महाराष्ट्रात नागपूर येथील माधव नेत्रालय प्रिमियम सेंटरच्या भूमिपूजन प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

March 30th, 11:53 am

गुढी पाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना अतिशय मनःपूर्वक शुभेच्छा! कार्यक्रमाला उपस्थित असलेले सरसंघचालक डॉ. मोहन भागवत जी, स्वामी गोविंद गिरी महाराज जी, स्वामी अवधेशानंद गिरी महाराज जी, महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, केंद्रिय मंत्रीमंडळातले माझे सहकारी नितीन गडकरी जी, डॉ. अविनाशचंद्र अग्निहोत्री जी, अन्य मान्यवर आणि इथे उपस्थित असलेल्या सर्व वरीष्ठ सहकाऱ्यांनो, आज या राष्ट्र यज्ञाच्या पवित्र कार्यक्रमात सहभागी होण्याचे भाग्य मला लाभले आहे. आजचा चैत्र शुद्ध प्रतिपदेचा हा दिवसही खास आहे. आजपासून नवरात्र सुरू होत आहे. देशाच्या निरनिराळ्या भागात आज गुढी पाडवा, उगादी आणि नवरेह सण साजरा केला जात आहे. आज भगवान झुलेलाल आणि गुरू अंगद देव यांचा प्रकटदिन देखील आहे. आमचे प्रेरणास्थान, परमपूज्य डॉक्टरसाहेबांचीही आज जयंती आहे आणि याच वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गौरवशाली परंपरेला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत. आजच्या दिवशी स्मृती मंदिराला भेट देऊन पूज्य डॉक्टर साहेब आणि गुरुजी यांना आदरांजली अर्पण करता आली, हे मी माझं भाग्य समजतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील नागपूर येथे माधव नेत्रालय प्रीमियम सेंटरची केली पायाभरणी

March 30th, 11:52 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महाराष्ट्रातील नागपूर येथे माधव नेत्रालय प्रीमियम सेंटरची पायाभरणी केली. उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी पवित्र नवरात्रोत्सवाचा प्रारंभ म्हणजेच चैत्र शुक्ल प्रतिपदेचे महत्त्व अधोरेखित केले. देशभरात आज गुढी पाडवा, उगादी आणि नवरेह असे सण साजरे केले जात असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. याच दिवसाला जोडून येणाऱ्या भगवान झुलेलाल आणि गुरु अंगद देव यांच्या जयंतीचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले. हा दिवस प्रेरणादायी डॉ. के. बी. हेडगेवार यांची जयंती तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) गौरवशाली प्रवासाच्या शताब्दी वर्षाची आठवण करून देणारा असल्याचेही त्यांनी सांगितले. आजच्या महत्त्वपूर्ण दिवशी डॉ. हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजींना आदरांजली वाहण्यासाठी स्मृती मंदिराला भेट देणे हा आपल्यासाठी सन्मान असल्याचे त्यांनी सांगितले.

मध्यप्रदेशात चित्रकूट इथे झालेल्या तुळसीपीठ कार्यक्रमात, पंतप्रधानांनी केलेले भाषण

October 27th, 03:55 pm

सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित पूजनीय जगद्गुरु श्री रामभद्राचार्यजी, इथे आलेली सर्व तपस्वी ज्येष्ठ संत मंडळी, ऋषी मंडळी, मध्य प्रदेशचे राज्यपाल मंगुभाई पटेल, मुख्यमंत्री बंधू शिवराजजी, उपस्थित इतर सर्व मान्यवर आणि सभ्य स्त्री पुरुष हो!

PM addresses programme at Tulsi Peeth in Chitrakoot, Madhya Pradesh

October 27th, 03:53 pm

PM Modi visited Tulsi Peeth in Chitrakoot and performed pooja and darshan at Kanch Mandir. Addressing the gathering, the Prime Minister expressed gratitude for performing puja and darshan of Shri Ram in multiple shrines and being blessed by saints, especially Jagadguru Rambhadracharya. He also mentioned releasing the three books namely ‘Ashtadhyayi Bhashya’, ‘Rambhadracharya Charitam’ and ‘Bhagwan Shri Krishna ki Rashtraleela’ and said that it will further strengthen the knowledge traditions of India. “I consider these books as a form of Jagadguru’s blessings”, he emphasized.