रशियाच्या राष्ट्राध्यक्षांसोबतच्या बैठकीत पंतप्रधानांचे प्रारंभिक निवेदन

September 01st, 01:24 pm

आपल्याला भेटून अत्यंत आनंद झाला. आपली भेट हा एक संस्मरणीय क्षण असतो असे मला नेहमी वाटत आले आहे. या भेटीत अनेक गोष्टींच्या माहितीचे परस्परांमध्ये देवाण-घेवाण करण्याची संधी मिळते.

पंतप्रधानांनी घेतली रशियन महासंघाच्या अध्यक्षांची भेट

September 01st, 01:08 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज चीनमधील तियानजिन येथे शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेदरम्यान रशियन फेडरेशनचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची भेट घेतली.

25 व्या एससीओ शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधानांनी दिलेले निवेदन

September 01st, 10:14 am

25 व्या एससीओ शिखर परिषदेत सहभागी होताना मला आनंद होत आहे. शानदार स्वागत आणि आदरातिथ्याबद्दल मी राष्ट्रपती शी यांचे मनापासून आभार मानतो.

चीनमधील तियानजिन येथील पंचविसाव्या शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत पंतप्रधानांचा सहभाग

September 01st, 10:00 am

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी दिनांक 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2025 दरम्यान चीनमधील तियानजिन येथे झालेल्या शांघाय सहकार्य संघटनेतील (एससीओ) राष्ट्रप्रमुखांच्या पंचविसाव्या बैठकीत सहभाग झाले आहेत. या शिखर परिषदेत एससीओचे विकासविषयक धोरण, जागतिक प्रशासनात करण्याच्या सुधारणा, दहशतवाद विरोधी धोरण, शांतता आणि सुरक्षा, आर्थिक आणि वित्तीय सहकार्य आणि शाश्वत विकास यावर सफल चर्चा झाली.

शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी म्यानमारच्या राष्ट्र सुरक्षा आणि शांतता आयोगाचे अध्यक्ष सिनियर जनरल मिन ऑन्ग हलिंग यांची घेतली भेट

August 31st, 04:50 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तियानजिन येथे शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर म्यानमारच्या राज्य सुरक्षा आणि शांतता आयोगाचे अध्यक्ष सिनियर जनरल मिन आंग हलिंग यांची भेट घेतली. भारतासाठी 'नेबरहूड फर्स्ट', 'ॲक्ट ईस्ट' आणि 'इंडो-पॅसिफिक' धोरणांचा एक भाग म्हणून म्यानमारसोबतचे संबंध महत्त्वाचे आहेत,असे पंतप्रधानांनी नमूद केले. दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेतला आणि विकास भागीदारी, संरक्षण आणि सुरक्षा, सीमा व्यवस्थापन आणि सीमा व्यापार यासह द्विपक्षीय सहकार्याच्या अनेक पैलूंवर आणखी प्रगती करण्याच्या मार्गांवर चर्चा केली. सध्या सुरू असलेल्या संपर्कव्यवस्था प्रकल्पांमधील प्रगतीमुळे दोन्ही देशांच्या लोकांमध्ये अधिक संवाद वाढेल, तसेच भारताच्या 'ॲक्ट ईस्ट' धोरणात संकल्पना केलेल्या प्रादेशिक सहकार्य आणि एकात्मतेला प्रोत्साहन मिळेल, यावर पंतप्रधानांनी भर दिला.

India - China cooperation is linked to the interests of 2.8 billion people: PM Modi in Tianjin

August 31st, 11:06 am

In his remarks, PM Modi thanked Chinese President Xi Jinping for the warm welcome. Recalling their meaningful discussions in Kazan, the PM noted that an atmosphere of peace and stability has been established following the border disengagement. He further highlighted the resumption of the Kailash Mansarovar Yatra and congratulated the President on China’s successful presidency of the SCO.

पंतप्रधान मोदींचे चीनमध्ये तिआनजीन येथे आगमन

August 30th, 04:00 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी काही वेळापूर्वीच चीनमध्ये दाखल झाले. शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेसाठी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी दिलेल्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी हा दौरा करत आहेत. तियानजिन येथील शिखर परिषद होत असताना ते राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग, राष्ट्राध्यक्ष पुतिन आणि इतर नेत्यांची भेट घेणार आहेत.

जपान आणि चीन दौऱ्याच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले निवेदन

August 28th, 08:40 pm

पंतप्रधान शिगेरू इशिबा यांच्या निमंत्रणावरून, मी 15 व्या वार्षिक शिखर परिषदेसाठी जपानच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर जात आहे.

पंतप्रधानांचा जपान आणि चीन दौरा

August 22nd, 06:15 pm

जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी अनुक्रमे 29-30 ऑगस्ट 2025 रोजी जपानला आणि 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2025 दरम्यान चीनला भेट देणार आहेत. जपानमध्ये, पंतप्रधान 15 व्या वार्षिक भारत-जपान शिखर परिषदेत सहभागी होणार असून जपानचे पंतप्रधान इशिबा यांच्याशी चर्चा करतील. चीनमध्ये पंतप्रधान तियानजिनमध्ये शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) शिखर परिषदेला ते उपस्थित राहणार आहेत.

चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतली भेट

August 19th, 07:34 pm

चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिट ब्युरोचे सदस्य आणि परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.