आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधा या विषयावरच्या आंतरराष्ट्रीय परिषदेतले पंतप्रधानांचे संबोधन
June 07th, 02:00 pm
आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधा 2025 या विषयावरच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत आपणा सर्वांचे स्वागत आहे. युरोपमध्ये ही परिषद प्रथमच आयोजित केली जात आहे. माझे मित्र, राष्ट्राध्यक्ष मॅक्रोन आणि फ्रान्स सरकारने केलेल्या सहयोगाबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आगामी संयुक्त राष्ट्र महासागर परिषदेसाठीही मी शुभेच्छा देतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधा संबंधित आंतरराष्ट्रीय परिषद 2025 ला केले संबोधित
June 07th, 01:26 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधा संबंधित आंतरराष्ट्रीय परिषद 2025 ला संबोधित केले. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधा संबंधित आंतरराष्ट्रीय परिषद 2025 चे युरोपात प्रथमच आयोजन होत आहे याचा उल्लेख करत पंतप्रधानांनी या परिषदेतील सहभागींचे स्वागत केले. हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष ईमॅन्युएल मॅक्रोन आणि फ्रेंच सरकार यांनी दिलेल्या पाठबळाबद्दल पंतप्रधानांनी कृतज्ञता व्यक्त केली. संयुक्त राष्ट्रांच्या आगामी महासागरी परिषदेच्या आयोजनासाठी पंतप्रधानांनी शुभेच्छा देखील दिल्या.हिमाचल प्रदेशातील लेपचा इथे सुरक्षा दलांसोबत दिवाळी साजरी करताना पंतप्रधानांनी केलेले भाषण
November 12th, 03:00 pm
भारतमातेचा जयघोष , भारतीय सैन्य आणि सुरक्षा दलांच्या पराक्रमाचा हा जयघोष , ही ऐतिहासिक भूमी आणि दीपावलीचा हा पवित्र सण. हा अद्भुत संयोग आहे. हा अद्भुत मिलाफ आहे. समाधान आणि आनंदाने भारावून टाकणारा हा क्षण माझ्यासाठी, तुमच्यासाठीही आणि देशवासियांसाठीही दिवाळी प्रकाशमय करेल असा मला विश्वास आहे. मी तुम्हा सर्वांना, सर्व देशवासियांना सीमेवरून, शेवटच्या गावातून, ज्याला मी आता पहिले गाव म्हणतो, तिथे तैनात आपल्या सुरक्षा दलाच्या जवानांसोबत मी दिवाळी साजरी करत आहे, त्यामुळे सर्व देशवासियांना दिवाळीच्या या शुभेच्छा देखील खूपच खास आहेत. देशवासियांचे हार्दिक अभिनंदन आणि दिवाळीच्या शुभेच्छा.हिमाचल प्रदेशातील लेपचा इथे पंतप्रधानांनी शूर जवानांसोबत केली दिवाळी साजरी
November 12th, 02:31 pm
जवानांना संबोधित करताना पंतप्रधानांनी सांगितले की, दिवाळीचा सण आणि जवानांच्या शौर्याचे गुणगान यांचा संयोग हा देशातील प्रत्येक नागरिकासाठी अध्यात्मिक अनुभूतीचा क्षण आहे. भारताच्या सीमावर्ती भागातील जवानांसह त्यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. देशातील शेवटचे गाव म्हणून ओळखले जाणारे हे गांव आता देशातील पहिले गाव ठरले आहे.'आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठी सागरी सुरक्षा वाढवणे' यावरील संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद उच्च स्तरीय खुल्या चर्चेत पंतप्रधानांनी मांडलेले विचार
August 09th, 05:41 pm
सागरी सुरक्षेवरील या महत्वपूर्ण चर्चेत सहभागी झाल्याबद्दल तुम्हा सर्वांना धन्यवाद. मी सरचिटणीसांचा सकारात्मक संदेश आणि U.N.O.D.C. च्या कार्यकारी संचालकांच्या भाषणाबद्दल आभार व्यक्त करतो. डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोच्या राष्ट्रपतींनी आफ्रिकन महासंघाचे अध्यक्ष म्हणून आपला संदेश दिला. मी त्यांचा विशेष आभारी आहे. मी रशियाचे राष्ट्रपती, केनियाचे राष्ट्रपती, आणि व्हिएतनामच्या पंतप्रधानांच्या उपस्थितीबद्दल देखील मनापासून आभार व्यक्त करतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिनांक 28 मार्च 2021 रोजी आकाशवाणीवरून देशाच्या नागरिकांना “मन की बात” द्वारे केलेले संबोधन
March 28th, 11:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिनांक 28 मार्च 2021 रोजी आकाशवाणीवरून देशाच्या नागरिकांना “मन की बात” द्वारे केलेले संबोधनइंडोनेशियामध्ये आलेल्या त्सुनामीत मृत्युमुखी पडलेल्यांसाठी पंतप्रधानांनी केले दुःख व्यक्त
December 23rd, 09:15 pm
इंडोनेशियामध्ये आलेल्या त्सुनामीत मृत्युमुखी पडलेल्यांसाठी पंतप्रधानांनी दुःख व्यक्त केले.