Prime Minister shares Sanskrit Subhashitam highlighting the role of teachers on Guru Purnima
July 29th, 08:20 am
PM Modi extends Guru Purnima greetings and shares a Sanskrit Subhashitam highlighting the invaluable role of teachers in shaping lives. He reflects on how Gurus inspire, guide, educate and awaken wisdom, encouraging everyone to make their ideals a guiding force in life.विख्यात बौद्ध अभ्यासक रॉबर्ट ए. एफ. थुरमन यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
June 18th, 05:30 am
विख्यात बौद्ध अभ्यासक रॉबर्ट ए. एफ. थुरमन यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.आदर्श शिक्षकाचे गुण अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित पंतप्रधानांकडून सामायिक
June 01st, 08:37 am
काही लोक स्वतः एखादे कार्य पूर्ण करण्यात अत्यंत कुशल असतात, तर काही लोक यासाठीचे आवश्यक ज्ञान अथवा कौशल्य इतरांना शिकवण्यात विशेष पारंगत असतात, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ज्या व्यक्तीकडे स्वतःकडचे कौशल्य आणि इतरांना शिकवण्याची क्षमता हे दोन्ही गुण असतात, ती व्यक्ती शिक्षकांमधली सर्वश्रेष्ठ मानली जाण्यास पात्र असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.Bengal’s strength is known worldwide, but TMC has trapped it in corruption: PM Modi in Mathurapur
April 23rd, 01:00 pm
Addressing a Vijay Sankalp rally in Mathurapur, West Bengal, PM Modi contrasted BJP’s 11 years of development with TMC’s 15 years of “lies and betrayal.” Targeting the TMC's syndicate culture, he described widespread “cut money” in jobs, land, rations and mandis. He concluded by asserting that a strong wave of change is visible across Bengal, driven by women and youth.Today, against TMC’s jungle raj, people across Bengal are blowing the conch of change: PM Modi in Krishnanagar
April 23rd, 12:45 pm
PM Modi addressed a massive public rally in Krishnanagar, delivering a sharp critique of TMC’s misgovernance while presenting BJP’s vision of development, security and women-led growth in West Bengal. He highlighted 15 years of “scams and broken promises” under TMC, contrasting it with BJP’s vision of “Sabka Saath, Sabka Vikas”. Reaffirming Modi's guarantee, he announced 10 guarantees for women.PM Modi’s high-energy rallies in Krishnanagar and Mathurapur, West Bengal
April 23rd, 12:30 pm
PM Modi addressed massive public gatherings in Krishnanagar and Mathurapur, delivering a sharp critique of TMC’s misgovernance while presenting BJP’s vision of development, security and women-led growth in West Bengal.पंतप्रधानांनी आदि शंकराचार्यांना आदरांजली वाहिली
April 21st, 01:09 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आदि शंकराचार्यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली. मोदी म्हणाले की, त्यांची गहन शिकवण, विचार आणि अद्वैत वेदान्ताचे तत्त्वज्ञान जगभरातील असंख्य लोकांना मार्गदर्शन करत आले आहे. तसेच, आध्यात्मिक विचारांना पुनरुज्जीवित करण्याचे आणि देशभरात आध्यात्मिक केंद्रे स्थापन करण्याचे त्यांचे प्रयत्न चिरस्थायी प्रेरणास्थान आहेत. त्यांचे ज्ञान आपला मार्ग प्रकाशित करत राहो आणि सत्य, करुणा व सामूहिक कल्याणाप्रती असलेली आपली वचनबद्धता अधिक दृढ करो, असेही मोदी यांनी म्हटले आहे.‘परीक्षा पे चर्चा 2026’ कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागामध्ये पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांशी साधलेल्या संवादाचा मजकूर
February 09th, 10:30 am
माझ्या प्रिय मित्रांनो, 'परीक्षा पे चर्चा' च्या या महत्त्वपूर्ण भागात तुमचे स्वागत आहे. यावेळचा परीक्षा पे चर्चा कार्यक्रम काहीतरी वेगळा आहे, काहीतरी खास आहे. अनेक विद्यार्थ्यांनी मला सूचना पाठवल्या होत्या की देशाच्या वेगवेगळ्या भागांतही परीक्षा पे चर्चा व्हायला पाहिजे. म्हणून यावेळी मी देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये विद्यार्थ्यांसोबत बसून परीक्षा पे चर्चा केली आहे. या विशेष भागात तुम्हाला हेच पाहायला मिळणार आहे. तर चला प्रथम तामिळनाडूतील कोइम्बतूरला जाऊया. तामिळनाडूतील विद्यार्थ्यांची ऊर्जा आणि उत्सुकता पाहून मी खूप प्रभावित झालो. चला, पाहूया.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परीक्षा पे चर्चा 2026 च्या दुसऱ्या भागात कोईम्बतूर, रायपूर, देवमोगरा आणि गुवाहाटी येथील विद्यार्थ्यांशी साधला संवाद
February 09th, 10:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज परीक्षा पे चर्चा 2026 च्या 9 व्या आवृत्तीला पुढे सुरू ठेवत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. परीक्षा पे चर्चा 2026 च्या दुसऱ्या भागात पंतप्रधानांनी कोईम्बतूर, रायपूर, देवमोगरा आणि गुवाहाटी येथील 'एक्झॅम वॉरियर्स'शी अनौपचारिक संवाद साधला. 'परीक्षा पे चर्चा'च्या या विशेष आवृत्तीत विद्यार्थ्यांचे स्वागत करताना श्री मोदी यांनी नमूद केले की, यावेळी हा कार्यक्रम देशाच्या विविध भागांत आयोजित करण्यात आला आहे. कोईम्बतूर आवृत्तीची सुरुवात करताना पंतप्रधानांनी नमूद केले की, तामिळनाडूच्या विद्यार्थ्यांमधील ऊर्जा आणि कुतूहलाने ते मनापासून प्रभावित झाले आहेत. वणक्कम म्हणून त्यांचे स्वागत करत त्यांनी हलकाफुलका संवाद साधला. विद्यार्थ्यांनी आपला उत्साह व्यक्त करताना सांगितले की, त्यांना आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता जेव्हा त्यांनी पंतप्रधानांना पाहिले; त्यांना वाटले होते की पंतप्रधानांचे आगमन खूप नाट्यमय असेल, परंतु त्यांना ते अत्यंत साधे, नम्र आणि जमिनीशी नाते असलेले वाटले. एका विद्यार्थ्याने आपला अनुभव सांगताना म्हटले की, पंतप्रधानांच्या आगमनाच्या वेळी त्यांना कमालीचे दडपण आल्यासारखे वाटत होते.या वर्षीच्या #ParikshaPeCharcha या कार्यक्रमासाठी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी विचार मांडावेत असे पंतप्रधानांचे आवाहन
January 07th, 07:05 pm
दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा जवळ येत असल्याच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा परीक्षा पे चर्चा या आपल्या बहुप्रतिक्षित वार्षिक कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी संवाद साधणार आहेत.पंतप्रधानांच्या हस्ते 3 जानेवारी रोजी भगवान बुद्धांशी संबंधित पवित्र पिप्रहवा अवशेषांच्या भव्य आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे उद्घाटन होणार
January 01st, 05:39 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 च्या सुमाराला नवी दिल्लीतील राय पिथोरा सांस्कृतिक संकुलात भगवान बुद्धांच्या पवित्र पिप्रहवा अवशेषांच्या भव्य आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे उद्घाटन करतील. द लाइट अँड द लोटस: रिलिक्स ऑफ द अवेकन्ड वन या संकल्पनीय शीर्षकाअंतर्गत हे प्रदर्शन आयोजित केले गेले आहे.दिल्लीमध्ये यशोभूमी येथे इंडिया मोबाईल काँग्रेस 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
October 04th, 10:45 am
मंत्रिमंडळातले माझे सहकारी ज्योतिरादित्य सिंदिया जी, राज्यमंत्री चंद्र शेखर पेम्मासानी जी,विविध राज्यांचे प्रतिनिधी,परदेशातून आपले अतिथी,टेलीकॉम क्षेत्रातले मान्यवर,विविध महाविद्यालयांमधून आलेले माझे युवा मित्र,महिला आणि पुरुष वर्ग,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 62,000 कोटी रुपयांहून जास्त खर्चाच्या युवा केंद्रित उपक्रमांचा शुभारंभ करताना, कौशल दीक्षांत समारोह कार्यक्रमाला केले संबोधित
October 04th, 10:29 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे कौशल्य दीक्षांत समारोहादरम्यान 62,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध युवा-केंद्रित उपक्रमांचा शुभारंभ केला. पंतप्रधानांनी देशातील आयटीआय अर्थात औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये शिकणारे लाखो विद्यार्थी, तसेच बिहारमधील विद्यार्थी आणि शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी आठवण करून दिली की काही वर्षांपूर्वी सरकारने आयटीआयच्या विद्यार्थ्यांसाठी मोठ्या प्रमाणात दीक्षांत समारंभ आयोजित करण्याची नवी परंपरा सुरू केली होती. आजचा दिवस त्या परंपरेतील आणखी एक महत्त्वाचा टप्पा आहे, असे त्यांनी यावेळी नमूद केले.देशभरात नागरी क्षेत्रांतर्गत 5862 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चासह 57 नवीन केंद्रीय विद्यालये (KVS) सुरू करण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी
October 01st, 03:43 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या वाढत्या संख्येच्या मुलांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी देशभरात नागरी क्षेत्रांतर्गत 57 नवीन केंद्रीय विद्यालये (केव्ही) सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. 2026-27पासून नऊ वर्षांच्या कालावधीत 57 नवीन केंद्रीय विद्यालये स्थापन करण्यासाठी एकूण 5862.55 कोटी रुपये (अंदाजे) निधीची आवश्यकता आहे. यामध्ये 2585.52 कोटी रुपये (अंदाजे) भांडवली खर्च आणि 3277.03 कोटी रुपये (अंदाजे) कार्यकारी खर्च समाविष्ट आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 साठी आदर्श शाळा म्हणून, पहिल्यांदाच, या 57 केंद्रीय विद्यालयांना बालवाटिकांसह, म्हणजेच पूर्व-प्राथमिक शिक्षणाच्या 3 वर्षांसाठी मंजुरी देण्यात आली आहे.शिक्षक दिनानिमित्त पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा
September 05th, 08:36 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षक दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या मनाला घडवणाऱ्या शिक्षकांचे समर्पण ही अधिक सक्षम आणि उज्ज्वल भविष्याची भक्कम पायाभरणी आहे. पंतप्रधानांनी या प्रसंगी प्रख्यात विद्वान आणि शिक्षक डॉ. एस. राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनकार्याची आणि विचारांची आठवण केली.नवी दिल्ली 7 लोक कल्याण मार्ग इथे राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या शिक्षकांच्या भेटीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबोधन
September 04th, 05:35 pm
आपल्याकडे शिक्षकांप्रति नैसर्गिक आदर, सन्मानाची भावना असते आणि ते समाजाची मोठी ताकद असतात. शिक्षकांना आशीर्वाद देणे, हे अयोग्य/पाप आहे. त्यामुळे मी हे पाप करू इच्छित नाही. मी आपल्याशी जरूर संवाद साधू इच्छितो. माझ्यासाठी हा एक खूपच छान अनुभव होता की तुम्हा सगळ्यांना... खरं तर तुम्हा सगळ्यांना नाही तर तुम्हांला मला भेटणे, कारण आपल्यापैकी प्रत्येकाच्या जीवनात स्वतःची एक कहाणी असेल, त्याशिवाय इथपर्यंत पोहोचू शकला नसतात. पण इतका वेळ काढणे कठीण असते. तरीही मला तुमच्या सर्वांकडून तुमच्याबद्दल थोडंफार जाणून घेण्याची संधी मिळाली, ती नक्कीच प्रेरणादायी आहे आणि त्यासाठी आपल्या सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो. हा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त करणे हा शेवट असू शकत नाही. आपल्या सर्वांवर सगळ्यांचे लक्ष असेल, या पुरस्कारानंतर सर्वांचे लक्ष असेल. याचा अर्थ आपल्या सर्वांची पोहोच वाढली आहे. यापुर्वी तुमचे प्रभाव क्षेत्र किंवा कार्यक्षेत्र असेल ते या पुरस्कारानंतर वृद्धिंगत होईल.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या शिक्षकांना संबोधित केले
September 04th, 05:33 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथे राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या शिक्षकांना संबोधित केले. शिक्षक वर्गाला राष्ट्र-उभारणीतील मजबूत शक्ती संबोधत पंतप्रधान मोदी यांनी शिक्षकांना भारतीय समाजात दिल्या जात असलेल्या नैसर्गिक सन्मानाचे कौतुक केले. शिक्षकांचा गौरव करणे ही केवळ एक रीत किंवा पद्धत नसून त्यांच्या आयुष्यभराच्या समर्पणाला आणि प्रभावाला दिलेली मान्यता असते यावर त्यांनी अधिक भर दिला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री गुरु ग्रंथ साहिब जी यांच्या प्रकाश पर्वाच्या पवित्र प्रसंगी दिल्या शुभेच्छा
August 24th, 01:02 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री गुरु ग्रंथ साहिब जी यांच्या प्रकाश पर्वाच्या पवित्र प्रसंगी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.राष्ट्रपतींकडून राज्यसभेसाठी नामनिर्देशीत करण्यात आलेल्या चार मान्यवर व्यक्तींना पंतप्रधानांच्या शुभेच्छा
July 13th, 10:47 am
राष्ट्रपतींकडून राज्यसभेसाठी नामनिर्देशीत करण्यात आलेल्या चार मान्यवर व्यक्तींना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनःपूर्वक शुभेच्छा देत अभिनंदन केले आहे.सीबीएसई इयत्ता बारावी आणि दहावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पंतप्रधानांकडून शुभेच्छा
May 13th, 02:36 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सीबीएसईच्या इयत्ता बारावी आणि दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.