बांगलादेश निवडणुकीतील विजयाबद्दल तारिक रहमान यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन ; द्विपक्षीय संबंधांविषयी भारताच्या वचनबद्धतेचा केला पुनरुच्चार

February 13th, 04:40 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तारिक रहमान यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि बांगलादेशच्या निवडणुकीत मिळालेल्या उल्लेखनीय विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन केले.

बांगलादेशातील संसदीय निवडणुकीत बीएनपीला मिळालेल्या विजयाबद्दल पंतप्रधानांनी केले तारिक रहमान यांचे अभिनंदन

February 13th, 12:13 pm

बांगलादेशात संसदीय समितीत बीएनपीला निर्णायक विजय मिळाल्याबद्दल नरेंद्र मोदी यांनी तारिक रहमान यांचे अभिनंदन केले. लोकसत्ताक, प्रगतीशील आणि सर्वसमावेशकतेला प्रोत्साहन देणाऱ्या बांगलादेशला भारताचे समर्थन असेल, असे मोदींनी म्हटले आहे. आमचे बहुआयामी संबंध मजबूत करण्यासाठी आणि आमची समान विकास उद्दिष्टे साध्य करण्यासाठी मी तुमच्यासमवेत काम करण्यास उत्सुक आहे, असे मोदी पुढे म्हणाले आहेत .