पंतप्रधानांनी थायलंडच्या माजी पंतप्रधानांची घेतली भेट

April 03rd, 08:50 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बँकॉकमध्ये थायलंडचे माजी पंतप्रधान थाकसिन शिनावात्रा यांची भेट घेतली. त्यांनी संरक्षण, व्यापार, संस्कृती आणि इतर क्षेत्रांमध्ये भारत व थायलंड यांच्यातील सहकार्याच्या अपरिमित शक्यतांवर चर्चा केली.