भगवान बुद्ध यांच्याशी संबंधित पवित्र पिप्रहवा अवशेषांच्या भव्य आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांच्या भाषणाचा मराठी अनुवाद
January 03rd, 12:00 pm
केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी गजेंद्र सिंह शेखावत जी, किरण रिजिजू जी, रामदास आठवले जी, राव इंद्रजीत जी, दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम होता, त्यांना निघावे लागले आणि दिल्लीचे सर्व मंत्री सहकारी, दिल्लीचे नायब राज्यपाल सक्सेना जी, महामहीम, राजनैतिक समुदायाचे सर्व माननीय सदस्य, बौद्ध विद्वान, धम्माचे अनुयायी, भगिनी आणि बंधुंनो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीत भगवान बुद्धांशी संबंधित पवित्र पिप्रहवा अवशेषांच्या भव्य आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे उद्घाटन
January 03rd, 11:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील राय पिथोरा सांस्कृतिक संकुलात, ‘द लाईट अँड द लोटस: रेलिक्स ऑफ द अवेकन्ड वन’ (प्रकाश आणि कमळ: प्रबुद्धाचे अवशेष) असे शीर्षक असणाऱ्या, भगवान बुद्धांशी संबंधित पवित्र पिप्रहवा अवशेषांच्या भव्य आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे उद्घाटन केले. सव्वाशे वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भारताचा वारसा परत आला आहे, भारताचा ठेवा परत आला आहे, असे या प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले. आजपासून भारतातील लोकांना भगवान बुद्धांचे हे पवित्र अवशेष पाहता येतील आणि त्यांचे आशीर्वाद घेता येतील, असेही ते म्हणाले. पंतप्रधान मोदी यांनी या पावन प्रसंगी उपस्थित असलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत केले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. बौद्ध परंपरेशी संबंधित भिक्खू आणि धर्माचार्य देखील यावेळी उपस्थित असल्याचे त्यांनी नमूद केले आणि त्यांच्याबद्दल आदर व्यक्त केला. भिक्खू आणि धर्माचार्यांच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाला नवी ऊर्जा मिळत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. 2026 या वर्षाच्या अगदी सुरुवातीला होणारा हा मंगल सोहळा अत्यंत प्रेरणादायी आहे, हे त्यांनी अधोरेखित केले. भगवान बुद्धांच्या आशीर्वादाने 2026 हे वर्ष जगासाठी शांतता, समृद्धी आणि सलोख्याचा नवा अध्याय घेऊन येवो, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.थायलंडच्या राजमाता महाराणी सिरिकीत यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
October 26th, 03:39 pm
पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी थायलंडच्या राजमाता, महाराणी सिरिकीत यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. आपल्या शोक संदेशात त्यांनी महाराणी सिरिकीत यांनी लोकसेवेत आयुष्यभर दिलेल्या योगदानाला आदरांजली वाहत नमूद केले की, त्यांचा वारसा पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहील.पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 सप्टेंबर रोजी नवी दिल्लीमध्ये भारत मंडपम येथे वर्ल्ड फूड इंडिया 2025 मध्ये उपस्थितांना संबोधित करणार
September 24th, 06:33 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6:15 वाजता नवी दिल्ली मधील भारत मंडपम येथे वर्ल्ड फूड इंडिया 2025 मध्ये सहभागी होतील. यावेळी ते उपस्थितांना संबोधित करतील.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ (123 वा भाग) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद
June 29th, 11:30 am
माझ्या प्रिय देशबांधवांनो, नमस्कार! 'मन की बात’ मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आणि अभिनंदन! तुम्ही सर्वजण यावेळी योगाची ऊर्जा आणि आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या स्मृतींमध्ये रमून गेले असाल. यावर्षीही 21 जून रोजी देश-विदेशातील कोट्यवधी लोक आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले. तुम्हाला आठवतंय, 10 वर्षांपूर्वी याची सुरुवात झाली. या 10 वर्षांमध्ये हा दिवस दरवर्षी आधीच्यापेक्षा अधिक उत्साहात, भव्य स्वरूपात होत आहे.रायझिंग ईशान्य गुंतवणूकदार परिषदेत पंतप्रधानांच्या भाषणाचा मजकूर
May 23rd, 11:00 am
केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी ज्योतिरादित्य सिंधिया जी, सुकांता मजुमदार जी, मणिपूरचे राज्यपाल अजय भल्ला जी, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा जी, अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू जी, त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा जी, मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमा जी, सिक्किमचे मुख्यमंत्री प्रेम सिंह तमांग जी, नागालँडचे मुख्यमंत्री नेफ्यू रियो जी, मिझोरमचे मुख्यमंत्री लालदुहोमा जी, सर्व उद्योगपती, गुंतवणूकदार, बंधु आणि भगिनींनो…पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रायझिंग नॉर्थ ईस्ट गुंतवणूकदार शिखर परिषद 2025 चे उद्घाटन
May 23rd, 10:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे रायझिंग ईशान्य गुंतवणूकदार शिखर परिषद 2025 चे उद्घाटन केले. कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत करताना, पंतप्रधानांनी ईशान्य प्रदेशाच्या भविष्याप्रति अभिमान, कळकळ आणि प्रचंड विश्वास व्यक्त केला. भारत मंडपम येथे अलिकडेच झालेल्या अष्टलक्ष्मी महोत्सवाची त्यांनी आठवण करून दिली आणि आजचा कार्यक्रम ईशान्य प्रदेशातील गुंतवणुकीचा उत्सव आहे यावर भर दिला. शिखर परिषदेला उपस्थित असलेल्या उद्योग धुरिणांचा उल्लेख पंतप्रधानांनी केला. यातून या प्रदेशातील संधींबाबतचा उत्साह अधोरेखित झाला आहे असे ते म्हणाले. त्यांनी सर्व मंत्रालये आणि राज्य सरकारांचे अभिनंदन केले तसेच गुंतवणूक-पूरक वातावरण निर्माण करण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांची प्रशंसा केली. शुभेच्छा देत, पंतप्रधानांनी नॉर्थ ईस्ट रायझिंग शिखर परिषदेचे कौतुक केले आणि या प्रदेशाच्या निरंतर विकास आणि समृद्धीप्रति आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.भारत-थायलंड धोरणात्मक भागीदारीच्या स्थापनेबाबत संयुक्त घोषणापत्र
April 04th, 07:29 pm
थायलंडच्या पंतप्रधान महामहिम पैतोंगटार्न शिनावात्रा यांच्या निमंत्रणावरून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 03-04 एप्रिल 2025 दरम्यान थायलंडला अधिकृत भेट दिली आणि बँकॉकमधील 6 व्या बिमस्टेक शिखर परिषदेत सहभागी झाले. बँकॉकमधील गव्हर्नमेंट हाऊस येथे पंतप्रधान शिनावात्रा यांनी पंतप्रधान मोदी यांचे समारंभपूर्वक स्वागत केले.थायलंडचे राजे आणि राणीसोबत पंतप्रधानांची भेट
April 04th, 07:27 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बँकॉकमधील दुसित पॅलेसमध्ये थायलंडचे राजे महा वजीरालोंगकोर्न फ्रा वाजिराकलाओचाओयुहुआ आणि महाराणी सुथिदा बजरासुधाबिमलालक्षण यांची भेट घेतली.पंतप्रधानांनी बिमस्टेक शिखर परिषदेच्या निमित्ताने घेतली नेपाळच्या पंतप्रधानांची भेट
April 04th, 04:17 pm
बँकॉकमधील 6 व्या बिमस्टेक शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांची भेट घेतली.बिमस्टेक शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी बांगलादेशच्या मुख्य सल्लागारांची घेतली भेट
April 04th, 03:49 pm
बँकॉक येथे सुरू असलेल्या बिमस्टेक शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार प्रोफेसर मुहम्मद युनूस यांची भेट घेतली.Prime Minister’s visit to Wat Pho
April 04th, 03:36 pm
PM Modi with Thai PM Paetongtarn Shinawatra, visited Wat Pho, paying homage to the Reclining Buddha. He offered ‘Sanghadana’ to senior monks and presented a replica of the Ashokan Lion Capital. He emphasized the deep-rooted civilizational ties between India and Thailand, strengthening cultural bonds.उपक्रमांची यादी: सहाव्या बिमस्टेक शिखर परिषदेत पंतप्रधानांचा सहभाग
April 04th, 02:32 pm
बिमस्टेक प्रदेशात स्थानिक चलनातील व्यापाराच्या शक्यतांवर व्यवहार्यता अभ्यासपंतप्रधानांनी घेतली भूतानच्या पंतप्रधानांची भेट
April 04th, 01:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज थायलंडमधील बँकॉक येथे सहाव्या बिमस्टेक शिखर परिषदेच्या निमित्ताने भूतानचे पंतप्रधान त्सेरिंग टोबगे यांची भेट घेतली.6 व्या बिमस्टेक शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधानांनी केलेले निवेदन
April 04th, 12:59 pm
सुरुवातीला, मी या शिखर परिषदेच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल थायलंडच्या पंतप्रधान महामहिम शिनावात्रा आणि थायलंड सरकारचे मनापासून आभार मानतो.थायलंडमधील 6 व्या बिमस्टेक शिखर परिषदेत पंतप्रधान सहभागी
April 04th, 12:54 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज थायलंडने आयोजित केलेल्या सहाव्या बिमस्टेक (बहु-क्षेत्रीय तांत्रिक आणि आर्थिक सहकार्यासाठी बंगालचा उपसागर उपक्रम) शिखर परिषदेत सहभागी झाले होते. शिखर परिषदेचा विषय होता - बिमस्टेक: समृद्ध, लवचिक आणि मुक्त क्षेत्र . ही शिखर परिषद म्हणजे नेत्यांच्या प्राधान्यक्रमांचे आणि बिमस्टेक प्रदेशातील लोकांच्या आकांक्षा तसेच जागतिक अनिश्चिततेच्या काळात सामायिक विकासाची सुनिश्चिती करण्यासाठी बिमस्टेकच्या प्रयत्नांचे द्योतक होते.पंतप्रधानांनी बिमस्टेक राष्ट्रांमधील सहकार्याच्या विविध पैलूंचा समावेश करणारा 21 कलमी कृती आराखडा प्रस्तावित केला आहे
April 04th, 12:53 pm
थायलंडमधील बँकॉक येथे आयोजित सहाव्या बिमस्टेक शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिमस्टेक राष्ट्रांमधील सहकार्याच्या विविध पैलूंचा समावेश करणारा 21 कलमी कृती आराखडा प्रस्तावित केला. बिमस्टेक राष्ट्रांमध्ये व्यवसाय वाढविण्यासाठी आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्राच्या समृद्ध क्षमतेचा वापर करण्यासाठी त्यांनी यावेळी भाष्य केले. म्यानमार आणि थायलंडला झालेल्या अलिकडच्या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात एकत्र काम करण्याच्या आवश्यकतेवर त्यांनी भर दिला. अंतराळ क्षेत्रात काम करण्यावर आणि सुरक्षा यंत्रणा मजबूत करण्यावर मोदींनी भर दिला आहे. नेतृत्व करणाऱ्या तरुणांची भूमिका अधोरेखित करत बिमस्टेकला एकत्रितपणे ऊर्जा देण्याचे आवाहन त्यांनी केले.बिमस्टेक शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधानांची राज्य प्रशासन परिषदेचे अध्यक्ष वरिष्ठ जनरल मिन आंग ह्लाईंग यांच्याशी भेट
April 04th, 09:43 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बँकॉक येथे झालेल्या बिमस्टेक शिखर परिषदेदरम्यान राज्य प्रशासन परिषदेचे अध्यक्ष आणि म्यानमारचे पंतप्रधान वरिष्ठ जनरल मिन आंग ह्लाईंग यांची भेट घेतली.पंतप्रधानांनी थाई सरकारद्वारे रामाकीन भित्तीचित्रांचे चित्रण दर्शवणाऱ्या आयस्टॅम्पचे अनावरण केले अधोरेखित
April 03rd, 09:14 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामाकीन भित्तीचित्रांचे चित्रण असणाऱ्या थायलंड सरकारच्या आयस्टॅम्पच्या अनावरणाला अधोरेखित केले.पंतप्रधानांनी थायलंडच्या माजी पंतप्रधानांची घेतली भेट
April 03rd, 08:50 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बँकॉकमध्ये थायलंडचे माजी पंतप्रधान थाकसिन शिनावात्रा यांची भेट घेतली. त्यांनी संरक्षण, व्यापार, संस्कृती आणि इतर क्षेत्रांमध्ये भारत व थायलंड यांच्यातील सहकार्याच्या अपरिमित शक्यतांवर चर्चा केली.