पंतप्रधान मोदींचे जागतिक आव्हानांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक भारतीयाला खंबीर आवाहन

May 10th, 08:39 pm

पंतप्रधान मोदींनी हैदराबादमधील एका जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी अलीकडील संघर्ष आणि पुरवठा साखळीतील विस्कळीतपणामुळे निर्माण झालेल्या जागतिक आर्थिक आव्हानांवर भाष्य केले आणि भारताची लवचिकता मजबूत करण्यासाठी सामूहिक राष्ट्रीय जबाबदारीचे आवाहन केले. आयातीवरील ताण कमी करण्यासाठी आणि परकीय चलन वाचवण्यासाठी त्यांनी नागरिकांना इंधन वापर कमी करणे, कारपूलिंगला प्रोत्साहन देणे, सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणे आणि इलेक्ट्रिक वाहनांना प्राधान्य देण्याचे आवाहन केले.

लोक काँग्रेस आणि बीआरएसच्या घराणेशाहीच्या राजकारणाला कंटाळले आहेत:

May 10th, 06:05 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबाद, तेलंगणा येथे एका भव्य जाहीर रॅलीला संबोधित केले, जिथे त्यांनी भारताची वाढती जागतिक प्रतिष्ठा, भाजपच्या अलीकडील निवडणूक विजयांचे महत्त्व आणि सध्याच्या जागतिक आर्थिक आणि भू-राजकीय आव्हानांच्या काळात देशाच्या सामूहिक जबाबदारीवर भाष्य केले.

हैदराबादमधील पंतप्रधान मोदींच्या भव्य रॅलीत आत्मनिर्भरता आणि विकसित

May 10th, 06:00 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबाद, तेलंगणा येथे एका भव्य जाहीर रॅलीला संबोधित केले, जिथे त्यांनी भारताची वाढती जागतिक प्रतिष्ठा, भाजपच्या अलीकडील निवडणूक विजयांचे महत्त्व आणि सध्याच्या जागतिक आर्थिक आणि भू-राजकीय आव्हानांच्या काळात देशाच्या सामूहिक जबाबदारीवर भाष्य केले.

काँग्रेसच्या सत्तेच्या पुस्तकात सुशासनाचा कोणताही धडा नाही: बंगळुरूंमध्ये पंतप्रधान मोदी

May 10th, 09:46 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बंगळुरू, कर्नाटक येथे एका भव्य जाहीर सभेला संबोधित केले आणि दक्षिण भारतात भाजपला मिळणाऱ्या वाढत्या पाठिंब्याचे कौतुक केले, तसेच देशातील जनता अस्थिरता आणि घोटाळ्यांऐवजी 'स्थिरता, गती आणि उपाय' निवडत असल्याचे प्रतिपादन केले. ते म्हणाले की आज बंगळुरूच्या भूमीवरून भगवा सूर्य उगवला आहे.

पंतप्रधान मोदींनी कर्नाटकातील बंगळूर येथे एका भव्य जाहीर सभेला संबोधित केले.

May 10th, 09:45 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बंगळुरू, कर्नाटक येथे एका भव्य जाहीर सभेला संबोधित केले आणि दक्षिण भारतात भाजपला मिळणाऱ्या वाढत्या पाठिंब्याचे कौतुक केले, तसेच देशातील जनता अस्थिरता आणि घोटाळ्यांऐवजी 'स्थिरता, गती आणि उपाय' निवडत असल्याचे प्रतिपादन केले. ते म्हणाले की आज बंगळुरूच्या भूमीवरून भगवा सूर्य उगवला आहे.

The greatest pride of my life is that I am a karyakarta of the Bharatiya Janata Party: PM Modi at BJP HQ

January 20th, 11:16 am

Prime Minister Narendra Modi today addressed party leaders and karyakartas during the felicitation ceremony of the newly elected BJP President, Nitin Nabin, at the party headquarters in New Delhi. Congratulating Nitin Nabin, the Prime Minister said, “The organisational election process reflects the BJP’s commitment to internal democracy, discipline and a karyakarta-centric culture. I congratulate karyakartas across the country for strengthening this democratic exercise.”

PM Modi addresses BJP karyakartas at felicitation of New Party President

January 20th, 11:15 am

Prime Minister Narendra Modi today addressed party leaders and karyakartas during the felicitation ceremony of the newly elected BJP President, Nitin Nabin, at the party headquarters in New Delhi. Congratulating Nitin Nabin, the Prime Minister said, “The organisational election process reflects the BJP’s commitment to internal democracy, discipline and a karyakarta-centric culture. I congratulate karyakartas across the country for strengthening this democratic exercise.”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कवी आणि विचारवंत आंदे श्री यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला

November 10th, 03:02 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रख्यात कवी आणि विचारवंत आंदे श्री यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. आंदे श्री यांच्या निधनामुळे आपल्या सांस्कृतिक आणि बौद्धिक विश्वात मोठी पोकळी निर्माण झाल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे. त्यांच्या विचारांमधून तेलंगणाच्या हृदयाचे प्रतिबिंब झळकते. एक प्रगल्भ कवी आणि विचारवंत म्हणून त्यांनी जनतेचा आवाज बनून त्यांच्या संघर्ष, आकांक्षा आणि अदम्य जिद्दीला शब्दबद्ध केले. त्यांच्या शब्दांत अंतःकरण हलवण्याचे, लोकांना एकत्र आणण्याचे आणि समाजाच्या सामूहिक स्पंदनांना आकार देण्याचे सामर्थ्य होते. त्यांनी सामाजिक जाणीव आणि काव्यात्मक सौंदर्य यांचा साधलेला मिलाप केवळ अवर्णनीय आहे, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

तेलंगणाच्या राज्यपालांनी घेतली पंतप्रधानांची भेट

June 30th, 03:22 pm

तेलंगणाचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

तेलंगणातील संगारेड्डी येथील कारखान्यात आगीमुळे झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला शोक

June 30th, 02:33 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तेलंगणातील संगारेड्डी येथील कारखान्यात लागलेल्या आगीमुळे झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला. त्यांनी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून (PMNRF) मृतांच्या वारसाला 2 लाख रुपयांची तर जखमी व्यक्तीला 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ (123 वा भाग) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद

June 29th, 11:30 am

माझ्या प्रिय देशबांधवांनो, नमस्कार! 'मन की बात’ मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आणि अभिनंदन! तुम्ही सर्वजण यावेळी योगाची ऊर्जा आणि आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या स्मृतींमध्ये रमून गेले असाल. यावर्षीही 21 जून रोजी देश-विदेशातील कोट्यवधी लोक आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले. तुम्हाला आठवतंय, 10 वर्षांपूर्वी याची सुरुवात झाली. या 10 वर्षांमध्ये हा दिवस दरवर्षी आधीच्यापेक्षा अधिक उत्साहात, भव्य स्वरूपात होत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ (122 वा भाग) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद

May 25th, 11:30 am

आज संपूर्ण देश दहशतवादाविरुद्ध एक झाला आहे, संतापानं क्रुद्ध आहे, संकल्पसिद्ध आहे. आज प्रत्येक भारतीयाचा एकच निर्धार आहे, की 'आपल्याला दहशतवाद संपवायचाच आहे.'

तेलंगणातील हैदराबाद येथे आग दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला

May 18th, 12:00 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलंगणातील हैदराबाद येथील आग दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या दुर्घटनेत जखमी झालेले लवकरात लवकर बरे होवो, अशीही पंतप्रधानांनी सदिच्छा व्यक्त केली आहे.

तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांची घेतली भेट

February 26th, 01:35 pm

तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ (119 वा भाग) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद

February 23rd, 11:30 am

काही वर्षांपूर्वी कुणी विचार केला असेल की या क्षेत्रात स्टार्ट-अप आणि खासगी क्षेत्रातील अंतराळ कंपन्यांची संख्या शेकडोच्या घरात जाईल ? जीवनात काहीतरी रोमांचक आणि थरारक गोष्टी करू इच्छिणाऱ्या आपल्या युवकांसाठी अंतराळ क्षेत्र हा एक उत्तम पर्याय बनत आहे.

विविध रेल्वे प्रकल्पांच्या उद्घाटन आणि पायाभरणी प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण.

January 06th, 01:00 pm

तेलंगणाचे राज्यपाल श्रीमान जिष्णु देव वर्मा जी, ओदिशाचे राज्यपाल श्री हरि बाबू जी, जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा जी, जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री श्रीमान उमर अब्दुल्ला जी, तेलंगणाचे मुख्यमंत्री श्रीमान रेवंत रेड्डी जी, ओदिशाचे मुख्यमंत्री श्रीमान मोहन चरण मांझी जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहयोगी अश्विनी वैष्णव जी, जी किशन रेड्डी जी, डॉ. जीतेंद्र सिंह जी, व्ही. सोमैया जी, रवनीत सिंह बिट्टू जी, बंडी संजय कुमार जी, अन्य मंत्रीगण, संसद सदस्य, आमदार, अन्य महानुभाव तसेच बंधू आणि भगिनींनो!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विविध रेल्वे प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी

January 06th, 12:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून विविध रेल्वे प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. पंतप्रधानांनी नवीन जम्मू रेल्वे डिव्हीजनचे उद्घाटन केले. त्यांनी ईस्ट कोस्ट रेल्वेच्या रायगडा रेल्वे डिव्हीजनच्या इमारतीची पायाभरणी केली आणि तेलंगणातील चारलापल्ली नवीन टर्मिनल स्थानकाचे उद्घाटन केले.

आज जगभरातील लोकांना भारताबद्दल अधिक जाणून घेण्याची इच्छा आहे: पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये

October 27th, 11:30 am

माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार! ‘मन की बात’ मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. माझ्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय क्षण कोणते असे कोणी विचारले तर अनेक प्रसंग डोळ्यासमोर येतात, पण एक क्षण असा आहे जो अत्यंत विशेष आहे, तो क्षण आहे, जेव्हा मी गेल्या वर्षी १५ नोव्हेंबरला भगवान बिरसा मुंडा ह्यांच्या जयंतीदिनी झारखंडमधील त्यांच्या जन्मस्थानी उलिहाटू गावाला भेट दिली होती. या प्रवासाचा माझ्यावर खूप प्रभाव पडला. मी देशाचा पहिला पंतप्रधान आहे, ज्याला या पवित्र भूमीची धूळ (माती) मस्तकावर लावण्याचे भाग्य लाभले. त्या क्षणी मला स्वातंत्र्यलढ्याची ताकद तर जाणवलीच पण या मातीतील शक्तीशी जोडले जाण्याची संधीही मिळाली. मला जाणवले की संकल्प पूर्ण करण्याचे धाडस देशातील कोट्यवधी लोकांचे भविष्य कसे बदलू शकते.

केंद्रीय मंत्रिमंडळाने 6,798 कोटी रुपये अंदाजे खर्चाच्या दोन रेल्वे प्रकल्पांना दिली मंजुरी

October 24th, 03:12 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने रेल्वे मंत्रालयाच्या एकूण 6,798 कोटी रुपये (अंदाजे) खर्चाच्या दोन रेल्वे प्रकल्पांना मंजुरी दिली आहे.

माजी उपराष्ट्रपती, श्री एम. व्यंकय्या नायडू यांच्या जीवन आणि प्रवासावरील पुस्तकांच्या प्रकाशनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा मजकूर

June 30th, 12:05 pm

उद्या 1 जुलै रोजी व्यंकैय्या नायडू यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या जीवनयात्रेला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. ही 75 वर्षे असामान्य कामगिरीने परिपूर्ण आहेत. या 75 वर्षांतील टप्पे आश्चर्यकारक आहेत. आज त्यांच्या आत्मचरित्रासह आणखी दोन पुस्तकांचे प्रकाशन करण्याची संधी मिळाली याचा मला आनंद आहे. मला विश्वास आहे की ही पुस्तके लोकांना प्रेरणा देतील आणि त्यांना देशसेवेसाठी योग्य मार्गदर्शन करतील.