स्वराज कौशल यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

December 04th, 06:00 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वराज कौशल यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. स्वराज कौशल यांनी विधिज्ञ म्हणून स्वतःची उल्लेखनीय ओळख निर्माण केली आणि वंचित- दुर्बलांच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी कायद्याच्या व्यवसायाचा उपयोग करण्यावर त्यांनी सदैव भर दिला, असे मोदी म्हणाले. कौशल हे भारताचे सर्वांत तरुण राज्यपाल झाले आणि त्यांच्या राज्यपालपदाच्या कार्यकाळात मिझोरममधील जनतेवर त्यांनी अमिट छाप सोडली, असे मोदी पुढे म्हणाले. एक खासदार म्हणून त्यांचे विचार आणि मार्गदर्शनही अत्यंत महत्त्वपूर्ण होते.