पंतप्रधानांकडून स्वराज पॉल यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त.

August 22nd, 09:41 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वराज पॉल यांच्या निधनाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. पंतप्रधान म्हणाले की, स्वराज पॉल यांचे युनायटेड किंग्डममधील उद्योग, परोपकार आणि सार्वजनिक सेवेतील योगदान तसेच भारताशी अधिक जवळचे संबंध प्रस्थापित करण्यासाठी दिलेला त्यांचा ठाम पाठिंबा नेहमीच स्मरणात राहील. मोदी यांनी स्वराज पॉल यांच्याशी झालेल्या अनेक संवादांच्या आठवणींना उजाळा दिला आणि त्यांचे कुटुंबीय व चाहत्यांप्रति संवेदना व्यक्त केल्या.