कुरुक्षेत्र येथे श्री गुरु तेग बहादूर जी यांच्या 350 व्या 'शहीदी दिवसा'ला पंतप्रधानांनी केलेले भाषणv

November 25th, 04:40 pm

आजचा दिवस भारताच्या परंपरेचा एक अद्भुत संगम ठरला आहे. आज सकाळी मी रामायणाची नगरी अयोध्येत होतो आणि आता मी इथे गीतेची नगरी कुरुक्षेत्रात आलो आहे. आपण सर्व श्री गुरु तेग बहादुरजींच्या 350 व्या बलिदानदिनानिमित्त त्यांना वंदन करत आहोत. या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या सर्व संतमहंतांना आणि उपस्थित मान्यवरांना आदरपूर्वक नमस्कार.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरियाणातील कुरुक्षेत्र येथे श्री गुरु तेग बहादूर जी यांच्या 350 व्या 'शहीदी दिवसा'ला संबोधित केले

November 25th, 04:38 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हरियाणातील कुरुक्षेत्र येथे श्री गुरु तेग बहादूर जी यांच्या 350 व्या 'शहीदी दिवसा' निमित्त आयोजित कार्यक्रमाला संबोधित केले. यावेळी बोलताना पंतप्रधानांनी नमूद केले की, आजचा दिवस भारताच्या वारशाचा एक उल्लेखनीय संगम आहे. सकाळी ते रामायणाची नगरी असलेल्या अयोध्येत होते आणि आता ते गीतेची नगरी असलेल्या कुरुक्षेत्रात आहेत याकडे त्यांनी लक्ष वेधले.श्री गुरु तेग बहादूर जी यांच्या 350 व्या हौतात्म्य दिनानिमित्त सर्वजण त्यांना आदरांजली वाहत असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधानांनी कार्यक्रमात संत आणि आदरणीय समुदायाच्या उपस्थितीची दखल घेतली आणि सर्वांना आदराने वंदन केले.

पंतप्रधानांनी तख्त श्री हरिमंदिर जी पटना साहिब येथे प्रार्थना केली

November 02nd, 10:10 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संध्याकाळी तख्त श्री हरिमंदिर जी पटना साहिब येथे प्रार्थना केली.