पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात केलेल्या प्रमुख घोषणा

August 15th, 10:32 am

79व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आपल्या 12व्या स्वातंत्र्यदिन संबोधनात पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्याला भारताच्या पुढील प्रगतीच्या नव्या अध्यायाचे प्रक्षेपण केंद्र बनवले. त्यांनी अनेक धाडसी घोषणा केल्या, ज्यामुळे भारत केवळ पावले टाकणार नाही, तर भविष्याकडे झेप घेण्यास सज्ज आहे, हे स्पष्ट झाले. भारताचा पहिला सेमीकंडक्टर चिप तयार करण्यापासून ते जेट इंजिन निर्मितीपर्यंत, अणुऊर्जा क्षमता दहापट वाढवण्यापासून ते ₹1 लाख कोटींच्या युवक रोजगार योजनेपर्यंत, भारत आपले भविष्य स्वतः ठरवेल, स्वतःचे नियम घालेल आणि 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनण्याचे उद्दिष्ट साध्य करेल, असा त्यांचा संदेश स्पष्ट होता.

भारत आणि सौदी अरेबिया यांच्यात गुंतवणूकविषयक उच्च स्तरीय कृती दलाच्या पहिल्या बैठकीचे आयोजन

July 28th, 11:37 pm

भारत-सौदी अरेबियाच्या गुंतवणूकविषयक उच्चस्तरीय कृती दलाची पहिली बैठक, पंतप्रधानांचे प्रधान सचिव डॉ.पी.के. मिश्रा आणि सौदी अरेबियाचे ऊर्जा मंत्री प्रिन्स अब्दुल अजीझ बिन सलमान बिन अब्दुल अजीझ अल सौद यांच्या सहअध्यक्षतेखाली आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झाली.

'नो मनी फॉर टेरर' या विषयावरील तिसऱ्या मंत्रिस्तरीय परिषदेत 'दहशतवादाला होणारा वित्तपुरवठा ' यावर पंतप्रधान 18 नोव्हेंबर रोजी उद्‌घाटनपर भाषण करणार

November 17th, 02:59 pm

नवी दिल्लीत हॉटेल ताज पॅलेस इथे 18 नोव्हेंबर रोजी सकाळी 9:30 वाजता होत असलेल्या तिसऱ्या 'नो मनी फॉर टेरर' (एनएमएफटी) मंत्रिस्तरीय परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्‌घाटनपर भाषण करणार आहेत.

रोजगारविषयक माहितीसाठी कृती दळाची स्थापना

May 09th, 07:58 pm

रोजगार संबंधी माहिती विश्वासार्ह असणे आणि ती वेळेवर मिळण्याचे महत्व लक्षात घेऊन पंतप्रधान मोदींनी पंतप्रधान कार्यालय आणि संबंधित मंत्रालयांना, देशांत माहिती संबंधी यंत्रणेत बऱ्याच काळापासून असणारी दरी भरून काढण्याचे निर्देश दिले आहेत.