जागतिक दौरा सन्मानाचा: पंतप्रधान मोदींना या 29 देशांनी केले आहे सन्मानित - हे आहे त्याचे कारण!

July 07th, 04:59 pm

कुवेत, फ्रान्स, पापुआ न्यू गिनी आणि अन्य दोन डझनहून अधिक देशांकडून भारताच्या पंतप्रधानांना त्यांच्या देशाचे सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरविले जाते, तेव्हा त्यातून राजनैतिक सदिच्छेपेक्षाही बरेच काही प्रतिबिंबित होते. हे देशाचा वाढता प्रभाव, त्याची मूल्ये आणि नेतृत्वाला जगन्मान्यता मिळत असल्याचे द्योतक आहे.

मॉरिशसच्या राष्ट्रीय दिन सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित

March 12th, 03:12 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मॉरिशस प्रजासत्ताकाच्या 57 व्या राष्ट्रीय दिन सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लावली.

‘ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार अँड की ऑफ द इंडियन ओशन (जीसीएसके)’ हा पुरस्कार स्वीकारताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

March 12th, 03:00 pm

मॉरिशसचा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केल्याबद्दल मी मनापासून धन्यवाद देतो. हा केवळ माझा सन्मान नाही. हा 1.4 अब्ज भारतीयांचा सन्मान आहे. भारत आणि मॉरिशसमधील शतकानुशतके जुन्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक नातेसंबंधांचा हा सन्मान आहे. प्रादेशिक शांतता, प्रगती, सुरक्षा आणि शाश्वत विकासासाठी आमच्या सामायिक वचनबद्धतेची ही पावती आहे. तसेच, ग्लोबल साउथच्या सामायिक आशा आणि आकांक्षांचे प्रतीक देखील आहे. या पुरस्काराचा मी अत्यंत नम्रतापूर्वक आणि कृतज्ञतेने स्वीकार करतो. हा पुरस्कार मी अनेक शतकांपूर्वी भारतातून मॉरिशसमध्ये आलेल्या तुमच्या पूर्वजांना आणि त्यांच्या सर्व पिढ्यांना समर्पित करतो. त्यांच्या कठोर परिश्रमातून त्यांनी मॉरिशसच्या विकासात एक सुवर्ण अध्याय लिहिला आहे आणि मॉरिशसच्या विविधतेत योगदान दिले. एक जबाबदारी म्हणूनही मी या सन्मानाचा स्वीकार करतो. भारत-मॉरिशस धोरणात्मक भागीदारी नव्या शिखरावर नेण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत राहू या आमच्या वचनबद्धतेचा मी पुनरुच्चार करतो.