स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियानांतर्गत तीन गिनीज जागतिक विक्रम केल्याबद्दल पंतप्रधानांनी केली प्रशंसा
November 01st, 02:16 pm
स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियानांतर्गत तीन गिनीज जागतिक विक्रम केल्याबद्दल पंतप्रधानांनी प्रशंसा केली आहे. या कामगिरीची माहिती देणाऱ्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या एका पोस्टवर आपला अभिप्राय देताना पंतप्रधान म्हणाले, अशा प्रकारचे उपक्रम अतिशय कौतुकास्पद आहेत. अशा प्रकारच्या लोकचळवळी महिला सक्षमीकरणाच्या प्रयत्नांना अधिक चालना देतात आणि नारी शक्तीच्या जीवनावर परिवर्तनकारी प्रभाव निर्माण करतात, असे त्यांनी नमूद केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या नारी शक्तीसाठी ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ हे अभियान प्रभावी आणि लाभदायी बनवण्याच्या उद्देशाने तळापर्यंत काम करणाऱ्यांचे केले कौतुक
October 04th, 03:41 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियान प्रभावी आणि भारताच्या नारी शक्तीसाठी फायदेशीर बनवण्यासाठी अथक परिश्रम करणाऱ्या सर्वांच्या प्रयत्नांचे कौतुक केले.BJP’s connection with Delhi goes back to the Jana Sangh days and is built on trust and commitment to the city: PM Modi
September 29th, 08:40 pm
Inaugurating the Delhi BJP’s new office, PM Modi said, “On this auspicious occasion of Navratri, Delhi BJP has received its new office today. It is a moment filled with new dreams and fresh resolutions.” He added, “For us, every BJP office is no less than a shrine, no less than a temple. A BJP office is not merely a building. It is a strong link that connects the Party with the grassroots and with people’s aspirations.”PM Modi inaugurates Delhi BJP’s new office at Deendayal Upadhyaya Marg
September 29th, 05:00 pm
Inaugurating the Delhi BJP’s new office, PM Modi said, “On this auspicious occasion of Navratri, Delhi BJP has received its new office today. It is a moment filled with new dreams and fresh resolutions.” He added, “For us, every BJP office is no less than a shrine, no less than a temple. A BJP office is not merely a building. It is a strong link that connects the Party with the grassroots and with people’s aspirations.”ओडिशातील झारसुगुडा येथे विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा मराठी अनुवाद
September 27th, 11:45 am
येथे काही तरुण बांधव अनेक कलाकृती घेऊन आलेले आहेत. ओडिशातील कला प्रेम जागतिक स्तरावर प्रसिद्ध आहे. आपण दिलेली ही भेट मी आदरपूर्वक स्वीकारतो. माझे एसपीजी सहकारी या सर्व कलाकृती आपल्याकडून गोळा करतील. जर तुम्ही मागे तुमचे नाव व पत्ता लिहून दिलात, तर माझ्याकडून तुम्हाला पत्र अवश्य मिळेल. मागे एक लहान मूलही कलाकृती घेऊन उभे आहे, त्याचे हात दुखत असतील, कृपया त्याचीही मदत करा आणि वस्तू गोळा करून घ्या. मी या स्नेहपूर्ण भेटीसाठी आणि या कलाकृती भेट देणाऱ्या सर्व युवक-युवती व बालकांचे मनःपूर्वक आभार मानतो.ओदिशात झारसुगुडा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 60,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विकासकामांचे उद्घाटन आणि पायाभरणी
September 27th, 11:30 am
सुमारे दीड वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या आठवणींना उजाळा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ओदिशातील जनतेने त्यावेळी विकसित ओदिशा या ध्येयाने पुढे जाण्याचा दृढ संकल्प केला होता. आज केंद्र आणि राज्य सरकारांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे ओदिशा वेगाने प्रगतीच्या मार्गावर पुढे जात असल्याचे त्यांनी समाधानाने नमूद केले. पंतप्रधानांनी ओदिशा तसेच देशाच्या विकासासाठी हजारो कोटींच्या विविध प्रकल्पांची सुरुवात झाल्याची घोषणा केली. या प्रसंगी त्यांनी बीएसएनएलच्या स्वदेशी 4G सेवांचा शुभारंभ करत बीएसएनएलचा नवा अवतार जनतेसमोर सादर केला. याशिवाय, देशभरातील आयआयटी संस्थांच्या विस्तारालाही आज औपचारिक सुरुवात झाल्याचे त्यांनी सांगितले. ओदिशामध्ये शिक्षण, कौशल्य विकास आणि संपर्क सुविधा यांच्याशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते झाले. बेरहमपूर ते सुरत या मार्गावर धावणाऱ्या आधुनिक अमृत भारत गाडीला हिरवा झेंडा दाखवून त्यांनी जनतेसाठी मोठी सोय उपलब्ध करून दिली. या कार्यक्रमाला केंद्रीय रेल्वे, माहिती आणि प्रसारण, तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती-तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव, गुजरात मधील सुरत येथून दूरदृष्य प्रणाली द्वारे उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीचा पंतप्रधानांनी गौरवपूर्वक उल्लेख केला. या सर्व विकास उपक्रमांबद्दल ओदिशातील जनतेचे त्यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले.बिहारमध्ये मुख्यमंत्री महिला रोजगार योजना सुरु करताना पंतप्रधानांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे केलेले भाषण
September 26th, 11:30 am
नवरात्रीच्या या मंगलमय दिवसांमध्ये मला आज बिहारच्या स्त्रीशक्ती सोबत, त्यांच्या आनंदात सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. मी येथे पडद्यावर बघत होतो, लाखो महिला-भगिनी दिसत आहेत. नवरात्रीच्या या पवित्र काळात तुम्हा सर्वांचे आशीर्वाद ही आम्हां सर्वांसाठी फार मोठी ताकद आहे. मी आज तुमचे मनापासून आभार मानतो. आणि आजपासूनच ‘मुख्यमंत्री महिला रोजगार योजना’ सुरु होत आहे. मला सांगितल्यानुसार, आतापर्यंत या योजनेत 75 लाख भगिनी सहभागी झाल्या आहेत. आत्ताच या सर्व 75 लाख भगिनींच्या बँक खात्यांमध्ये एकाच वेळी 10-10 हजार रुपये पाठवण्यात आले आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारच्या मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेचा केला शुभारंभ
September 26th, 11:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणाली द्वारे बिहारच्या मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेचा शुभारंभ केला. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर सर्वांना शुभेच्छा दिल्या. बिहारच्या महिलांच्या उत्सवात आपल्याला सहभागी होता आले, याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला आणि आज मुख्यमंत्री महिला रोजगार योजना सुरू होत असल्याचे नमूद केले. या उपक्रमात 75 लाख महिला यापूर्वीच सहभागी झाल्याचे मोदी यांनी अधोरेखित केले. त्यांनी जाहीर केले की या 75 लाख महिलांच्या बँक खात्यात एकाच वेळी प्रत्येकी 10,000 रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 सप्टेंबर रोजी मध्य प्रदेशला भेट देणार
September 16th, 02:49 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 सप्टेंबर रोजी मध्य प्रदेशला भेट देणार आहेत. त्यांच्या हस्ते दुपारी 12 वाजता धार येथे 'स्वस्थ नारी सशक्त परिवार' आणि '8 व्या राष्ट्रीय पोषण माह' अभियानाचा प्रारंभ होईल. यावेळी ते इतर अनेक उपक्रमांची पायाभरणी आणि उद्घाटन करतील आणि उपस्थितांना संबोधित करतील.