PM Modi shares a Sanskrit Subhashitam, paying rich tribute to Netaji Bose
December 30th, 10:10 am
PM Modi paid tribute to Netaji Subhas Chandra Bose on the historic occasion of December 30, 1943, when Netaji unfurled the Tricolour at Port Blair. The PM emphasised that this moment in history reminds the nation that freedom is not achieved merely through aspiration, but is forged through strength, hard work, justice and collective resolve.Prime Minister pays tributes to Shri Atal Bihari Vajpayee ji at ‘Sadaiv Atal’
December 25th, 11:21 am
On the occasion of birth anniversary of former PM Vajpayee, PM Modi paid tributes at Sadaiv Atal. He stated that Atal ji’s life was dedicated to public service and national service, and that he will always continue to inspire the people of the country.Prime Minister pays tributes to former Prime Minister Bharat Ratna Atal Bihari Vajpayee ji
December 25th, 08:43 am
The Prime Minister, Shri Narendra Modi has paid tributes to former Prime Minister Bharat Ratna Atal Bihari Vajpayee ji on his birth anniversary, today. Shri Modi stated that he dedicated his entire life to good governance and nation-building. He will always be remembered not only as an eloquent orator but also as a spirited poet. His personality, works, and leadership will continue to serve as a guiding path for the all-round development of the country, Shri Modi said.Prime Minister pays tributes to former PM Chaudhary Charan Singh ji on his birth anniversary
December 23rd, 09:39 am
On the birth anniversary of Former PM Bharat Ratna Chaudhary Charan Singh, PM Modi lauded his dedication to the welfare of the deprived sections of society and farmers. The PM also remarked that the country can never forget his contributions to nation-building.PM to visit Assam on 20-21 December
December 19th, 02:29 pm
PM Modi will visit Assam on 20-21 December to launch multiple development projects. In Guwahati, the PM will pay tribute to martyrs at Swahid Smarak Kshetra and also inaugurate the new terminal building of Lokapriya Gopinath Bardoloi International Airport. Additionally, the PM will perform the Bhoomipujan of the new brownfield Ammonia-Urea Fertilizer Project at Namrup, which will benefit farmers across the region.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती भवनातील 'परमवीर गॅलरी'चे केले स्वागत, देशाच्या अदम्य शूरवीरांना दिलेली ही मानवंदना
December 17th, 05:34 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती भवनातील 'परमवीर गॅलरी'चे स्वागत केले आहे. या गॅलरीत प्रदर्शित केलेली चित्रे देशाच्या अदम्य शूरवीरांना मनापासून अर्पण केलेली आदरांजली अजून त्यांच्या बलिदानाबद्दल देशाच्या कृतज्ञतेचे प्रतीक आहे, असे पंतप्रधान म्हणाले. ही चित्रे त्या शूर योद्ध्यांचा सन्मान करतात,ज्यांनी आपल्या सर्वोच्च त्यागाने मातृभूमीचे रक्षण केले. भारताची एकता आणि अखंडतेसाठी आपल्या प्राणांची आहुती दिली, असेही त्यांनी नमूद केले.विजय दिवसानिमित्त पंतप्रधानांनी केले शूर जवानांना अभिवादन
December 16th, 09:03 am
विजय दिनानिमित्त पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी 1971 च्या युद्धात भारताला ऐतिहासिक विजय मिळवून देणाऱ्या शूर जवानांच्या शौर्याला आणि बलिदानाला वंदन केले. त्यांचा अढळ निर्धार आणि निःस्वार्थ सेवा यांने देशाचे रक्षण केले आणि भारताच्या इतिहासात अभिमानाचा क्षण कोरला गेला, असे पंतप्रधान म्हणाले.लोहपुरुष सरदार वल्लभभाई यांच्या 75व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना पंतप्रधानांनी केले अभिवादन
December 15th, 08:44 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 75 व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना विनम्र आदरांजली वाहिली. ते म्हणाले की, सरदार पटेलांनी आपले संपूर्ण आयुष्य देशाला एकसंध करण्यासाठी आणि भारताला एकतेच्या सूत्रात गुंफण्यासाठी समर्पित केले.2001मध्ये संसदेवर झालेल्या हल्ल्यातील शहीदांना पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली
December 13th, 11:46 am
भारताच्या संसदेवर 13 डिसेंबर 2001 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यावेळी तिचे रक्षण करताना आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शूर सुरक्षा कर्मचाऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भावपूर्ण आदरांजली वाहिली.महाकवी सुब्रमण्यम भारती यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी त्यांना वाहिली श्रद्धांजली
December 11th, 10:29 am
महाकवी भारती यांच्या कवितांमुळे धैर्य निर्माण केले; त्यांच्या विचारांमध्ये असंख्य लोकांच्या मनावर कायमचा ठसा उमटवण्याची आणि भारताच्या सांस्कृतिक आणि राष्ट्रीय चेतनेला प्रकाश देण्याची शक्ती होती, असे मोदींनी म्हटले आहे. त्यांनी न्याय्य आणि समावेशक समाज निर्माण करण्यासाठी काम केले. तमिळ साहित्य समृद्ध करण्यातील त्यांचे योगदान देखील अतुलनीय आहे, असेही पुढे पंतप्रधानांनी म्हटले आहेस्वाहिद दिनानिमित्त पंतप्रधानांनी शहीदांना आदरांजली वाहिली
December 10th, 09:42 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या स्वाहिद दिनानिमित्त ऐतिहासिक आसाम चळवळीमध्ये सहभागी झालेल्या सर्वांच्या शौर्यपूर्ण योगदानाचे स्मरण केले.पंतप्रधानांनी सी. राजगोपालाचारी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना वाहिली श्रद्धांजली
December 10th, 09:37 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सी. राजगोपालाचारी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली आहे. स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत, बौद्धिक व्यक्तिमत्व आणि राजकारणी म्हणून त्यांचे स्मरण करत पंतप्रधानांनी नमूद केले आहे, की राजाजी हे विसाव्या शतकातील सर्वात कुशाग्र बुद्धिमत्ता लाभलेल्या विचारवंतांपैकी एक आहेत, ज्यांनी मूल्यनिर्मिती आणि मानवाच्या सन्मानाचे जतन करण्यावर विश्वास ठेवला.हिंदुस्तान टाइम्स लीडरशिप शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
December 06th, 08:14 pm
येथे हिंदुस्तान टाइम्स शिखर परिषदेत देश-विदेशातील अनेक मान्यवर उपस्थित आहेत. आयोजकांचे आणि ज्यांनी आपले विचार मांडले त्या सर्व सहकाऱ्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो. थोड्याच वेळापूर्वी शोभना जींनी दोन मुद्दे मांडले, जे मी विशेष लक्षात घेतले आहेत. एक म्हणजे त्यांनी सांगितले की मागच्या वेळी मोदीजी आले होते, तेव्हा त्यांनी एक सूचना दिली होती. या देशात माध्यम संस्थांनी काय काम करावे, हे सांगण्याचे धैर्य कोणीही करू शकत नाही. पण मी ते केले होते, आणि मला आनंद आहे की शोभनाजी आणि त्यांच्या टीमने ते काम मोठ्या आवडीने केले. आणि देशाला – मी आत्ताच प्रदर्शन पाहून आलो – मी सर्वांना विनंती करतो की प्रदर्शन नक्की पाहा. या छायाचित्रकार सहकाऱ्यांनी त्या क्षणांना असे टिपले आहे की ते क्षण अमर झाले आहेत. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली आणि तीही मी ज्या शब्दांत समजलो, त्यांनी म्हटले की तुम्ही पुढेही… त्या असेही म्हणू शकल्या असत्या की तुम्ही पुढेही देशाची सेवा करत राहा, पण हिंदुस्तान टाइम्सने असे म्हटले की तुम्ही पुढेही अशीच सेवा करत राहा, यासाठी मी विशेष आभार व्यक्त करतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीत आयोजित हिंदुस्तान टाईम्स लीडरशिप समिट 2025 या शिखर परिषदेला केले संबोधित
December 06th, 08:13 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत आयोजित हिंदुस्तान टाईम्स लीडरशिप समिट 2025 या शिखर परिषदेला संबोधित केले. त्यांनी संमेलनात उपस्थित असलेल्या देशातील आणि परदेशातील अनेक मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीची दखलपूर्ण नोंद घेतली. त्यांनी आयोजकांना तसेच या परिषदेत आपले विचार मांडलेल्या सर्वांना अभिनंदनपर शुभेच्छाही दिल्या. शोभना यांनी उल्लेख केलेल्या दोन मुद्द्यांची आपण काळजीपूर्वक नोंद घेतली असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले. त्यांनी आपल्या मागील भेटीचा संदर्भ दिला, त्यावेळी आपण त्यांना माध्यम समुहांतर्फे क्वचितच हाती घेतल्या जाणार्या गोष्टीबद्दल सुचवले होते याची आठवण त्यांनी करून दिली, आणि या समुहाने ते केले, असेही त्यांनी नमूद केले. शोभना आणि त्यांच्या चमूने उत्साहाने आपली सूचना पूर्ण केल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. जेव्हा आपण प्रदर्शनाला भेट दिली, तेव्हा छायाचित्रकारांनी क्षण अशा पद्धतीने टिपले की ते अमर झाल्यासारखे वाटले असे ते म्हणाले. आपण ते प्रदर्शन पाहिले असून, सर्वांनी ते पाहावे, असे आवाहन त्यांनी केले. शोभना यांनी उल्लेख केलेल्या दुसर्या मुद्याच्या संदर्भानेही त्यांनी भाष्य केले. त्यांचे म्हणणे म्हणजे केवळ आपण देशाची सेवा करत राहावी अशी इच्छा नाही, तर हिंदुस्तान टाईम्सनेच आपण त्याच पद्धतीने सेवा करत राहावे, असे म्हटले आहे, असे म्हणत याबद्दल त्यांनी विशेष कृतज्ञताही व्यक्त केली.महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली
December 06th, 09:11 am
महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पंतप्रधानांनी आदरांजली वाहिली आहे. डॉ. आंबेडकरांची न्याय, समता आणि संविधानवादावरील अढळ वचनबद्धता भारताच्या राष्ट्रीय प्रवासाच्या वाटचालीत आपल्याला मार्गदर्शन करत आहे, असे पंतप्रधान म्हणाले. मानवी प्रतिष्ठेचे रक्षण आणि लोकशाही मूल्यांचे सबलीकरण करण्यासाठी डॉ. आंबेडकरांच्या समर्पणातून अनेक पिढ्यांना प्रेरणा मिळाली आहे.माजी राष्ट्रपती डॉ.राजेंद्र प्रसाद यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाहिली आदरांजली
December 03rd, 09:11 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी राष्ट्रपती डॉ.राजेंद्र प्रसाद यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील एका सक्रिय सेनानी पासून संविधान सभेचे अध्यक्षस्थान भूषवण्यापर्यंत आणि देशाचे पहिले राष्ट्रपती म्हणून राजेंद्र प्रसाद यांनी अद्वितीय प्रतिष्ठा, समर्पण आणि हेतूंमधील स्पष्टता या गुणांनी राष्ट्राची सेवा केली आहे, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. सार्वजनिक जीवनातील त्यांचा दीर्घ प्रवास साधेपणा, धाडस आणि राष्ट्रीय एकतेप्रती असलेल्या श्रद्धेने परिपूर्ण आहे. त्यांची आदर्श सेवा आणि दूरदृष्टी पिढ्यान्पिढ्यांना प्रेरणा देत राहील. असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.संविधान दिनाला, पॅरिसमधील युनेस्कोच्या मुख्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिमानाची भावना केली व्यक्त
November 26th, 10:51 pm
संविधान दिनानिमित्त पॅरिसमधील युनेस्को मुख्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अत्यंत अभिमानाची भावना व्यक्त केली आहे.संविधान दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संविधानाच्या शिल्पकारांना वाहिली आदरांजली
November 26th, 10:15 am
संविधान दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संविधानाच्या शिल्पकारांना आदरांजली वाहिली आहे. विकसित भारताच्या निर्मितीमध्ये देशाच्या सामूहिक प्रयत्नांना प्रेरणा देणारी त्यांची दूरदृष्टी आणि काळाच्या पुढे पाहण्याचा दृष्टिकोन पंतप्रधानांनी अधोरेखित केला.श्री गुरु तेग बहादूर जी यांच्या 350 व्या शहीदी दिनानिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली
November 25th, 09:56 am
श्री गुरु तेग बहादूर जी यांच्या 350 व्या शहीदी दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या अतुलनीय शौर्याला आणि सर्वोच्च बलिदानाला आदरांजली वाहिली आहे.पंतप्रधानांनी लाचित दिनानिमित्त लचित बोरफुकन यांना वाहिली आदरांजली
November 24th, 11:45 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लचित दिनानिमित्त लचित बोरफुकन यांचे स्मरण केले, आदरांजली वाहिली आणि धैर्य, देशभक्ती आणि खऱ्या नेतृत्व यांचे ते प्रतीक होते, असे त्यांचे वर्णन केले आहे.