जपान - भारत व्यावसायिक सहकार्य समितीच्या शिष्टमंडळाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट
March 05th, 07:52 pm
जपान -भारत व्यावसायिक सहकार्य समितीच्या 17 सदस्यीय शिष्टमंडळाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.समितीचे अध्यक्ष तात्सुओ यासुनागा यांनी या शिष्टमंडळाचे नेतृत्व केले. या शिष्टमंडळात उत्पादन, बँकिंग, विमान वाहतूक, औषधनिर्माण, प्रकल्प अभियांत्रिकी आणि लॉजिस्टिक अशा विविध क्षेत्रांतील जपानमधील आघाडीच्या उद्योग समूहांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश होता.जपानच्या तात्सुओ यासुनागा यांच्या नेतृत्वाखालील व्यापारी शिष्टमंडळाने पंतप्रधानांची भेट घेतली
March 05th, 07:47 pm
जपानच्या तात्सुओ यासुनागा यांच्या नेतृत्वाखालील व्यापारी शिष्टमंडळाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यांची भारतातील विस्तार योजना आणि 'मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड' प्रति असलेली दृढ वचनबद्धता उत्साहवर्धक असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.