पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडवानी गायिका तीजन बाई यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला

July 05th, 12:07 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुप्रसिद्ध पंडवानी गायिका तीजन बाई यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. छत्तीसगडच्या पंडवानी या लोककलाप्रकाराला त्यांनी आपल्या प्रभावी आणि भव्य सादरीकरणातून जागतिक स्तरावर एक वेगळी ओळख मिळवून दिली, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.