जागतिक दौरा सन्मानाचा: पंतप्रधान मोदींना या 29 देशांनी केले आहे सन्मानित - हे आहे त्याचे कारण!
July 07th, 04:59 pm
कुवेत, फ्रान्स, पापुआ न्यू गिनी आणि अन्य दोन डझनहून अधिक देशांकडून भारताच्या पंतप्रधानांना त्यांच्या देशाचे सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरविले जाते, तेव्हा त्यातून राजनैतिक सदिच्छेपेक्षाही बरेच काही प्रतिबिंबित होते. हे देशाचा वाढता प्रभाव, त्याची मूल्ये आणि नेतृत्वाला जगन्मान्यता मिळत असल्याचे द्योतक आहे.घाना प्रजासत्ताकाच्या संसदेला पंतप्रधानांनी केलेले संबोधन
July 03rd, 03:45 pm
भूमीवर येणे ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. जगातली सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशाचा प्रतिनिधी म्हणून मी माझ्या समवेत 140 कोटी भारतीयांच्या सद्भावना आणि शुभेच्छा घेऊन आलो आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घानाच्या संसदेला केले संबोधित
July 03rd, 03:40 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज घानाच्या संसदेत आयोजित विशेष अधिवेशनाला संबोधित केले आणि असे करणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान ठरले आहेत. घानाच्या संसदेचे अध्यक्ष अल्बन किंग्सफर्ड सुमाना बॅगबिन यांच्या अध्यक्षतेखाली हे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले होते. या अधिवेशनाला, घाना आणि भारताचे संसद सदस्य, शासकीय अधिकारी यांच्यासह निमंत्रित मान्यवर पाहुणे उपस्थित होते.‘द ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना' हा पुरस्कार स्वीकारताना पंतप्रधानांनी केलेले भाषण
July 03rd, 02:15 am
घानाच्या राष्ट्रपतींकडून 'द ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना', या घानाच्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित होणे, ही माझ्यासाठी खूप अभिमानाची आणि सन्मानाची बाब आहे.पंतप्रधानांना घानाचा राष्ट्रीय सन्मान प्रदान
July 03rd, 02:12 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निपुण राजकारणपटुत्व आणि प्रभावी जागतिक नेतृत्व यांची दखल घेत आज घानाचे राष्ट्राध्यक्ष जॉन ड्रामानी महामा यांनी घानाचा राष्ट्रीय सन्मान पुरस्कार - ‘ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना’ - पंतप्रधान मोदी यांना प्रदान केला. 140 कोटी भारतीयांच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारत असल्याचे सांगत, पंतप्रधानांनी हा सन्मान भारतीय तरुणांच्या आकांक्षा, त्याच्या सांस्कृतिक परंपरा आणि विविधता आणि घाना व भारत यांच्यातील ऐतिहासिक संबंधांना समर्पित केला आहे.