पाली भाषेतील तिपिटकची प्रत दिल्याबद्दल पंतप्रधानांनी थायलंडच्या पंतप्रधानांचे मानले आभार

April 03rd, 05:43 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाली भाषेतील तिपिटकाची प्रत दिल्याबद्दल थायलंडच्या पंतप्रधान पैतोंगटार्न शिनावात्रा यांचे आभार मानले. पाली ही एक सुंदर भाषा आहे असे सांगत या भाषेने भगवान बुद्धांच्या शिकवणीचे सार स्वतःमध्ये सामावून घेतले आहे असे गौरवोद्गार त्यांनी काढले.