पंतप्रधान यांची नाताळच्या सकाळच्या सेवेला उपस्थिती
December 25th, 10:43 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतील 'द कॅथेड्रल चर्च ऑफ द रिडेम्पशन' येथे झालेल्या नाताळ सकाळच्या सेवेला उपस्थिती लावली. या सेवेतून प्रेम, शांती आणि करुणेचा कालातीत संदेश प्रतिबिंबित झाला. नाताळची भावना आपल्या समाजात सुसंवाद आणि सद्भावना निर्माण करो, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.