पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील पदकविजेत्यांशी साधला संवाद

August 10th, 09:30 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील भारतीय पदकविजेत्यांशी संवाद साधला. पंतप्रधानांनी गेल्या दशकभरात भारतीय क्रीडा क्षेत्रात झालेल्या स्थित्यंतराचा आढावा घेतला आणि आपल्या 12 ते 13 वर्षांच्या कार्यकाळात राष्ट्रीय खेळाडूंना आपल्या निवासस्थानी आमंत्रित करणे ही एक नियमित आणि अभिमानास्पद परंपरा झाल्याचे अधोरेखित केले.

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये पुरुषांच्या डेकॅथलॉन स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी तेजस्विन शंकर यांचे अभिनंदन केले आहे

August 01st, 08:43 am

ग्लासगो येथील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये पुरुषांच्या डेकॅथलॉन स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी तेजस्विन शंकर यांचे अभिनंदन केले आहे.

पंतप्रधान मोदींनी ‘मन की बात’मध्ये उन्हाळ्याच्या उष्णतेपासून बचावासाठी उपाय सांगितले आणि नागरिकांना पुरेसे पाणी पिऊन शरीरात पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्याचा सल्ला दिला.

May 31st, 11:30 am

‘मन की बात’ मध्ये पुन्हा एकदा तुमच्याशी संवाद साधताना मला अतिशय आनंद होत आहे. देशाच्या वेगवेगळ्या भागांत आपल्या देशातले लोक देशहितासाठी, समाजहितासाठी अशा काही अद्भूत गोष्टी करत आहेत की, जेव्हा त्यांच्याबद्दल आपण ऐकतो तेव्हा आपल्याला एक नवीन प्रेरणा मिळते. आज कार्यक्रमाची सुरुवात मी ऍथलेटिक्समधील देशाच्या अशाच एका कामगिरीने करणार आहे. काही दिवसांपूर्वीच झारखंडच्या रांची येथे नॅशनल सिनियर ऍथलेटिक्स फेडरेशन स्पर्धा झाली. यामध्ये देशभरातून आलेल्या जवळजवळ 800 खेळाडूंनी भाग घेतला होता. यादरम्यान चार वेगवेगळ्या क्रीडाप्रकारांमध्ये चार राष्ट्रीय विक्रम मोडीत निघाले. गुरिंदरवीर सिंह, विशाल टीके, तेजस्विन शंकर, देव मीणा आणि कुलदीप कुमार. या खेळाडूंनी वेगवेगळ्या श्रेणींमध्ये नवीन विक्रम प्रस्थापित केले. मी सर्वात आधी या सर्वांचे खूप खूप अभिनंदन करतो.

आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या डेकॅथलॉन प्रकारात रौप्य पदक पटकावल्याबद्दल तेजस्वीन शंकर चे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

October 03rd, 11:34 pm

आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या डेकॅथलॉन प्रकारात रौप्य पदक पटकावल्याबद्दल तेजस्वीन शंकर चे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

पंतप्रधानांनी तेजस्विन शंकर याचे उंच उडीमध्ये भारताचे पहिले पदक जिंकल्याबद्दल केले अभिनंदन

August 04th, 09:55 am

बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकूल स्पर्धेत(2022) तेजस्विन शंकरने उंच उडी या क्रीडाप्रकारात भारताचे पहिले पदक जिंकल्याबद्द्ल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे. तेजस्विन शंकर याला उंच उडी या क्रीडा प्रकारामध्ये कांस्य पदक मिळाले असून ट्रॅक अँड फिल्ड या क्रीडाप्रकारातील ते भारताचे पहिलेच पदक आहे.