आदरांजली वाहिली आणि त्यांचे सर्वांना आशीर्वाद मिळावेत, अशी प्रार्थना केली.मिझोराममध्ये विकासकार्यांची पायाभरणी आणि उदघाटन समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण
September 13th, 10:30 am
मिझोरामचे राज्यपाल व्ही. के. सिंह जी, मुख्यमंत्री श्री लालदुहोमा जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी श्री अश्विनी वैष्णव जी, मिझोराम सरकारमधले मंत्रिगण, खासदार आणि इतर लोकप्रतिनिधी, मिझोरामच्या शानदार जनतेला शुभेच्छा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिझोरममधील आयझॉल येथे 9,000 कोटी रुपयांहून जास्त खर्चांच्या विकासकामांचे केले भूमिपूजन आणि उद्घाटन
September 13th, 10:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मिझोरममधील आयझॉल येथे 9,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चांच्या विकासकामांचे भूमिपूजन केले. हे प्रकल्प रेल्वे, रस्ते, ऊर्जा, क्रीडा यासह अनेक क्षेत्रांना गती देतील. दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थितांना संबोधित करताना, पंतप्रधानांनी निळ्या पर्वतांच्या सुंदर भूमीचे रक्षण करणाऱ्या सर्वोच्च देव पाथियनला नमन केले. मिझोरमच्या लेंगपुई विमानतळावर उपस्थित असूनही खराब हवामानामुळे ते आयझॉल येथे पोहचू शकले नाहीत, याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. तरीही या माध्यमातून लोकांचे प्रेम आणि आपुलकी अनुभवू शकत असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.पश्चिम बंगाल मध्ये दुर्गापुर येथे विविध विकास प्रकल्पांची सुरुवात करताना पंतप्रधानांनी केलेले भाषण
July 18th, 02:35 pm
आपले हे दुर्गापुर, पोलादी शहर असण्यासोबतच भारताच्या श्रमिक शक्तीचे देखील मोठे केंद्र आहे. भारताच्या विकासात दुर्गापुरने फार मोलाची भूमिका निभावली आहे. हीच भूमिका आणखी मजबूत करण्याची संधी आज आपल्याला मिळालेली आहे. काही वेळापूर्वी येथून 5 हजार चारशे कोटी रुपये मूल्याच्या प्रकल्पांची कोनशीला आणि लोकार्पण झाले आहे. हे सर्व प्रकल्प या भागातील जोडणीला आणखी सशक्त करतील. येथे वायूआधारित वाहतूक व्यवस्था तसेच वायू आधारित अर्थव्यवस्थेला अधिक चालना मिळेल. आजच्या प्रकल्पांमुळे या पोलादी शहराची ओळख आणखी ठळक होईल. म्हणजेच हे प्रकल्प, “मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड” च्या मंत्रासह पश्चिम बंगालला आगेकूच करण्यात मदत करतील. यातून येथील तरुणांसाठी रोजगाराच्या असंख्य नव्या संधी देखील निर्माण होतील. मी या प्रकल्पांसाठी तुम्हा सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमधील दुर्गापूर येथे 5,400 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विकास कामांचे केले भूमिपूजन आणि उद्घाटन
July 18th, 02:32 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पश्चिम बंगालमधील दुर्गापूर येथे 5,400 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि लोकार्पण केले. उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, स्टील सिटी म्हणून ओळखले जाणारे दुर्गापूर हे भारताच्या श्रम शक्तीचे प्रमुख केंद्र म्हणून देखील ओळखले जाते. या शहराने भारताच्या विकासात दिलेल्या योगदानाची नोंद घेऊन, ही भूमिका आणखी बळकट करण्याची आज संधी असल्याचे ते म्हणाले. आज सुरू करण्यात आलेल्या प्रकल्पांमुळे या भागातील कनेक्टिविटी वाढेल आणि गॅस-आधारित वाहतूक आणि गॅस-आधारित अर्थव्यवस्थेला चालना मिळेल तसेच स्टील सिटी म्हणून दुर्गापूरची ओळख आणखी मजबूत होईल, यावर मोदी यांनी भर दिला. हे प्रकल्प 'मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड' या संकल्पनेशी सुसंगत असून पश्चिम बंगालला पुढे न्यायला सहाय्य करतील, असे पंतप्रधान म्हणाले. या भागातील तरुणांसाठी रोजगाराच्या असंख्य नवीन संधी निर्माण होतील, असे ते म्हणाले. या विकास प्रकल्पांसाठी त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले.हरियाणातल्या हिसार विमानतळाच्या नव्या टर्मिनल इमारतीच्या पायाभरणी कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले भाषण
April 14th, 11:00 am
हरियाणाचे मुख्यमंत्री श्री. नायब सिंह सैनी जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी श्री. मुरलीधर मोहोळ जी, हरियाणा सरकारचे सर्व मंत्री, खासदार आणि आमदार, आणि माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिसार विमानतळाच्या 410 कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या नवीन टर्मिनल इमारतीची केली पायाभरणी
April 14th, 10:16 am
विमानप्रवास सर्वांसाठी सुलभ, किफायशीर आणि सुरक्षित करण्याच्या आपल्या वचनबद्धतेनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हरियाणातील हिसार येथील महाराजा अग्रसेन विमानतळाच्या 410 कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या नवीन टर्मिनल इमारतीची पायाभरणी केली. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधितही केले. त्यांनी हरियाणाच्या लोकांना शुभेच्छा दिल्या, त्यांची शक्ती, खिलाडूवृत्ती आणि बंधुता ही हरियाणाची ओळख असल्याचे कौतुक त्यांनी केले. या व्यस्त कापणीच्या हंगामात मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्यांनी दिलेल्या आशीर्वादांबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.पंतप्रधानांच्या सिलवासा येथील विकास कामांच्या उद्घाटनावेळी दिलेल्या भाषणाचा मजकूर
March 07th, 03:00 pm
दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीवचे प्रशासक प्रफुल्लभाई पटेल, संसदेमधील माझ्या सहकारी कलाबेन डेलकर, सर्व मान्यवर, बंधू-भगिनींनो, नमस्कार!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सिल्वासा, केंद्रशासित प्रदेश दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव येथे 2580 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकास कामांचे उद्घाटन आणि लोकार्पण
March 07th, 02:45 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सिल्वासा, केंद्रशासित प्रदेश दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव येथे 2580 कोटींहून अधिक खर्चाच्या विविध विकासकामांचे उद्घाटन केले. या कार्यक्रमापूर्वी त्यांनी सिल्वासा येथे नमो रुग्णालयाचे उद्घाटनही केले. उपस्थितांना संबोधित करताना, पंतप्रधानांनी त्यांना या प्रदेशाशी जोडण्याची आणि सहभागी होण्याची संधी दिल्याबद्दल दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशातील समर्पित कामगारांप्रति कृतज्ञता व्यक्त केली . इथल्या लोकांशी असलेले त्यांचे जिव्हाळ्याचे आणि दीर्घकालीन बंध यांचा त्यांनी उल्लेख केला आणि सांगितले की या प्रदेशाशी त्यांचे संबंध अनेक दशके जुने आहेत . 2014 मध्ये त्यांचे सरकार सत्तेवर आल्यापासून दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीव प्रदेशाने केलेली प्रगती त्यांनी अधोरेखित केली . या प्रदेशांनी त्यांची क्षमता शक्तीमध्ये परिवर्तित करून आधुनिक आणि प्रगतीशील म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली.जयपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या उदयोन्मुख राजस्थान जागतिक गुंतवणूक शिखर परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
December 09th, 11:00 am
राजस्थानच्या विकास यात्रेतील आज एक महत्वाचा दिवस आहे. देश आणि जगभरातून खूप मोठ्या संख्येने प्रतिनिधी, गुंतवणूकदार या गुलाबी नगरीमध्ये आले आहेत. इथल्या उद्योग विश्वातील अनेक सहकारीही आज इथे उपस्थित आहेत. ‘उदयोन्मुख राजस्थान शिखर परिषदेमध्ये आपल्या सर्वांचे अभिनंदन करतो. इतक्या शानदार कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल मी राजस्थानच्या भाजपा सरकारला शुभेच्छा देतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रायझिंग राजस्थान जागतिक गुंतवणूक शिखर परिषदेचे केले उद्घाटन
December 09th, 10:34 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राजस्थानमध्ये जयपूर येथे रायझिंग राजस्थान ग्लोबल इन्व्हेस्टमेंट समिट 2024 या गुंतवणूकदार शिखर परिषदेचे आणि राजस्थान ग्लोबल बिझनेस एक्स्पो या प्रदर्शनाचे उद्घाटन केले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले, आज राजस्थानच्या यशस्वी वाटचालीमधील आणखी एक विशेष दिवस आहे. त्यांनी जयपूर या गुलाबी शहरात सर्व उद्योग आणि व्यापार क्षेत्रातील अग्रणी, गुंतवणूकदार, प्रतिनिधींचे रायझिंग राजस्थान ग्लोबल इन्व्हेस्टमेंट समिट 2024 मध्ये स्वागत केले. या भव्य कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल राजस्थान सरकारचे देखील अभिनंदन केले.Prime Minister Shri Narendra Modi commemorates UDAN's 8th anniversary
October 21st, 12:52 pm
The Prime Minister Shri Narendra Modi today commemorated the 8th anniversary of UDAN (Ude Desh ke Aam Nagrik) scheme that has revolutisioned India's avitation sector.नवी दिल्लीत दुसऱ्या आशिया प्रशांत नागरी विमान वाहतूक मंत्र्यांच्या परिषदेत पंतप्रधानांनी केलेले भाषण
September 12th, 04:00 pm
सर्व देशांच्या मान्यवरांचे मी मनापासून स्वागत करतो आणि या दोन दिवसीय शिखर परिषदेत तुम्ही या क्षेत्राशी संबंधित अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली आहे. मला विश्वास आहे की, नागरी विमान वाहतूक क्षेत्रातील तज्ञ मंडळी इथे आपल्यामध्ये उपस्थित आहेत. जे आपल्या सर्वांच्या वचनबद्धतेचे आणि आशिया-प्रशांत क्षेत्राच्या क्षमतेचे प्रतिबिंब आहे. आंतरराष्ट्रीय नागरी हवाई वाहतूक संघटनेला 80 वर्षे पूर्ण झाली आहेत आणि 80 हजार झाडे लावण्याचा आणि ती ही आईच्या नावाने लावण्याचा एक मोठा उपक्रम आपले मंत्री नायडू जी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली हाती घेण्यात आला. मात्र मी आणखी एका विषयाकडे तुमचे लक्ष आकर्षित करू इच्छितो, आपल्या देशात जेव्हा एखादी व्यक्ती 80 वर्षांची होते, तेव्हा तो आनंद एका वेगळ्या प्रकारे साजरा केला जातो; आणि आपल्याकडे आपल्या पूर्वजांनी जे काही गणित मांडले आहे, ते म्हणतात की जेव्हा एखादी व्यक्ती 80 वर्षांची होते तेव्हा त्या व्यक्तीने सहस्त्रचंद्रदर्शन म्हणजेच एक हजार वेळा पूर्ण चंद्र पाहिलेला असतो. याचा अर्थ या क्षेत्रातील आपल्या संघटनेने देखील एक हजार पौर्णिमा पाहिल्या आहेत आणि उड्डाण करून एक प्रकारे त्याला जवळून पाहण्याचा अनुभव देखील घेतला आहे. तर या पृथ्वीच्या लाटेतही 80 वर्षांचा हा अविस्मरणीय प्रवास, यशस्वी प्रवास अभिनंदनास पात्र आहे.Overwhelming support for the NDA at PM Modi's rallies in Nanded & Parbhani, Maharashtra
April 20th, 10:45 am
Ahead of the Lok Sabha elections, PM Modi addressed two public meetings in Nanded and Parbhani, Maharashtra amid overwhelming support by the people for the NDA. He bowed down to prominent personalities including Guru Gobind Singh Ji, Nanaji Deshmukh, and Babasaheb Ambedkar.DMK founded on 'Divide, Divide and Divide' and seeks to destroy 'Sanatan': PM Modi in Vellore
April 10th, 02:50 pm
Ahead of the Lok Sabha elections, Prime Minister Narendra Modi was accorded a warm welcome by the vibrant people of Vellore as he addressed a public meeting in Tamil Nadu. He said, I bow down to the history, mythology, and bravery of Vellore. He added, Vellore created a pivotal revolution against the British, and presently, its robust support for the N.D.A. showcases the spirit of 'Fir ek Baar Modi Sarkar'.Massive crowd support in Vellore & Mettupalayam as PM Modi addresses two public meetings in Tamil Nadu
April 10th, 10:30 am
Ahead of the Lok Sabha elections, Prime Minister Narendra Modi was accorded a warm welcome by the massive crowd support in Vellore and Mettupalayam as he addressed two public meetings in Tamil Nadu. He said, I bow down to the history, mythology, and bravery of Vellore. He added, Vellore created a pivotal revolution against the British, and presently, its robust support for the N.D.A. showcases the spirit of 'Fir ek Baar Modi Sarkar'.Tamil Nadu will shatter the false confidence and pride of the I.N.D.I alliance: PM Modi
March 15th, 11:45 am
On his visit to Tamil Nadu, PM Modi addressed a public rally in Kanyakumari. He said, There is a wave of confidence among the people of Tamil Nadu to reject any mandate that goes against the interests of India. He added, Tamil Nadu will shatter the false confidence and pride of the I.N.D.I. alliance. He said that he had embarked on an ‘Ekta Rally’ in 1991 from Kanyakumari to Kashmir and today I have returned from Kashmir to Kanyakumari.