रोजगार मेळाव्यात पंतप्रधानांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे केलेल्या भाषणाचा मजकूर
October 24th, 11:20 am
यंदाचा प्रकाशाचा उत्सव 'दिवाळी' तुमच्या सर्वांच्या जीवनात प्रकाशाची एक नवी तिरीप घेऊन आला आहे. सणासुदीच्या काळात कायमस्वरूपी नोकरीचे नियुक्तीपत्र मिळणे, म्हणजेच, उत्सवाचा उत्साह आणि यशाचा दुहेरी आनंद! हाच आनंद आज देशातील 51 हजारहून अधिक तरुण-तरुणींना मिळाला आहे. मला जाणवतंय की, तुम्हा सर्वांचे कुटुंबिय देखील किती आनंदले असतील. मी तुम्हा सर्वांचे आणि तुमच्या कुटुंबियांचे खूप खूप अभिनंदन करतो. जीवनाच्या या नवीन प्रारंभासाठी मी तुम्हाला अनेक शुभेच्छा देतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोजगार मेळ्याला केले संबोधित
October 24th, 11:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून रोजगार मेळाव्याला संबोधित केले. यावर्षीच्या दिव्यांच्या सणाने अर्थात दिवाळीने प्रत्येकाचे आयुष्य नव्याने उजळून टाकले आहे, असे पंतप्रधान म्हणाले. सण साजरे करत असताना कायमस्वरूपी नोकरीची नियुक्ती पत्रे हातात येणे म्हणजे सणांचा उत्साह आणि रोजगार मिळाल्याचे यश असा द्विगुणित आनंद होय. हा आनंद आज देशभरातील 51,000 युवकांपर्यंत पोहोचला आहे, असे पंतप्रधान म्हणाले. यामुळे सर्वांच्या कुटुंबियांना अमाप आनंद मिळाल्याचे सांगून त्यांनी सर्व उमेदवारांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे अभिनंदन केले. त्यांच्या आयुष्यातील नवीन आरंभाबद्दल त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.आयएनएस विक्रांतवर साजऱ्या केलेल्या दिवाळी क्षणांची झलक पंतप्रधानांकडून सामाईक
October 21st, 09:30 am
भारतीय नौदलासमवेत आयएनएस विक्रांतवर साजऱ्या केलेल्या दिवाळी क्षणांची झलक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामाईक केली. मोदींनी, एका बाजूला विशाल महासागर आणि दुसऱ्या बाजूला भारतमातेच्या शूर सैनिकांची अफाट ताकद असल्याचे अधोरेखित करत हा दिवस, एक उल्लेखनीय दिवस, एक उल्लेखनीय क्षण आणि उल्लेखनीय दृश्य असल्याचे नमूद केले. एका बाजूला अनंत क्षितिज आणि अमर्याद आकाश आहे तर दुसऱ्या बाजूला अनंत शक्तीचे प्रतीक असलेली आयएनएस विक्रांतची प्रचंड ताकद असल्याचं त्यांनी नमूद केले. समुद्रावरील सूर्यप्रकाशाचे किरण दीपावलीच्या वेळी शूर सैनिकांनी प्रज्वलित केलेल्या दिव्यांशी मेळ राखत आहेत, जणू दिव्यांची दिव्य माळच तयार होते आहे, असे निरीक्षण पंतप्रधानांनी नोंदवले. भारतीय नौदलातील शूर जवानांसमवेत दिवाळी साजरी करणे हा त्यांना मिळालेला मान आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगोलियाच्या राष्ट्रपतींसमवेत संयुक्त पत्रकार परिषदेत केलेले निवेदन
October 14th, 01:15 pm
मंगोलियाच्या राष्ट्रपतींचे सहा वर्षांनंतर भारतात आगमन होणे ही एक विशेष बाब आहे. भारत आणि मंगोलिया आपल्या राजनैतिक संबंधांची 70 वर्ष तसेच धोरणात्मक भागीदारीची 10 वर्षे साजरी करत असताना ही भेट होत आहे. या निमित्ताने आम्ही आमचा सामायिक वारसा, वैविध्य आणि घनिष्ठ नागरी संबंधांचे प्रतीक म्हणून एक संयुक्त टपाल तिकीट जारी केले आहे.Talking to you felt like talking to a family member, not the Prime Minister: Farmers say to PM Modi
October 12th, 06:45 pm
During the interaction with farmers at a Krishi programme in New Delhi, PM Modi enquired about their farming practices. Several farmer welfare initiatives like Government e-Marketplace (GeM) portal, PM-Kisan Samman Nidhi, Pradhan Mantri Matsya Sampada Yojana, and PM Dhan Dhaanya Krishi Yojana were discussed. Farmers thanked the Prime Minister for these initiatives and expressed their happiness.35,440 कोटी रुपयांच्या दोन महत्त्वाच्या कृषी योजनांच्या शुभारंभाच्या प्रसंगी कृषी कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला
October 12th, 06:25 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 12 ऑक्टोबर रोजी नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन संस्थेत आयोजित कृषी कार्यक्रमात शेतकऱ्यांशी संवाद साधला. हा कार्यक्रम शेतकऱ्यांचे कल्याण, कृषी स्वावलंबन आणि ग्रामीण पायाभूत सुविधा बळकट करण्याबाबत पंतप्रधानांच्या सातत्यपूर्ण वचनबद्धतेला अधोरेखित करतो. पंतप्रधान मोदी यांनी सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होण्यापूर्वी शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला. यावेळी त्यांनी कृषी क्षेत्रातील दोन महत्त्वपूर्ण योजनांचा शुभारंभ केला, ज्यासाठी एकूण 35,440 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यापैकी पी एम धन धान्य कृषी योजना 24,000 कोटींच्या तरतुदीसह सुरू करण्यात आली, तर डाळींच्या आत्मनिर्भरतेसाठी मोहीम सुरु करण्यात अली असून, त्यासाठी 11,440 कोटी रुपयांची तरतूद जाहीर करण्यात आली.ब्रिटनच्या पंतप्रधानांसोबत पत्रकार परिषदेतील संयुक्त निवेदनादरम्यान पंतप्रधानांनी माध्यमांसमोर केलेले निवेदन
October 09th, 11:25 am
पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्या पहिल्या भारत दौऱ्यानिमित्त, आज त्यांचे इथे- मुंबईमध्ये स्वागत करताना मला खूप आनंद होत आहे.दिल्लीमध्ये यशोभूमी येथे इंडिया मोबाईल काँग्रेस 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
October 04th, 10:45 am
मंत्रिमंडळातले माझे सहकारी ज्योतिरादित्य सिंदिया जी, राज्यमंत्री चंद्र शेखर पेम्मासानी जी,विविध राज्यांचे प्रतिनिधी,परदेशातून आपले अतिथी,टेलीकॉम क्षेत्रातले मान्यवर,विविध महाविद्यालयांमधून आलेले माझे युवा मित्र,महिला आणि पुरुष वर्ग,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 62,000 कोटी रुपयांहून जास्त खर्चाच्या युवा केंद्रित उपक्रमांचा शुभारंभ करताना, कौशल दीक्षांत समारोह कार्यक्रमाला केले संबोधित
October 04th, 10:29 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे कौशल्य दीक्षांत समारोहादरम्यान 62,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध युवा-केंद्रित उपक्रमांचा शुभारंभ केला. पंतप्रधानांनी देशातील आयटीआय अर्थात औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये शिकणारे लाखो विद्यार्थी, तसेच बिहारमधील विद्यार्थी आणि शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी आठवण करून दिली की काही वर्षांपूर्वी सरकारने आयटीआयच्या विद्यार्थ्यांसाठी मोठ्या प्रमाणात दीक्षांत समारंभ आयोजित करण्याची नवी परंपरा सुरू केली होती. आजचा दिवस त्या परंपरेतील आणखी एक महत्त्वाचा टप्पा आहे, असे त्यांनी यावेळी नमूद केले.केंद्रीय मंत्रिमंडळाची जैववैद्यकीय संशोधन करिअर कार्यक्रमाच्या (BRCP) तिसऱ्या टप्प्याला मंजुरी
October 01st, 03:28 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने जैववैद्यकीय संशोधन करिअर कार्यक्रमाचा (BRCP) तिसरा टप्पा सुरू ठेवायला मंजुरी दिली आहे. हा कार्यक्रम जैवतंत्रज्ञान विभाग आणि युनायटेड किंगडमच्या वेलकम ट्रस्ट यांच्या भागीदारीत आणि विशेष उद्देश संस्था असलेल्या इंडिया अलायन्स मार्फत राबवण्यात येत आहे. 2025-26 ते 2030-31 या तिसऱ्या टप्प्यासाठी तसेच 2030-31 पर्यंत मंजूर झालेल्या शिष्यवृत्त्या आणि अनुदानांसाठी पुढील सहा वर्षे (2031-32 ते 2037-38) तो सुरू राहील. यासाठी एकूण 1500 कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे, त्यात जैवतंत्रज्ञान विभाग 1000 कोटी रुपये आणि यूकेमधील वेलकम ट्रस्ट 500 कोटी रुपयांचा वाटा उचलणार आहे.प्रधानमंत्र्यांचा बिहारच्या ‘मुख्यमंत्री महिला रोजगार योजना’ लाभार्थींशी संवाद – मराठी अनुवाद
September 26th, 03:00 pm
आता मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेच्या निवडलेल्या लाभार्थींनी आपले अनुभव सांगायचे आहेत. मी सर्वप्रथम पश्चिम चंपारण जिल्ह्यातील रंजीता काजी दीदींना विनंती करतो की त्या आपला अनुभव सांगावेत.PM Modi interacts with beneficiaries of Bihar's Mukhyamantri Mahila Rojgar Yojana
September 26th, 02:49 pm
While interacting with beneficiaries of Bihar’s Mukhyamantri Mahila Rojgar Yojana, PM Modi said that every initiative of the Central and State governments is aimed at women’s welfare and empowerment. Beneficiaries shared their success stories, showcasing the schemes’ impact. The PM urged women to continue sharing such inspirational accounts of how government programs are bringing positive change in society.बिहारमध्ये मुख्यमंत्री महिला रोजगार योजना सुरु करताना पंतप्रधानांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे केलेले भाषण
September 26th, 11:30 am
नवरात्रीच्या या मंगलमय दिवसांमध्ये मला आज बिहारच्या स्त्रीशक्ती सोबत, त्यांच्या आनंदात सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. मी येथे पडद्यावर बघत होतो, लाखो महिला-भगिनी दिसत आहेत. नवरात्रीच्या या पवित्र काळात तुम्हा सर्वांचे आशीर्वाद ही आम्हां सर्वांसाठी फार मोठी ताकद आहे. मी आज तुमचे मनापासून आभार मानतो. आणि आजपासूनच ‘मुख्यमंत्री महिला रोजगार योजना’ सुरु होत आहे. मला सांगितल्यानुसार, आतापर्यंत या योजनेत 75 लाख भगिनी सहभागी झाल्या आहेत. आत्ताच या सर्व 75 लाख भगिनींच्या बँक खात्यांमध्ये एकाच वेळी 10-10 हजार रुपये पाठवण्यात आले आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारच्या मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेचा केला शुभारंभ
September 26th, 11:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणाली द्वारे बिहारच्या मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेचा शुभारंभ केला. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर सर्वांना शुभेच्छा दिल्या. बिहारच्या महिलांच्या उत्सवात आपल्याला सहभागी होता आले, याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला आणि आज मुख्यमंत्री महिला रोजगार योजना सुरू होत असल्याचे नमूद केले. या उपक्रमात 75 लाख महिला यापूर्वीच सहभागी झाल्याचे मोदी यांनी अधोरेखित केले. त्यांनी जाहीर केले की या 75 लाख महिलांच्या बँक खात्यात एकाच वेळी प्रत्येकी 10,000 रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत.मध्य प्रदेशातील धार येथे विकासकामांच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
September 17th, 11:20 am
मध्य प्रदेशचे राज्यपाल मंगुभाई पटेल, इथले लोकप्रिय मुख्यमंत्री मोहन यादव जी, केंद्रातील माझ्या सहकारी सावित्री ठाकुर जी, देशातील कानाकोपऱ्यातून या कार्यक्रमात सहभागी झालेले सर्व केंद्रीय मंत्री, राज्यांचे राज्यपाल, राज्यांचे मुख्यमंत्री, मंचावर उपस्थित अन्य सर्व मान्यवर आणि देशातील माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील धार येथे विविध विकास कामांची पायाभरणी आणि उद्घाटन केले
September 17th, 11:19 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मध्य प्रदेशातील धार येथे विविध विकास कामांची पायाभरणी आणि उद्घाटन केले. उपस्थितांना संबोधित करण्यापूर्वी, पंतप्रधान धार भोजशाळेची पूज्य माता, ज्ञानदेवता, वाग्देवीच्या चरणी नतमस्तक झाले. आज कौशल्य आणि निर्मितीचे दैवत, भगवान विश्वकर्मा यांची जयंती आहे, असे सांगून मोदी यांनी भगवान विश्वकर्मा यांना अभिवादन केले. आपली कारागिरी आणि समर्पणातून राष्ट्र उभारणीच्या कामात योगदान देणाऱ्या कोट्यवधी बंधू-भगिनींप्रति त्यांनी आदर व्यक्त केला.फलनिष्पत्ती : मॉरीशसच्या पंतप्रधानांचा भारत दौरा
September 11th, 02:10 pm
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग आणि मॉरीशस प्रजासत्ताकाचे तृतीयक शिक्षण, विज्ञान आणि संशोधन मंत्रालय यांच्यादरम्यान विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्याबाबत सामंजस्य करारफिजीच्या पंतप्रधानांसमवेत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबोधन
August 25th, 12:30 pm
त्यावेळी आम्ही फोरम फॉर इंडिया - पॅसिफिक आयलंड कोऑपरेशन (पॅसिफिक बेटांच्या सहकार्यासंबंधीचा भारतासाठी मंच) म्हणजे 'फिपिक'चा प्रारंभ केला. त्या पुढाकाराने केवळ भारत- फिजी संबंधच नव्हे, तर संपूर्ण पॅसिफिक क्षेत्रासमवेत असलेल्या आमच्या संबंधांना नवीन ताकद प्राप्त झाली. आणि आज पंतप्रधान राबुका यांच्या या दौऱ्याच्या माध्यमातून या सहसंबंधांमध्ये नवा आयाम जोडला जातो आहे.स्वावलंबन हा 2047 पर्यंत विकसित भारताकडे नेणारा मार्ग: पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
July 27th, 11:30 am
‘मन की बात’मध्ये पुन्हा एकदा चर्चा होईल ती देशाला मिळालेल्या यशाची, देशवासियांनी केलेल्या कामगिरीची! गेल्या काही आठवड्यामध्ये क्रीडा क्षेत्र असो, विज्ञान असो अथवा संस्कृतीचे क्षेत्र असो, प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा, अशी कामगिरी अनेकांनी केली आहे. अलिकडेच शुभांशू शुक्ला हे अवकाशातून परतले, याविषयी संपूर्ण देशामध्ये खूप चर्चा झाली. शुभांशू सुरक्षित भूमीवर परतताच लोकांच्या हृदयामध्ये जणू एक आनंदाची लाट उसळली. संपूर्ण देशाला शुभांशू यांच्या कामगिरीविषयी अभिमान वाटला. अशावेळी मला एका घटनेचं स्मरण होत आहे. ज्यावेळी ऑगस्त 2023 मध्ये चंद्रयान-3 यशस्वीपणे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले, त्यावेळीही देशामध्ये अशाच प्रकारचे अनोखे वातावरण तयार झाले होते. विज्ञानापासून ते अंतराळापर्यंतच्या विषयांमध्ये अगदी लहान-लहान मुलांमध्येही एक नवीन जिज्ञासा, उत्सुकता जागृत झाली होती. आता लहान-लहान मुलेही म्हणताहेत की, आम्हीही अंतराळामध्ये जाणार! आम्हीही चंद्रावर जाणार, अंतराळ संशोधक बनणार!List of Outcomes: Prime Minister's State Visit to Trinidad & Tobago
July 04th, 11:41 pm
PM Modi and Trinidad & Tobago PM Kamla witnessed exchange of MoUs and agreements. Key MoUs / agreements were signed in areas like Indian Pharmacopoeia,Indian Grant Assistance, Cultural Exchanges, Sports, Diplomatic Training and Indian studies. PM Modi announced the extension of OCI card facility upto 6th generation of Indian Diaspora members in Trinidad and Tobago.