जागतिक दौरा सन्मानाचा: पंतप्रधान मोदींना या 29 देशांनी केले आहे सन्मानित - हे आहे त्याचे कारण!
July 07th, 04:59 pm
कुवेत, फ्रान्स, पापुआ न्यू गिनी आणि अन्य दोन डझनहून अधिक देशांकडून भारताच्या पंतप्रधानांना त्यांच्या देशाचे सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरविले जाते, तेव्हा त्यातून राजनैतिक सदिच्छेपेक्षाही बरेच काही प्रतिबिंबित होते. हे देशाचा वाढता प्रभाव, त्याची मूल्ये आणि नेतृत्वाला जगन्मान्यता मिळत असल्याचे द्योतक आहे.संयुक्त निवेदन: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शासकीय कुवेत दौरा (डिसेंबर 21-22, 2024)
December 22nd, 07:46 pm
कुवेतचे महामहीम अमीर शेख मेशल अल -अहमद अल-जबर अल-सबाह यांच्या निमंत्रणावरून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21-22 डिसेंबर 2024 दरम्यान कुवेतचा शासकीय दौरा केला. हा त्यांचा पहिला कुवेत दौरा होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 डिसेंबर 2024 ला कुवेत मध्ये 26 व्या अरेबियन गल्फ करंडकाच्या उद्घाटन समारंभात अमीर शेख मेशल अल -अहमद अल-जबर अल-सबाह यांचे सन्मानीय अतिथी म्हणून उपस्थित राहिले.पंतप्रधानांचा कुवेतच्या सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान
December 22nd, 04:37 pm
कुवेतचे अमीर, महामहिम शेख मशाल अल-अहमद अल-जाबेर अल-सबा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कुवेतचा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार ऑर्डर ऑफ मुबारक अल-कबीर प्रदान केला. या प्रसंगी कुवेतचे पंतप्रधान महामहिम शेख अहमद अल-अब्दुल्ला अल-अहमद अल-सबा देखील उपस्थित होते.