पंतप्रधानांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणाचा मजकूर
April 18th, 08:45 pm
आज मी एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर विशेषतः देशातील माता-भगिनी आणि मुलींशी संवाद साधण्यासाठी आलो आहे! आज भारताचा प्रत्येक नागरिक पाहत आहे की, भारताच्या नारी शक्तीच्या भरारीला कशा प्रकारे रोखले गेले आहे. त्यांच्या स्वप्नांना निर्दयीपणे चिरडले गेले आहे. आमच्या सर्वतोपरी प्रयत्नांनंतरही आम्ही यशस्वी होऊ शकलो नाही, नारी शक्ती वंदन अधिनियमात दुरुस्ती होऊ शकली नाही! आणि मी यासाठी सर्व माता-भगिनींची, क्षमा मागतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्राला केले संबोधित
April 18th, 08:30 pm
भारतातील माता, भगिनी आणि कन्यांशी संबंधित एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर देशाला संबोधित करताना, पंतप्रधानांनी महिलांच्या प्रगतीला खीळ बसल्याबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. सरकारच्या अथक आणि प्रामाणिक प्रयत्नांनंतरही, 'नारी शक्ती वंदन अधिनियम' दुरुस्ती पारित होऊ शकली नाही, ज्यामुळे महिला वर्गाची रास्त स्वप्ने चिरडली गेली, असे त्यांनी नमूद केले. या दुर्दैवी परिस्थितीसाठी मी देशातील सर्व माता आणि भगिनींची मनापासून माफी मागतो, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.पंतप्रधानांनी उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांची घेतली भेट, पुथांडूच्या दिल्या शुभेच्छा
April 14th, 10:35 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपराष्ट्रपती थिरु सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली आणि पुथांडूच्या विशेष प्रसंगी शुभेच्छा दिल्या.मलेशियाच्या पंतप्रधानांसोबत संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधानांचे निवेदन
February 08th, 08:35 am
गेल्या वर्षी आसियान शिखर परिषदेसाठी माझी मलेशिया भेट होऊ शकली नव्हती. परंतु, मी माझ्या मित्राला लवकरच मलेशियात येण्याचे आश्वासन दिले होते.India Malaysia Joint Statement on the occasion of the Official visit by Prime minister of India to Malaysia
February 08th, 08:30 am
At the invitation of Prime Minister of Malaysia, His Excellency, Dato’ Seri Anwar Ibrahim, His Excellency, Shri Narendra Modi, Prime Minister of the Republic of India, undertook an official visit to Malaysia from 7 to 8 February 2026. The visit reflected the deep-rooted friendship and enduring people-to-people ties, based on civilizational connections between the two countries. It reaffirmed the shared commitment of the two Leaders to further consolidate and expand the India–Malaysia Comprehensive Strategic Partnership.मलेशियात भारतीय समुदायासमोर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
February 07th, 03:59 pm
सर्वप्रथम, मी माझे प्रिय मित्र, पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांचे, या सामुदायिक उत्सवात सहभागी झाल्याबद्दल आभार मानतो. त्यांनी आत्ताच आपल्या भाषणात भारत-मलेशिया मैत्रीची व्याप्ती आणि भविष्यातील संधी इतक्या सुंदर शब्दांत व्यक्त केल्या, त्याबद्दलही मी त्यांचे आभार मानतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मलेशियातील क्वालालंपूर येथे एका सामुदायिक कार्यक्रमाला संबोधित केले
February 07th, 03:15 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मलेशियातील क्वालालंपूर येथे एका सामुदायिक कार्यक्रमाला संबोधित केले. या स्वागतातील उत्साहातून आपल्या परस्पर सामायिक संस्कृतीमधील सुंदर विविधतेचे प्रतिबिंब उमटल्याची भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली. या सामुदायिक उत्सवात सहभागी झाल्याबद्दल त्यांनी त्यांचे प्रिय मित्र पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांचे आभार मानले. पंतप्रधान अन्वर इब्राहिम आपल्याला विमानतळावर घेण्यासाठी आले होते आणि त्यांनी स्वतःच्या गाडीतून आपल्याला या कार्यक्रमात आणले, याचा दखलपूर्ण उल्लेख त्यांनी आपल्या संबोधनात केला. यातून पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांचे भारताप्रती आणि इथल्या लोकांसाठी असलेले प्रेम आणि आदराची भावना दिसून येते, असे पंतप्रधानांनी सांगितले.थिरू डी. ज्ञानसुंदरम् जी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
January 26th, 09:48 pm
तामिळ संस्कृती आणि साहित्य यांच्यासाठी डी. ज्ञानसुंदरम् जी यांचे योगदान कायमच स्मरणात राहील असे प्रतिपादन पंतप्रधानांनी केले. त्यांच्या लेखन आणि आजीवन समर्पणातून त्यांनी समाजाची सांस्कृतिक जाणीव समृद्ध केली आणि त्यांचे कार्य वाचक आणि विद्वानांच्या भावी पिढ्यांना प्रेरणा देत राहतील.नवी दिल्ली येथे पोंगल सणानिमित्त पंतप्रधानांनी केलेले भाषण
January 14th, 11:00 am
आज, पोंगल हा एक जागतिक सण झाला आहे. जगभरातील तमिळ समुदाय आणि तमिळ संस्कृतीवर प्रेम करणारे लोक तो उत्साहाने साजरा करतात आणि त्यापैकी मीदेखील एक आहे. हा विशेष सण तुम्हा सर्वांसोबत साजरा करणे, माझ्यासाठी भाग्याचे आहे. आपल्याकडे तमिळ जीवनात पोंगल हा एक आनंददायी अनुभव आहे. हा सण आपल्या शेतकऱ्यांच्या मेहनतीप्रती, पृथ्वी आणि सूर्याप्रती कृतज्ञतेचे प्रतीक आहे.त्याचसोबत हा सण आपल्याला निसर्ग, कुटुंब आणि समाज यांच्यात संतुलन साधण्याचा मार्गदेखील दर्शवतो. देशाच्या विविध भागात लोहडी, मकर संक्रांती, माघ बिहू आणि इतर सणांचा देखील उत्साह आहे. मी भारतातील आणि जगभरातील माझ्या सर्व तमिळ बंधू आणि भगिनींना पोंगल आणि सर्व सणांच्या हार्दिक शुभेच्छा देतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे पोंगल सोहळ्याला केले संबोधित
January 14th, 10:45 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथे आयोजित पोंगल सोहळ्याला संबोधित केले. तमिळ भाषेत शुभेच्छा देताना पंतप्रधान मोदी यांनी अधोरेखित केले की, “आज पोंगल हा एक जागतिक सण बनला आहे”, जो जगभरातील तमिळ समुदायांद्वारे आणि तमिळ संस्कृतीवर प्रेम करणाऱ्या लोकांद्वारे उत्साहाने साजरा केला जातो, आणि आपण देखील त्यापैकीच एक आहेत. हा विशेष सण सर्वांसोबत साजरा करणे हे आपले भाग्य आहे, असे त्यांनी सांगितले. तमिळ जीवनात पोंगल हा एक सुखद अनुभव आहे, जो शेतकऱ्यांच्या कष्टाबद्दल, पृथ्वीबद्दल आणि सूर्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो, तसेच निसर्ग, कुटुंब आणि समाजात संतुलन राखण्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करतो, असे पंतप्रधानांनी नमूद केले. या काळात देशाच्या विविध भागांमध्ये लोहरी, मकर संक्रांती, माघ बिहू आणि इतर सणांच्या उत्साहात लोक रमले आहेत, असेही पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधानांनी भारतातील आणि जगभरातील सर्व तमिळ बंधू-भगिनींना पोंगलच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या तसेच इतर सर्व सणांसाठी शुभेच्छा दिल्या.'विकसित भारत'चा संकल्प निश्चितच पूर्ण होईल: पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
December 28th, 11:30 am
2025 मध्ये भारताने राष्ट्रीय सुरक्षा, क्रीडा, विज्ञान प्रयोगशाळा आणि जागतिक व्यासपीठांवर आपला ठसा उमटवल्याचे पंतप्रधान मोदी मन की बातच्या या वर्षातील शेवटच्या भागात म्हणाले. 2026 मध्ये देश नवीन संकल्पांसह पुढे जाण्यासही सज्ज असेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग, क्विझ स्पर्धा, स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2025 आणि फिट इंडिया चळवळ यासारख्या युवा-केंद्रित उपक्रमांवरही पंतप्रधानांनी प्रकाश टाकला.स्वावलंबन हा 2047 पर्यंत विकसित भारताकडे नेणारा मार्ग: पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
July 27th, 11:30 am
‘मन की बात’मध्ये पुन्हा एकदा चर्चा होईल ती देशाला मिळालेल्या यशाची, देशवासियांनी केलेल्या कामगिरीची! गेल्या काही आठवड्यामध्ये क्रीडा क्षेत्र असो, विज्ञान असो अथवा संस्कृतीचे क्षेत्र असो, प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा, अशी कामगिरी अनेकांनी केली आहे. अलिकडेच शुभांशू शुक्ला हे अवकाशातून परतले, याविषयी संपूर्ण देशामध्ये खूप चर्चा झाली. शुभांशू सुरक्षित भूमीवर परतताच लोकांच्या हृदयामध्ये जणू एक आनंदाची लाट उसळली. संपूर्ण देशाला शुभांशू यांच्या कामगिरीविषयी अभिमान वाटला. अशावेळी मला एका घटनेचं स्मरण होत आहे. ज्यावेळी ऑगस्त 2023 मध्ये चंद्रयान-3 यशस्वीपणे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले, त्यावेळीही देशामध्ये अशाच प्रकारचे अनोखे वातावरण तयार झाले होते. विज्ञानापासून ते अंतराळापर्यंतच्या विषयांमध्ये अगदी लहान-लहान मुलांमध्येही एक नवीन जिज्ञासा, उत्सुकता जागृत झाली होती. आता लहान-लहान मुलेही म्हणताहेत की, आम्हीही अंतराळामध्ये जाणार! आम्हीही चंद्रावर जाणार, अंतराळ संशोधक बनणार!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीलंकेतील तमिळ समुदायाच्या नेत्यांची घेतली भेट
April 05th, 10:48 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोलंबो येथे श्रीलंकेतील तमिळ समुदायाच्या नेत्यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान पंतप्रधानांनी आदरणीय तमिळ नेते थिरु आर. संपंथन आणि थिरु मावई सेनाथिराजा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.तमिळ कवी सुब्रमण्यम भारती यांच्या संपूर्ण साहित्याच्या संपादित ग्रंथखंडांच्या प्रकाशन कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
December 11th, 02:00 pm
आज देशाचे महाकवी सुब्रमण्यम भारती जी, यांची जयंती साजरी होत आहे. मी सुब्रमण्यम भारती जी यांना श्रद्धापूर्वक वंदन करतो. त्यांना आपली श्रद्धांजली अर्पण करतो. आज भारताच्या संस्कृती आणि साहित्यासाठी, भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील स्मृतीच्या दृष्टीने आणि तामिळनाडूच्या गौरवासाठी एक खूप मोठा दिवस आहे. महाकवी सुब्रमण्यम भारती यांच्या कार्याचे , त्यांच्या साहित्यकृतींचे प्रकाशन म्हणजे, एक खूप मोठा सेवायज्ञ आहे आणि या खूप मोठ्या साधनेला आज पूर्णाहूती दिली जात आहे. 21 खंडांमध्ये ‘कालवरिसैयिल भारतियार पडैप्पुगळ्‘चे संकलन सहा दशकांच्या अथक परिश्रमाचे हे साहस, असामान्य आणि अभूतपूर्व आहे. सीनी विश्वनाथन यांचा हा जो समर्पणाचा भाव आहे, त्यांची ही साधना आहे, हे त्यांनी केलेले परिश्रम आहेत, मला पूर्ण विश्वास आहे की, आगामी पिढ्यांना, त्यांच्या कार्याचा खूप मोठा लाभ मिळणार आहे. आपण कधी कधी एक शब्द ऐकत होतो. ‘वन लाइफ , वन मिशन’! परंतु वन लाइफ वन मिशन नेमके असते तरी काय, हे सीनी यांनी दाखवून दिले. त्यांनी केलेली ही खूप मोठी साधना आहे. त्यांची तपस्या पाहून आज मला महामहोपाध्याय पांडुरंग वामन काणे यांचे स्मरण झाले. त्यांनीही आपल्या आयुष्यातील 35 वर्षे धर्मशास्त्राचा इतिहासाचे लेखन करण्यामध्ये खर्च केले. मला विश्वास आहे, सीनी विश्वनाथन यांचे हे काम अकादमीच्या जगतामध्ये एक ‘बेंच-मार्क’ निश्चित करणारे ठरेल. मी या कार्यासाठी विश्वनाथन जी आणि त्यांचे सर्व सहकारी आणि तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन करतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महान तमिळ कवी सुब्रह्मण्य भारती यांच्या रचनांच्या संकलनाचे प्रकाशन
December 11th, 01:30 pm
महान तमिळ कवी सुब्रह्मण्य भारती यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहताना मोदी म्हणाले की, भारताची संस्कृती आणि साहित्य, भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या आठवणी आणि तामिळनाडूच्या गौरवासाठी आजचा दिवस ही एक मोठी संधी आहे. महाकवी सुब्रह्मण्य भारती यांच्या कार्याचे प्रकाशन, एक सेवायज्ञ आज पूर्ण होत आहे असे ते म्हणाले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुब्रमण्यम भारती यांना वाहिली आदरांजली
December 11th, 10:27 am
कवी आणि लेखक सुब्रमण्यम भारती यांच्या जयंतीनिमित्तपंतप्रधानांच्या हस्ते 11 डिसेंबरला महान तमिळ कवी आणि स्वातंत्र्यसैनिक सुब्रमण्यम भारती यांच्या संपूर्ण कार्याच्या संग्रहाचे प्रकाशन
December 10th, 05:12 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 11 डिसेंबर रोजी, नवी दिल्लीतील 7 लोक कल्याण मार्ग, येथे दुपारी 1 वाजता महान तमिळ कवी आणि स्वातंत्र्यसैनिक सुब्रमण्य भारती यांच्या संपूर्ण कार्यावरील संग्रहाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.A part of our vision of Vasudhaiva Kutumbakam is putting our Neighborhood First: PM Modi
October 14th, 08:15 am
Addressing the launch of ferry services between Nagapattinam, India and Kankesanthurai, Sri Lanka PM Modi said that India and Sri Lanka share a deep history of culture, commerce and civilization. Nagapattinam and towns near-by have long been known for sea trade with many countries, including Sri Lanka.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील नागापट्टिनम आणि श्रीलंकेतील कानकेसंथुराई, दरम्यानच्या फेरी सेवेच्या उदघाटन समारंभाला केले संबोधित.
October 14th, 08:05 am
भारत आणि श्रीलंका, राजनैतिक आणि आर्थिक संबंध अधिक दृढ करण्याच्या दिशेने एका नवीन अध्यायाला सुरुवात करत असून नागापट्टिनम आणि श्रीलंकेतील कानकेसंथुराई, दरम्यानच्या फेरी सेवेच्या आरंभामुळे दोन्ही देशातील संबंध दृढ करण्याच्या दिशेने एक निर्णायक टप्पा गाठला गेला आहे, असे पंतप्रधान यावेळी आयोजित कार्यक्रमाला संबोधित करताना म्हणाले.श्रीलंकेच्या राष्ट्रपतींच्या भारत भेटीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांना दिलेले निवेदन
July 21st, 12:13 pm
राष्ट्रपती विक्रमसिंघे आणि त्यांच्यासोबत आलेल्या प्रतिनिधीमंडळातील सदस्यांचे मी भारतात हार्दिक स्वागत करतो. राष्ट्रपती विक्रमसिंघे त्यांचा एक वर्षांचा कार्यकाळ आज पूर्ण करत आहेत. यानिमित्ताने मी त्यांना आपणा सर्वांकडून हार्दिक शुभेच्छा देतो. मागील वर्ष, श्रीलंकेतील लोकांसाठी अत्यंत आव्हानात्मक होते.एक जवळचा मित्र या नात्याने, नेहमीप्रमाणेच, आम्ही या संकटकाळात सुद्धा श्रीलंकेतील लोकांच्या खांद्याला खांदा भिडवून उभे राहिलो. आणि श्रीलंकेच्या जनतेने ज्या साहसाने या आव्हानात्मक परिस्थितीचा सामना केला त्यासाठी मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो.